Agriculture news in marathi, Rainfall in 335 circles in Marathwada | Agrowon

मराठवाड्यातील ३३५ मंडळांत पाऊस; खरीप पिकांचे नुकसान

टीम अॅग्रोवन
रविवार, 20 ऑक्टोबर 2019

औरंगाबाद, परभणी : परतीच्या पावसाने मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील ४२१ मंडळांपैकी  ३३५ मंडळांत शनिवारी (ता.१९) सकाळपर्यंतच्या २४ तासांत पावसाने हजेरी लावली. नांदेड, उस्मानाबाद, बीड, व लातूर या चार जिल्ह्यांतील १५ मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली. वाशी, कळंब, परंडा, केज, देगलूर आदी तालुके या परतीच्या पावसाच्या रडारवर होते. लातूर जिल्ह्यातील तांदुळजा मंडळात सर्वाधिक १७० मिलिमीटर पाऊस झाला. त्यामुळे सोंगणी केलेले सोयाबीन व वेचणीला आलेला कापूस भिजून शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले. 

औरंगाबाद, परभणी : परतीच्या पावसाने मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील ४२१ मंडळांपैकी  ३३५ मंडळांत शनिवारी (ता.१९) सकाळपर्यंतच्या २४ तासांत पावसाने हजेरी लावली. नांदेड, उस्मानाबाद, बीड, व लातूर या चार जिल्ह्यांतील १५ मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली. वाशी, कळंब, परंडा, केज, देगलूर आदी तालुके या परतीच्या पावसाच्या रडारवर होते. लातूर जिल्ह्यातील तांदुळजा मंडळात सर्वाधिक १७० मिलिमीटर पाऊस झाला. त्यामुळे सोंगणी केलेले सोयाबीन व वेचणीला आलेला कापूस भिजून शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले. 

मराठवाड्यात एकूण ७६ पैकी ६७ तालुक्‍यात अजूनही पावसाने वार्षिक सरासरी गाठली नाही. अशा स्थितीत शनिवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत झालेल्या परतीच्या पावसाने बीड, उस्मानाबाद व लातूर जिल्ह्यातील पावसाचा टक्‍का सुधारण्यास थोडी मदत केली. 

औरंगाबाद जिल्ह्यातील ६५ पैकी ४४ मंडळांत हा पाऊस तुरळक ते हलक्‍या स्वरूपाचा राहिला. जालना जिल्ह्यातील ४९ पैकी ३९ मंडळांत तुरळक ते हलका पाऊस झाला. जाफ्राबादमधील टेंभुर्णी मंडळात ४२, तर भोकरदनमधील पिंपळगाव रेणुकाई मंडळात २८ मिलिमीटर पाऊस झाला. उर्वरित मंडळांत १ ते १६ मिलिमीटर पाऊस झाला. परभणी जिल्ह्यातील ३९ पैकी ३२ मंडळांत तुरळकच राहिला. सर्वच मंडळात १ ते ८ मिलिमीटर हजेरी लागली. हिंगोली जिल्ह्यातील ३० पैकी केवळ ५ मंडळांत २ ते ४ मिलिमीटरची नोंद झाली.

नांदेड जिल्ह्यातील ८० पैकी ६५ मंडळांत हलका, मध्यम ते दमदार पाऊस झाला. मुखेड तालुक्‍यातील काही मंडळांत दमदार पाऊस झाला. देगलूर मंडळात सर्वाधिक ९६ मिलिमीटर, मरखेल ८९, खानपूर ८१, शहापूर ७२, तर हनेगाव मंडळात ४७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. बीड जिल्ह्यातील ६३ पैकी ५६ मंडळांत मध्यम पाऊस झाला. अंबाजोगाई तालुक्‍यातील पा. ममदापूर मंडळात सर्वाधिक ८५ , केजमधील हनुमंतपींप्रीमध्ये ६५ मिलिमीटर पाऊस झाला. लातूर जिल्ह्यातील ५३ पैकी ५२ मंडळात हलका, दमदार पाऊस झाला. तांदुळजा १७०; चिंचोली मंडळात ११२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. 

उस्मानाबाद जिल्ह्यात जोर

उस्मानाबाद जिल्ह्यातील वाशी, परंडा, कळंब, भूम तालुक्‍यात पावसाचा जोर सर्वाधिक राहिला. वाशी तालुक्‍यातील तीनही वाशी ८२, तेरखेडा ८२, पारगाव ७० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. परंडा तालुक्‍यातील परंडा मंडळात ८०, अशू मंडळात ६५, सोनारी ५५, अनाळा ४०, जेवळा बु. ४७, भूम तालुक्‍यातील भूम मंडळात ५३ मिलिमीटर, ईट ५५, अम्बी २९, मानकेश्‍वर ३६, वालवड ४२, कळंब तालुक्‍यातील कळंब मंडळात ६६ मिलिमीटर, इटकूर ६१, शरधोन ७०, येरमाळा ४७, मोहा ३५, गोविंदपूर ५८, उस्मानाबाद तालुक्‍यातील उस्मानाबाद ग्रामीण ४९, तेर ३८, ढोकी ४५, जागजी २६; तर सावरगावात ४६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.


इतर अॅग्रो विशेष
राज्यात पावसाचा जोर वाढणार पुणे :  राज्यातील बहुतांशी भागात पुन्हा...
कोल्हापूर बाजार समिती संचालकांचे...कोल्हापूर : बेकायदेशीर नोकर भरती तसेच जागा...
मराठवाड्यातील मोठ्या प्रकल्पांत ५१...औरंगाबाद :  मराठवाड्यातील ८७३ प्रकल्पांतील...
धान खरेदीत मोठी अनियमिततागोंदिया: जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या माध्यमातून...
मराठवाड्यात खरिपाची ४८ लाख हेक्टरवर...औरंगाबाद: मराठवाड्यात यंदा ऊस वगळता खरिपाच्या...
शेतकरी न्याय प्राधिकरणासाठी हालचालींना...नागपूर : शेतकऱ्यांच्या फसवणुकीला चाप बसावा...
राज्यात बीएस्सी कृषीची प्रवेश प्रक्रिया...अकोला ः यंदा कोरोनामुळे बीएससी कृषी प्रवेश...
कोकण, मध्य महाराष्ट्राला झोडपलेपुणे ः अरबी समुद्र व उत्तर महाराष्ट्राच्या...
टोमॅटो हंगामावर संभ्रमाचे ढगनाशिक: जिल्ह्यात दरवर्षी पश्चिम पट्ट्यात खरीप...
बुलडाणा जिल्ह्यातील १४ हजार शेतकरी मका...बुलडाणा ः जिल्ह्यातील १८ हजार ६८० शेतकऱ्यांनी मका...
दूध दरप्रश्‍नी राज्याचे केंद्र सरकारला...मुंबई: राज्यातील दूध दराचा तिढा सोडवण्यासाठी...
गोठवलेले शहाळ्यातील पाणी... तेही...शहाळ्यातील पाणी आपण नेहमी पितो. मात्र, तेच...
नव्या शिक्षणाची मांडणी शरद जोशींच्या...शरद जोशी जे म्हणतात ते महत्वाचे आहे की...
रेशीम शेतीला संजीवनीकोरोना लॉकडाउनचा फटका दुग्धव्यवसाय, कोंबडीपालन...
नाशिक विभागात चाळीस लाख टन कापसाची खरेदीनगर ः नाशिक विभागात यंदा १ लाख ३७ हजार ३४५...
देशभरात ‘नाफेड’कडून ८६ हजार टन कांदा...नाशिक: केंद्र सरकारच्या भाव स्थिरीकरण निधी...
कोरोनास्थितीमुळे पोल्ट्री उद्योगाची...नाशिक: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चिकनबाबत...
राज्यातील रेशीम कोष उत्पादकांना मिळणार...पुणे ः बदलत्या हवामानामुळे अडचणीत येत...
मका उत्पादकांचे लक्ष शासनाच्या...औरंगाबाद: हमीभाव खरेदी केंद्रांवरील खरेदी बंद...
लाल भेंडीसाठी शेतकऱ्याला केंद्राचे...सिंधुदुर्ग: जिल्ह्यातील आडेली (ता.वेंगुर्ला)...