मराठवाड्यातील ३६१ मंडळांमध्ये पाऊस

मराठवाड्यातील ३६१ मंडळांमध्ये पाऊस
मराठवाड्यातील ३६१ मंडळांमध्ये पाऊस

औरंगाबाद, नांदेड : मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांतील ३६१ मंडळांमध्ये सोमवारी (ता. २९) सकाळी आठपर्यंतच्या २४ तासांत हलका ते मध्यम पाऊस झाला. औरंगाबाद, जालना जिल्ह्यांतील अनेक मंडळांमध्ये पावसाचा जोर राहिला. परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, बीड जिल्ह्यांतील अनेक मंडळांत हलका ते मध्यम पाऊस झाला. उस्मानाबाद जिल्ह्यात अनेक ठिकाणी तुरळक पाऊस झाला.

गेल्या दोन दिवसांत परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यांतील अनेक मंडळांमध्ये पावसाचा जोर कमी झाला आहे. सोमवारी दुपारपर्यंत अनेक मंडळांमध्ये रिमझिम पाऊस सुरू होता. नांदेड जिल्ह्यातील किनवट, माहूर, हिमायतनगर तालुक्यांत सर्वदूर पाऊस झाला. 

उस्मानाबाद, लातूरमध्ये जोरदार पावसाची गरज

लातूर जिल्हा ः मातोळा मंडळात ६ मिलिमिटर, रेणापूर ५, कोरपूर ५, पानगाव ११, उदगीर ९, मोघा ५, वाढवणा १२, नळगीर ११, किनगाव १२, खंडाळी १४, शिरुळ ताजबंद २३, अंधोरी १९, चाकुर ७, वडवळ ७, झरी २०, शेळगाव १२, जळकोट १९, निलंगा ५, पानचिंचोली ५, तर देवणीत ५ मिलिमिटर पाऊस झाला. उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा मंडळात ५, तर मुरुममध्ये ६ मिलिमिटर पावसाने हजेरी लावली. या जिल्ह्यात जोरदार पावसाची गरज आहे.

मंडळनिहाय पाऊस (मिलिमीटरमध्ये) 

औरंगाबाद जिल्हा औरंगाबाद १०, उस्मानपुरा १३, भावसिंगपुरा १२, चित्ते पिंपळगाव ११, चौका ५, लाडसावंगी १०, करमाड ८, कांचनवाडी १४, चिकलठाणा ११, फुलंब्री १२, आळंद १२, वडोदबाजार ९, पिरबावडा १०, पैठण १२, बिडकीन ११, बालानगर ८, पाचोड ८, आडूळ ९, लोहगाव १०, विहमांडवा ८, नांदर ९, पिंपळगाव पी ११, ढोरकीन १०, सिल्लोड १९, अजिंठा २४, अंबाई ५३, अमठाणा २७, भराडी २५, गोळेगाव २७, निल्लोड १३, बोरगाव बाजार १४, सोयगाव २४, बनोटी ३९, सावलदबारा १५, वैजापूर ८, शिवूर ९, खंडाळा ९, महालगाव ६, लाडगाव १२, लासुरगाव ११, गारज ५, नागमठाण ७, बोरसर ७, गंगापूर ८, वाळूज ६, शेंदरवादा १९, मांजरी ५, सिध्दवडगाव १३, हर्सुल १२, तुर्काबाद १२, भेंडाला १०, कन्नड १७, पिशोर ८, चिकलठाणा २०, करंजखेड २३, देवगाव रंगारी ८, चापानेर ९, नाचनवेल ५, चिंचोली लिंबाजी २०, वेरुळ १२, सुलतानपूर ८, बाजारसावंगी १८.
जालना जिल्हा जालना ७, रामनगर ८, पाचनवडगाव ६, वागूळ जहांगीर ९, बदनापूर ७, दाभाडी १३, सेलगाव ७, बावणे पांगरी ५, भोकरदन २०, सिपोरा बाजार १६, धावडा २९, पिंपळगांव रेणुकाई २०, हस्नाबाद १३, राजूर १४, केदरखेडा १६, अनवा २०, जाफराबाद ९, टेंभुर्णी ११, कुंभारझरी १२, वरुड ७, माहोरा ७, वाटूर ९, ढोकसाल ७, तळणी ६, अंबड ७, धनगरपिंपरी ५, वडीगोद्री १३, रोहिलागड ९, घनसावंगी ६, राणीउंचेगाव ९५, रांजणी ७, अंतरवेली ७,
परभणी जिल्हा बोरी ५, सेलू ५, देऊळगाव ५,मानवत ३९, केकरजवळा १४, कोल्हा ५, आवलगाव ५, राणी सावरगाव ८, माखणी १३, बनवस ६, पूर्णा ६,  चुडावा ७, कात्नेश्वर ५.
हिंगोली जिल्हा हिंगोली ५, खंबाळा ५, माळहिवरा ८, नरसी नामदेव ६, कळमनुरी ७, नांदापूर ७, आखाडा बाळापूर ६, वारंगा फाटा ५, वाकोडी ७, गोरेगांव ७, आजेगाव ५, हत्ता ५, वसमत ६, कुरुंदा ८, औंढा नागनाथ ६.
नांदेड जिल्हा नांदेड ६, वजीराबाद ५, वसरणी ६, लिंबगाव ५, तुप्पा ८, विष्णुपुरी ६, मुदखेड ८, मुगट १०, बारड १५, हदगाव १६, तामसा ९, मनाठा ५, पिंपरखेड १०, आष्टी ६, निवघा, तळणी ११, माहूर १३, वाई ६, वानोळा १६, सिंदखेड १०, किनवट २६, इस्लापूर १७, मांडवी ५, बोधडी १७, दहेली ५, जलधारा १९, शिवणी ३५, हिमायतनगर २४, सरसम १४, जवळगाव १५, भोकर १०, किनी ११, मोघाली १५, मातुल १०, उमरी ७, सिंदी ९, गोलेगाव ९, धर्माबाद १६, जारिकोट ११, करखेली १७, नायगाव ६, नरसी ६, कुंटूर ५, बिलोली १२, कुंडलवाडी १८, सगरोळी १३, आदमपूर ६, लोहगाव ६, देगलूर १९, खानापूर २१, शहापूर १४, हनेगाव ९, मालेगाव ५, मुखेड १०,जांब १२, चांदोळा १२, कंधार ६, कुरुला ७, फुलवल ६, बारुळ ५, पेठवडज १७, माळाकोळी ७, सोनखेड ७, 
बीड जिल्हा बीड १६, राजुरी ८, पेडगाव ९, नाळवंडी ११, पिंपळनेर १६, पाली ७, म्हसजवळा १५, धोंडराई ८, चकलंबा १६, शिरुर कासार १०, तितरणी १६, वडवणी १४,  कौडगाव ७, अंबाजोगाई १०, घाटनांदूर ८, लोखंडी सावरगाव ३२, बर्दापूर ५, दिंद्रुड १७, नित्रुड ९,किट्टी आडगाव ८, परळी १५, सिरसाळा २०, नागापूर २२, पिंपळगाव गाढे ८.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com