मराठवाड्यातील ४११ मंडळांमध्ये पाऊस

मराठवाड्यातील ४११ मंडळांमध्ये पाऊस
मराठवाड्यातील ४११ मंडळांमध्ये पाऊस

औरंगाबाद, नांदेड ः मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांतील ४२१ पैकी ४११ मंडळांमध्ये रविवारी (ता. १) सकाळी आठ पर्यंतच्या २४ तासांमध्ये हलका ते जोरदार पाऊस झाला. नांदेड जिल्ह्यातील ६ आणि जालना जिल्ह्यातील एका मंडळामध्ये १०० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला.

नांदेड जिल्ह्यातील १९, परभणी जिल्ह्यातील ४ मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली. नांदेड जिल्ह्यातील १९ मंडळे, औरंगाबाद जिल्ह्यातील ३ मंडळे, जालना जिल्ह्यातील २, नांदेड जिल्ह्यातील १९, परभणी जिल्ह्यातील ४ मंडळे, हिंगोली, लातूर जिल्ह्यातील प्रत्येकी एका मंडळामध्ये अशी एकूण सहा जिल्ह्यांतील ३० मंडळांमध्ये जोरदार अतिवृष्टी झाली. मरावाड्यातील सर्व आठ जिल्ह्यांमध्ये सलग दुसऱ्या दिवशी सर्वदूर हलक्या ते जोरदार पावसाने हजेरी लावली. यामुळे अनेक मंडळांतील ओढे, नाले, नद्या प्रवाहित झाल्या. लघू तलावांच्या पाणीपातळीत थोडी वाढ झाली. खरीप हंगामाच्या आशा पल्लवित झाल्याने शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील ६५ पैकी ६३ मंडळांमध्ये हलका ते जोरदार पाऊस झाला. औरंगाबाद, फुलंब्री, वैजापूर, गंगापूर, कन्नड, खुल्ताबाद तालुक्यातील अनेक मंडळांमध्ये चांगला पाऊस झाला. भावसिंगपुरा, फुलंब्री, पीरबावडा या तीन मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली. जालना जिल्ह्यातील सर्व ४९ मंडळांमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस झाला.

परभणी जिल्ह्यातील सर्व ३९ मंडळांमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस झाला. जिल्ह्यातील सर्वदूर पाऊस झाला. माखणी, देऊळगाव, पाथरी, सावंगी म्हाळसा मंडळामध्ये जोरदार पाऊस झाला. 

हिंगोली जिल्ह्यातील सर्व ३० मंडळांमध्ये हलका ते मध्यम पाऊस झाला. हिंगोली, कळमनुरी, वसमत, औंढा नागनाथ तालुक्यातील मंडळामध्ये पावसाचा जोर होता. नांदेड जिल्ह्यातील ८० पैकी ७४ मंडळांमध्ये हलका ते जोरदार पाऊस झाला. अर्धापूर, मुदखेड, नायगाव, बिलोली, मुखेड, लोहा तालुक्यातील १९ मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली. मुदखेड, मुगट, बारड, अर्धापूर, नायगाव, कुंटूर या सहा मंडळांमध्ये १०० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला. मुगट मंडळांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे कालवा फुटला आहे. पुरामध्ये दोन शेळ्या, दोन म्हशी वाहून गेल्याचे वृत्त आहे.

लातूर जिल्ह्यातील ५३ पैकी ५१ मंडळांमध्ये हलका ते जोरदार पाऊस झाला. लातूर, रेणापूर, अहमदपूर, चाकूर जळकोट तालुक्यात चांगला पाऊस झाला. जळकोट मंडळामध्ये सर्वाधिक ६६ मिमी पाऊस झाला.

उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व ४२ मंडळामध्ये हलका ते मध्यम पाऊस झाला. उमरगा, तुळजापूर, भूम तालुक्यातील अनेक मंडळांमध्ये चांगला पाऊस झाला. बीड जिल्ह्यातील सर्व ६३ मंडळांमध्ये हलका ते मध्यम पाऊस झाला. गेवराई, वडवणी, अंबाजोगाई, माजलगाव, परळी तालुक्यांतील अनेक मंडळांमध्ये चांगला पाऊस झाला.

मंडळनिहाय पाऊस (मिलिमीटरमध्ये) ः   औरंगाबाद जिल्हा ः औरंगाबाद २६, उस्मानपुरा २४, भावसिंगपुरा ७१, फुलंब्री १००, वडोदाबाजार ५३, पीरबावडा ८७, सिद्धवडगाव ५३, हर्सुल १३, तुर्काबाद १६, डोणगाव ७, भेंडाळा २५, कन्नड ५७, पिशोर २०, चिकलठाणा २४, करंजखेडा १७, देवगाव रंगारी १२, चापानेर २८, नाचनवेल ५, चिंचोली लिंबाजी १६, वेरुळ २१, सुलतानपूर ४०, बाजारसावंगी २४.

जालना जिल्हा ः जालना २५, जालना ग्रामीण ५, बदनापूर ५५, सिपोरा बाजार ३७, धावडा २२, राजूर ३८, जाफ्राबाद २८, टेंभुर्णी २३, कुंभार झरी ३६, वरुड ११, धनगरपिंपरी १२, वडीगोद्री १३, गोंदी २३, राणी उंचेगाव १२, तीर्थपुरी १५, कुंभार पिंपळगाव ७३, अंतरवेळी १०६.

परभणी जिल्हा ः परभणी १४, परभणी ग्रामीण १५, सिंगणापूर २८, दैठणा ३२, पेडगाव १३.६, झरी २७, बोरी ३६, आडगाव ३०, सावंगी म्हाळसा ६८, बामणी ५९, सेलू ३२, देऊळगाव ७५, कुपटा २८, वालूर २३, मानवत ३०, केकरजवळा २६, कोल्हा २६, पाथरी ८०, हदगाव ५४, सोनपेठ ६२, आवलगाव ६०, गंगाखेड ६०, राणीसावगाव ४४, माखणी ७५, महातपुरी ५१, पालम २६, चाटोरी ३७, बनवस २८, पूर्णा २६, ताडकळस ४१, चुडावा ५०, लिमला ५२, कात्नेश्वर ३५.

हिंगोली जिल्हा ः हिंगोली ६७, खंबाळा ३४, बासंबा ९, नरसी नामदेव ७, डिग्रस ४९, कळमनुरी ३३, नांदापूर ५२, आखाडा बाळापूर ७, डोंगरकडा ७, वारंगा फाटा २५, सेनगाव १८, गोरेगाव १५, आजेगाव २०, साखरा १२, पानकनेरगाव ३०, हत्ता २१, वसमत ४२, हट्टा ६०, गिरगाव ५८, कुरुंदा ५९, टेंभुर्णी ५, आंबा ४५, हयातनगर ३०, औंढा नागनाथ ४५, जवळा बाजार २३, येळगाव ६२, साळणा ३२.

नांदेड जिल्हा ः नांदेड ४०, नांदेड ग्रामीण ६०, तुप्पा ४३, विष्णुपुरी ४७, वसरणी ५७, वजिराबाद २७, तरोडा ५०, लिंबगाव २४, अर्धापूर १४०, दाभड ८७, मालेगाव ६८, मुदखेड १२७, मुगट १५६, बारड १६५, जळवगाव १८, मोगाळी २४, उमरी ५०, सिंधी २०, गोळेगाव ६०, धर्माबाद ६४, जारिकोट ६०, करखेली ६३, नायगाव ११८, नरसी ८१, मांजरम ४८, बरबडा ७३, कुंटूर ११७, बिलोली ६५, आदमपूर ३२, लोहगाव ७०, सगरोळी २६, कुंडलवाडी ५५, देगलूर ५८, शहापूर ५५. 

लातूर जिल्हा ः लातूर १३, कासारखेडा ३४, गातेगाव ६, तांदुळजा १५, बाभळगाव २०, चिंचोली १९, रेणापूर ३५, पोहरगाव २८, कारेपूर ४७, पानगाव ३६, उदगीर १७, वाढवणा २८, नळगीर १४, अहमदपूर ४२, किनगाव ४४, खंडाळी ४८, शिरूर ताजबंद ३०, हाडोळती ३६, अंधोरी ५३, चाकुर २४.

उस्मानाबाद जिल्हा ः उस्मानाबाद शहर १०, उस्मनाबाद ग्रामीण ९, तेर १६, ढोकी १७, जागजी २२, नळदुर्ग २५, उमरगा ३५, मुरूम ५२, मोहा २७, भूम ३६, अंबी २६. बीड जिल्हा ः बीड १५, राजुरी १४, आष्टी १५, धामणगाव ३१, गेवराई २५, धोंडराई ५८, उमापूर १५, चकलांबा ११, वडवणी २५, कौडगाव २३, अंबाजोगाई २४, घाटनांदूर ४०, लोखंडी सावरगाव २६, बर्दापूर २७, माजलगाव ३९, गंगामसला ६०, दिंद्रुड ४७, नित्रुट २७, किट्टी आडगाव ४०.

शंभर मिमी किंवा त्यापेक्षा अधिक पाऊस झालेली मंडळे ः फुलंब्री १००, अंतरवेली १०६, मुदखेड १२७, मुगट १५६, बारड १६५, अर्धापूर १४०, नायगाव ११८, कुंटूर ११७.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com