Agriculture news in Marathi, Rainfall in 4 circles in Marathwada | Agrowon

मराठवाड्यातील ३७१ मंडळांमध्ये पाऊस

टीम अॅग्रोवन
सोमवार, 21 ऑक्टोबर 2019

औरंगाबाद/ परभणी ः मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांतील ३७१ मंडळांमध्ये रविवारी (ता. २०) सकाळी आठपर्यंतच्या २४ तासांमध्ये हलका ते जोरदार पाऊस झाला. औरंगाबाद, जालना, परभणी, नांदेड, लातूर या पाच जिल्ह्यांतील २१ मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली. औरंगाबाद जिल्ह्यातील अजिंठा, जालना जिल्ह्यातील दाभाडी, हस्नाबाद, सातोना, परभणी जिल्ह्यातील सेलू, देऊळगाव या सहा मंडळांमध्ये १०० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला.

औरंगाबाद/ परभणी ः मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांतील ३७१ मंडळांमध्ये रविवारी (ता. २०) सकाळी आठपर्यंतच्या २४ तासांमध्ये हलका ते जोरदार पाऊस झाला. औरंगाबाद, जालना, परभणी, नांदेड, लातूर या पाच जिल्ह्यांतील २१ मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली. औरंगाबाद जिल्ह्यातील अजिंठा, जालना जिल्ह्यातील दाभाडी, हस्नाबाद, सातोना, परभणी जिल्ह्यातील सेलू, देऊळगाव या सहा मंडळांमध्ये १०० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला.

ओढे, नाले, नद्यांचे पाणी पिकांमध्ये शिरल्याने कापणी केलेले तसेच उभे सोयाबीन, कपाशी, ज्वारी, भाजीपाला आदी पिकांचे नुकसान झाले. ऐन सुगीच्या वेळी हाती आलेला घास निसर्गाने हिरावल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. दिवाळी सणाच्या आनंदावर विरजण पडले आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील ६५ पैकी ६४ मंडळांमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस झाला. औरंगाबाद, फुलंब्री, सिल्लोड तालुक्यांतील चार मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली. अजिंठा मंडळात सर्वाधिक १२० मिलिमीटर पाऊस झाला. परभणी जिल्ह्यातील सर्व नऊ तालुक्यांतील ३९ मंडळांमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस झाला.सेलू, पाथरी, पूर्णा तालुक्यांतील मंडळामध्ये अतिवृष्टी झाली. देऊळगाव मंडळामध्ये सर्वाधिक १६५ मिलिमीटर पाऊस झाला. हिंगोली जिल्ह्यातील ३० पैकी २८ मंडळांमध्ये पाऊस झाला. नांदेड जिल्ह्यातील ८० पैकी ५४ मंडळांमध्ये पाऊस झाला. नांदेड तालुक्यातील तुप्पा आणि वसरणी मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली. लातूर जिल्ह्यातील ५३ पैकी ४३ मंडळांमध्ये पाऊस झाला. औसा तालुक्यातील मातोळा मंडळामध्ये सर्वाधिक ६७ मिलिमीटर पाऊस झाला. उस्मानाबाद जिल्ह्यातील ४२ पैकी ३९ मंडळामध्ये हलका ते मध्यम पाऊस झाला. बीड जिल्ह्यातील ६३ पैकी ५५ मंडळांमध्ये हलका ते मध्यम पाऊस झाला.

मंडळनिहाय पाऊस (मिलिमीटरमध्ये) ः औरंगाबाद जिल्हा ः औरंगाबाद ३१, उस्मानपुरा ३६, भावसिंगपुरा ३६, चित्तेपिंपळगाव १८, लाडसावंगी ६०, करमाड २८, कांचनवाडी ४०, हर्सूल ९०, फुलंब्री ४३, आळंद ७०, वडोदाबाजार ८२, पिरबावडा ५०, सिल्लोड ४२, अंजिठा १२०, अंबाई ३६, भराडी ४०, गोळेगाव ४३, निल्लोड ४०, सोयगाव ४६, बनोटी ५७, नागमठाण ४२, गंगापूर ४०, शेंदरवादा ३८, सिद्धनाथ वडगाव ४२.

जालना जिल्हा ः जालना ५३, जालना ग्रामीण १९, विरेगाव ३५, पाचनवडगाव ४२, वाग्रुळ जहागीर ६५, बदनापूर ४६, रोषणगाव ४३, दाभाडी ११५, सेलगाव ४५, बावणे पांगरी ५०, भोकरदन ३५, धावडा ३९, पिंपळगाव रेणुकाई ४५, हस्नाबाद १२०, राजूर ५२, केदारखेडा ३८, अनवा ४५, परतूर ८०, सातोना १७३, श्रीष्टी ७८, वाटूर ५७, मंठा ५२, ढोकसाल ४४, वडीगोद्री ४१, घनसावंगी ५६, रांजणी ४०.

परभणी जिल्हा ः परभणी शहर ५८, परभणी ग्रामीण ५१, सिंगणापूर ४०, दैठणा ५०, झरी ६०, पेडगाव ४४, जांब ५१, बोरी ४२, सेलू १५७, देऊळगाव १६५, कुपटा ८५, वालूर ९०, चिकलठाणा ९२, मानवत ५९, केकरजवळा ४५, कोल्हा ६१, पाथरी ९९, हदगाव ७८, ताडकळस ४२, लिमला ३६, कात्नेश्वर ३६, महातपुरी ३६.

हिंगोली जिल्हा ः आखाडा बाळापूर ४८, वसमत ४६, हट्टा ४३, टेंभुर्णी ६१, हयातनगर ६३, जवळा बाजार ४२. नांदेड जिल्हा ः नांदेड शहर ४१, नांदेड ग्रामीण २६, तुप्पा ८७, विष्णुपुरी ५५, वसरणी ८९, तरोडा ३४, लिंबगाव ५१, भोकर ४५, उमरी ३९, सिंधी ४५, करखेली ३८, कंधार ३५, फुलवळ ४०, लोहा ३०, कलंबर ३६. लातूर जिल्हा ः मातोळा ६७, भादा १७, अहमदपूर १७, औराद शहाजनी १७.

उस्मानाबाद जिल्हा ः उस्मानाबाद शहर ३५, सालगरा ३१, येरमाळा ३३, मोहा ३८, मानकेश्वर २६, वाशी २१, तेरखेडा २३, पारगाव ४२. बीड जिल्हा ः बीड ५२, मांजरसुंभा ४३, चौसाळा ४०, नेकनूर ३८, कडा ३७, पिंपळा ३३, चकलंबा ४५, शिरुर कासार ४०, गंगामसला ३०, हनुमंत पिंपरी ३०.

२१ मंडळांमध्ये अतिवृष्टी (पाऊस मिलिमीटरमध्ये)
औरंगाबाद जिल्हा ः हर्सूल ९०, वडोदा बाजार ८२, आळंद ७०, अजिंठा १२०. जालना जिल्हा ः वाग्रुळ जहांगीर ६५, दाभाडी ११५, हस्नाबाद १२०, परतूर ८०, सातोना १७३, श्रीष्टी ८२. परभणी जिल्हा ः सेलू १५७, देऊलगाव १६५, कुपटा ८५, वालूर ९०, चिकलठाणा ९०, पाथरी ९९, हदगाव ९५, कात्नेश्वर ९५. नांदेड जिल्हा ः तुप्पा ८७, वसरणी ८९. लातूर जिल्हा ः मातोळा ६७.


इतर ताज्या घडामोडी
खानदेशात कांदेबाग केळी लागवडीची तयारी...जळगाव : खानदेशात कांदेबाग केळी लागवडीची तयारी...
औरंगाबाद, जालना, परभणीत बहुतांश मंडळांत...औरंगाबाद : औरंगाबाद, जालना, परभणी या तीनही...
नाशिक बाजार समितीतील कर्मचारी...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
सोलापूर जिल्हा परिषदेत सेसफंड, करनिधी...सोलापूर  ः कोरोनामुळे कधी नव्हे, ती सहा-सात...
नगर जिल्ह्यात शेततळ्यांच्या कामांची...नगर ः दुष्काळी परिस्थितीत शेततळ्याच्या पाण्यावर...
पूर्णा नदी काठच्या गावांना सतर्कतेचा...हिंगोली  ः ‘‘जिल्ह्यातील पूर्णा नदीवरील...
वाखारी येथे शेतकरी, शेतमजुरांना कौशल्य...पुणे ः कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा व...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात १४२...नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील १४२...
दहिवडीत शेतीकामांच्या मजुरीदरांसह...नाशिक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शेतीव्यवस्था...
औरंगाबाद, जालना जिल्ह्यात दीड लाख...औरंगाबाद  : दोन जिल्ह्यांतील साडेचार हजारावर...
उजनीची पाणीपातळी २८ टक्केवर सोलापूर  ः पुणे जिल्ह्यातील पावसाच्या...
वरखेडीतील पशुधनाचा बाजार उद्यापासून...पाचोरा, जि.जळगाव  ः वरखेडी (ता.पाचोरा) येथील...
जळगाव जिल्ह्यात शेतकऱ्यांवर लिंबं...भडगाव, जि.जळगाव  ः जिल्ह्यात लिंबू पिकासाठी...
कृषी महाविद्यालयाच्या जागेचा प्रश्न...भंडारा : कृषी महाविद्यालयाच्या प्रस्तावित...
परभणी जिल्ह्यात कपाशी बियाण्याच्या साडे...परभणी : जिल्ह्यात यंदा खरीप हंगामात विविध...
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ७०...वैभववाडी, जि. सिंधुदुर्ग ः ऑगस्ट महिन्यात मुदत...
चंद्रपूर जिल्ह्यात कापूस कोंडीत भर...चंद्रपूर : येत्या  हंगामातील कापूस खरेदीसाठी...
पंधरा शेतकऱ्यांच्या सौरकृषी पंपात...चंद्रपूर : मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेअंतर्गत...
जलालखेडा येथील दीडशे शेतकरी...नागपूर : खरीप कर्जाचे वाटप शनिवार (ता. १५) पर्यंत...
सांगली जिल्ह्यात डाळिंब संकटांच्या...सांगली ः वातावरणातील बदलाने डाळिंबावर तेलकट डाग...