नांदेड, परभणी, हिंगोलीत हलका ते मध्यम पाऊस

नांदेड, परभणी, हिंगोलीतील ३० तालुक्यांमध्ये पाऊस
नांदेड, परभणी, हिंगोलीतील ३० तालुक्यांमध्ये पाऊस

नांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील ३० तालुक्यांतील १४५ मंडळांमध्ये रविवारी (ता. २८) सकाळी आठपर्यंतच्या २४ तासांमध्ये हलका ते मध्यम पाऊस झाला. या तीन जिल्ह्यांतील अनेक भागांत शनिवारी (ता. २७) रात्री तसेच रविवारी (ता. २८) दुपारपर्यंत अधून मधून रिमझिम पावसाच्या सरी येत होत्या. ओढे, नाले, नद्या प्रवाहित होण्यासाठी मोठ्या पावसाची गरज आहे. 

नांदेड जिल्ह्यतील १६ तालुक्यांतील ७६ मंडळांमध्ये हलका ते मध्यम पाऊस झाला. किनवट, माहूर, धर्माबाद तालुक्यांतील मंडळांमध्ये पावसाचा जोर होता. किनवट मंडळामध्ये सर्वाधिक ४१ मिलिमीटर पाऊस झाला. परभणी जिल्ह्यातील सर्व ९ तालुक्यांतील ३९ मंडळांमध्ये हलका पाऊस झाला. सेलू तालुक्यातील देऊळगाव मंडळामध्ये सर्वाधिक ४० मिलिमीटर पाऊस झाला. हिंगोली जिल्ह्यातील सर्व ५ तालुक्यांतील ३० मंडळांमध्ये हलका ते मध्यम पाऊस झाला. हिंगोली तालुक्यातील डिग्रस मंडळामध्ये सर्वाधिक २२ मिलिमीटर पाऊस झाला.

मंडळनिहाय पाऊस (मिलिमीटरमध्ये)  नांदेड जिल्हा ः नांदेड ९, नांदेड ग्रामीण ६, वजीराबाद १०, वसरणी १०, तरोडा ९, लिंबगाव ९, तुप्पा १२, विष्णुपुरी १०, अर्धापूर २, मालेगाव ५, मुदखेड ९, मुगट ८, बारड २७, हदगाव २१, तामसा ८, मनाठा १५, पिंपरखेड १६, आष्टी १०, निवघा १२, तळणी ११, माहूर २९ , वाई २६, सिंदखेड २७, किनवट ४१, इस्लापूर २३, मांडवी २०, बोधडी ३०, दहेली ३२, जलधारा ३४, शिवणी २५, हिमायतनगर २२, सरसम १९, जवळगांव १५, भोकर ८, किनी १२, मोघाली १०, मातुल ७, उमरी ११, सिंदी ६, गोलेगांव २०, धर्माबाद २०, जारिकोट २३, करखेली १९, नायगांव १२, नरसी ११, मांजरम १२, बरबडा १७, कुंटूर २३, बिलोली १५, कुंडलवाडी २९, सगरोळी १३, आदमपूर ६, लोहगांव ५, देगलूर ५, खानापूर ४, मुखेड ४, चांदोळा १० , कंधार ७, फुलवल ८, उस्मानननगर १५, बारुळ १२, पेठवडज २१, लोहा १२,  कलंबर २२, शेवडी २२, सोनखेड २१, कापसी १८.

परभणी जिल्हा ः परभणी १४, परभणी ग्रामीण २०, पेडगाव ११, जांब १३, सिंगणापूर १५, दैठणा १९, झरी ४, बोरी ५ , जिंतूर ४, चारठाणा १०, बामणी ६, सावंगी म्हाळसा ४, आडगाव ५, सेलू २०, देऊळगाव ४०, कुपटा ४ वालूर ५, चिकलठाणा ५, मानवत ३९, केकरजवळा १४, कोल्हा १७, पाथरी ३७, बाभळगांव २१, हादगाव १२, सोनपेठ ७, आवलगाव ६, गंगाखेड ५, राणीसावरगाव ५, माखणी ५, महातपुरी १०, पालम १६, बनवस ६, पूर्णा १७, ताडकळस १२, चुडावा १७, लिमला ११, कात्नेश्वर ८.

हिंगोली जिल्हा ः हिंगोली १७, खंबाळा १३, माळहिवरा २०, सिरसम १५, बासंबा १४, नरसी नामदेव १७, डिग्रस २२, कळमनुरी १७, नांदापूर १५, आखाडा बाळापूर १७, डोंगरकडा १४, वारंगा फाटा ९, वाकोडी ११, गोरेगाव २१, आजेगाव १८, पानकनेरगाव १२, हत्ता ५, वसमत १०, हट्टा ८, कुरुंदा १२, हयातनगर ८, औंढा नागनाथ ५, जवळा बाजार ५, येळेगाव ५, साळणा ८.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com