मुंबई ः येत्या सोमवारपासून नागपूर येथे सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात अंतिम आठवडा प्रस्त
ताज्या घडामोडी
मराठवाड्यातील ४२ मंडळांत पाऊस
औरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना व उस्मानाबाद या तीन जिल्ह्यांतील १५० पैकी केवळ ४२ मंडळांत बुधवारी (ता. ९) सकाळपर्यंतच्या २४ तासांत पावसाने हजेरी लावली. बीड व लातूर जिल्ह्याकडे मात्र पावसाने पाठच फिरविली. मात्र, या पावसाने सोयाबीन काढणीत काहीवेळ अडथळा आणला.

औरंगाबाद जिल्ह्यातील ६५ मंडळांपैकी १९ मंडळांत पाउस झाला. त्यामध्ये औरंगाबाद मंडळात २५, उस्मानानपूरा ३६, भावसिंगपुरा ३३, चित्तेपिंपळगाव ३२, आडूळ ४८, तर देवगाव रंगारीत ४८ मिलिमीटर पाऊस झाला. तो वगळता उर्वरित मंडळांत १ ते २० मिलिमीटरदरम्यान पाऊस झाला. सोयगाव तालुक्यातील तीनपैकी एकाही मंडळात पाऊस झाला नाही.
जालना जिल्ह्यातील ४३ मंडळांपैकी १८ मंडळात पाऊस झाला. तुरळक, हलका ते मध्यम स्वरूपाचा हा पाऊस जालना तालुक्यातील पाच, बदनापूर तालुक्यातील एक, भोकरदनमधील दोन, जाफ्राबादमधील पाच, अंबडमधील चार व घनसांवंगी तालुक्यातील एका मंडळात झाल्याची नोंद घेतली गेली.
अंबडमधील रोहीलागड मंडळात सर्वाधिक ५२ मिलिमीटर, त्यापाठोपाठ अंतरवली टेंबी मंडळात २०, सिपोरा बाजार मंडळात ३९, रामनगरमध्ये २१ मिलिमीटर पाऊस झाला. परतूर, मंठा तालुक्यातील एकाही मंडळात पाऊस झाला नाही. बीड ६३ व लातूर जिल्ह्यातील ५३ मंडळांत पाऊस झाला नाही. उस्मानाबाद जिल्ह्यातील उस्मानाबाद, लोहारा, कळंब, भूम, वाशी आदी तालुक्याकडे पावसाने पाठ फिरविली. मात्र परंड्यातील दोन, उमरग्यातील १ व तुळजापुरातील दोन मंडळांत त्याने हलकी हजेरी लावली.
- 1 of 587
- ››