Agriculture news in marathi, Rainfall in 42 circles in Marathwada | Page 2 ||| Agrowon

मराठवाड्यातील ४२ मंडळांत पाऊस
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 10 ऑक्टोबर 2019

औरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना व उस्मानाबाद या तीन जिल्ह्यांतील १५० पैकी केवळ ४२ मंडळांत बुधवारी (ता. ९) सकाळपर्यंतच्या २४ तासांत पावसाने हजेरी लावली. बीड व लातूर जिल्ह्याकडे मात्र पावसाने पाठच फिरविली. मात्र, या पावसाने सोयाबीन काढणीत काहीवेळ अडथळा आणला.

औरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना व उस्मानाबाद या तीन जिल्ह्यांतील १५० पैकी केवळ ४२ मंडळांत बुधवारी (ता. ९) सकाळपर्यंतच्या २४ तासांत पावसाने हजेरी लावली. बीड व लातूर जिल्ह्याकडे मात्र पावसाने पाठच फिरविली. मात्र, या पावसाने सोयाबीन काढणीत काहीवेळ अडथळा आणला.

औरंगाबाद जिल्ह्यातील ६५ मंडळांपैकी १९ मंडळांत पाउस झाला. त्यामध्ये औरंगाबाद मंडळात २५, उस्मानानपूरा ३६, भावसिंगपुरा ३३, चित्तेपिंपळगाव ३२, आडूळ ४८, तर देवगाव रंगारीत ४८ मिलिमीटर पाऊस झाला. तो वगळता उर्वरित मंडळांत १ ते २० मिलिमीटरदरम्यान पाऊस झाला. सोयगाव तालुक्‍यातील तीनपैकी एकाही मंडळात पाऊस झाला नाही.  

जालना जिल्ह्यातील ४३ मंडळांपैकी १८ मंडळात पाऊस झाला. तुरळक, हलका ते मध्यम स्वरूपाचा हा पाऊस जालना तालुक्‍यातील पाच, बदनापूर तालुक्‍यातील एक, भोकरदनमधील दोन, जाफ्राबादमधील पाच, अंबडमधील चार व घनसांवंगी तालुक्‍यातील एका मंडळात झाल्याची नोंद घेतली गेली.

अंबडमधील रोहीलागड मंडळात सर्वाधिक ५२ मिलिमीटर, त्यापाठोपाठ अंतरवली टेंबी मंडळात २०, सिपोरा बाजार मंडळात ३९, रामनगरमध्ये २१ मिलिमीटर पाऊस झाला. परतूर, मंठा तालुक्‍यातील एकाही मंडळात पाऊस झाला नाही. बीड ६३ व लातूर जिल्ह्यातील ५३  मंडळांत पाऊस झाला नाही. उस्मानाबाद जिल्ह्यातील उस्मानाबाद, लोहारा, कळंब, भूम, वाशी आदी तालुक्‍याकडे पावसाने पाठ फिरविली. मात्र परंड्यातील दोन, उमरग्यातील १ व तुळजापुरातील  दोन मंडळांत त्याने हलकी हजेरी लावली.

इतर ताज्या घडामोडी
पावसामुळे नाशिक जिल्ह्यातील...नाशिक   : जिल्ह्यात द्राक्ष हंगामाला...
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा...अकोला  ः डॉ. पंजाबराव देशमुख कृषी...
फलटण तालुक्यात द्राक्षांचे घट फुटले;...सातारा  : फलटण तालुक्यातील निरगुडी, गिरवी,...
रसायनांच्या परिणामकारकतेसाठी नोझल,...तणनाशकाचे गुणधर्म असलेला एखादा क्रियाशील घटक...
जळगावात आले २८०० ते ५२०० रुपये...जळगाव  : कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...
वऱ्हाडात सरासरी ६१.५९ टक्के मतदानअकोला ः गेल्या १५ दिवसांपासून सुरू असलेल्या...
सोलापूर जिल्ह्यात मतदान शांततेतसोलापूर ः सोलापूर जिल्ह्यात रात्रभर पडत असलेल्या...
एकात्मिक कीड नियंत्रणासाठी स्वयंचलित...किडीच्या एकात्मिक नियंत्रणासाठी विविध प्रकारच्या...
दिंडोरी, नाशिक भागांत डाऊनीचा...नाशिक   : जिल्ह्यात दिंडोरी, नाशिक...
इंदापुरात १२०० एकर द्राक्ष बागा उद्‌...भवानीनगर, जि. पुणे  : इंदापूर तालुक्‍यातील...
सांगली जिल्ह्यात २० टक्के क्षेत्रावर...सांगली  ः गेल्या आठवड्यात झालेला पाऊस,...
पुणे जिल्ह्यात सर्वदूर पावसाची हजेरीपुणे : जिल्ह्याच्या सर्वच भागांत दोन-तीन...
अमेरिकेमध्ये कपाशीवर विषाणुजन्य ब्ल्यू...अमेरिकेमध्ये कपाशीवर प्रथमच विषाणूजन्य ब्ल्यू...
नगर जिल्ह्यात अजूनही १४२ टॅंकर सुरूचनगर ः पावसाळा संपला असला तरी अजूनही जिल्ह्यातील...
पावसामुळे लांबला कापसाचा हंगामराळेगाव, जि. यवतमाळ ः अति पावसामुळे कापसाचा हंगाम...
जळगाव, पुणे जिल्ह्यात ईव्हीएम, ...जळगाव  ः जिल्ह्यात सोमवारी मतदानाच्या दिवशी...
सोलापूर जिल्ह्यात पावसाचा पहिल्यांदाच...सोलापूर ः सोलापूर जिल्ह्यात गेल्या दोन...
कोयनेसह पाच धरणांतून विसर्गसातारा  ः जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत...
जिल्हा बँकांबाबत अनास्कर यांनी ...पुणे  : राज्यातील शेतकऱ्यांच्या घामाच्या...
कपाशीवरील दहिया रोगाचे एकात्मिक...कपाशीचे पीक हे साधारणतः सहा महिने किंवा...