नगर जिल्ह्यातील ५२ महसूल मंडळांत पावसाची हजेरी

नगर जिल्ह्यातील ५२ महसूल मंडळांत पावसाची हजेरी
नगर जिल्ह्यातील ५२ महसूल मंडळांत पावसाची हजेरी

नगर : शहरासह जिल्ह्याच्या अनेक भागांत मंगळवारी (ता. २४) रात्री जोरदार पाऊस झाला. शहरासह जिल्ह्यामधील बावन्न महसूल मंडळांमध्ये आणि हजेरी लावली. पारनेर तालुक्यातील भाळवणी व अन्य परिसरांमध्ये झालेल्या पावसामुळे सीना नदीला पूर आला. बुधवारी दुपारी ही अनेक भागांत पाऊस झाला. रब्बी पेरणीला वेग येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

नगर यामध्ये अजूनही असल्याने केले जात आहे. दरम्यान मंगळवारी रात्री त्यामध्ये पावसाने हजेरी लावली. पारनेर, नगर, कर्जत तर कोपरगाव, अकोले तालुक्यांत पाऊस झाला. १ पावसाळ्याचे तीन महिने उलटले तरी अजूनही अनेक भागांत जोरदार पाऊस नसल्याने रब्बी पेरणीबद्दल चिंता व्यक्त केली जात असताना, दोन दिवसांपासून जिल्हाभरात पाऊस पडत आहे. 

मंगळवारी रात्री जिल्हाभरातील सुमारे ५२ महसूल मंडळांमध्ये पावसाने कमी-जास्त प्रमाणात हजेरी लावली. बुधवारी दुपारी ही जिल्ह्याच्या अनेक भागांत पाऊस झाला. परतीचा पाऊस सुरू झाला नाही. मात्र, आठ दिवसांपासून गायब असलेल्या पावसाने पुन्हा हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांत समाधान व्यक्त केले जात असून, या पावसाने रब्बी पेरणीला वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

पारनेर तालुक्यात मंगळवारी रात्री चांगला पाऊस झाल्याची नोंद आहे. मंगळवारच्या पावसाने अनेक भागांमध्ये गाव तलाव भरणारा तसेच पाणीपातळी वारीला काहीसा हातभार लागणार आहे. 

मंगळवारी रात्री झालेला पाऊस असा ः पेडगाव ९, श्रीगोंदा अकरा, चिंबळा १९, कष्टी १९, देवदैठण १२, बेलवंडी २५, कर्जत ११, वांबोरी २७, ब्राह्मणी बारा ताहाराबाद १५, कापूरवाडी २२, भिंगार २५, चास २४, पारनेर ३९, सुपा ४२, टाकळी ढोकेश्वर ४२, पळशी २३, भाळवणी ६३, घारगाव वीस, ब्राह्मणवाडा ४४, विरगाव ५६, साकीरवाडी ३२.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com