Agriculture news in marathi, Rainfall in 90 circles of Marathwada | Agrowon

मराठवाड्यातील ९१ मंडळांत पाऊस

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 24 सप्टेंबर 2019

औरंगाबाद : मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांतील २७२ पैकी ९१ मंडळांत सोमवारी (ता.२३) सकाळपर्यंतच्या २४ तासांत पावसाने हजेरी लावली. लातूरकडे पावसाने पाठ फिरविली. जालना जिल्ह्यातील दोन व बीड जिल्ह्यातील एका मंडळात ६५ मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला. बहुतांश मंडळांत पावसाची हजेरी तुरळक ते हलक्‍या स्वरूपाची राहिली. 

औरंगाबाद : मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांतील २७२ पैकी ९१ मंडळांत सोमवारी (ता.२३) सकाळपर्यंतच्या २४ तासांत पावसाने हजेरी लावली. लातूरकडे पावसाने पाठ फिरविली. जालना जिल्ह्यातील दोन व बीड जिल्ह्यातील एका मंडळात ६५ मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला. बहुतांश मंडळांत पावसाची हजेरी तुरळक ते हलक्‍या स्वरूपाची राहिली. 

औरंगाबाद जिल्ह्यातील ६५ पैकी २६ मंडळांत पाऊस झाला. औरंगाबाद व पैठण तालुक्‍यात पावसाचा जोर अधिक राहिला. चित्तेपिंपळगाव मंडळात ५२ मिलिमीटर पाऊस झाला. लाडसावंगी ५५, करमाड १७, हर्सूल २०, फुलंब्री १७, पाचोड ३९, विहामांडवा २१, निल्लोड १५, सावलदबार १६, नागमठाण २३, चापानेर १५; तर सुलतानपूर येथे २१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. 

जालना जिल्ह्यातील ४९ पैकी ३६ मंडळांत पावसाची हजेरी लागली. सर्वाधिक ७८ मिलिमीटर पाऊस वडीगोद्री मंडळात; तर त्यापाठोपाठ ७१ मिलिमीटर पाऊस गोंदी मंडळात झाला. अंबड व घनसावंगी तालुक्‍यात पावासाचा जोर अधिक होता. जिल्ह्यातील जालना ग्रामीण मंडळात १५ मिलिमीटर, रामनगर १८, पाचनवडगाव १६, वाघ्रुळ जहांगीर १५, दाभाडी १८, परतूर १८, सातोना १९, आष्टी २६, मंठा ३६, ढोकसाल २५, अंबड २६, धनगरपिंप्री ३७, जामखेड २१, रोहिलागड १८, सुखापरी १७, राणीउंचेगाव ३२, रांजणी १८, तिर्थपुरी २४, अंतरवली टेंबी २०; तर जांब समर्थ येथे ५० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. 

बीड जिल्ह्यातील ६३ पैकी २२ मंडळांत तुरळक, हलका ते मध्यम पाऊस झाला. परळी मंडळात सर्वाधिक ६५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. त्यापाठोपाठ जातेगाव मंडळात ४० मिलिमीटर, गेवराई ३६, धोंडराई ३०, उमापूर ५० मिलिमीटर इतक्‍या दखलपात्र पावसाची नोंद झाली. उर्वरित मंडळात तुरळक ते हलका पाऊस झाला. केज, धारूर, आष्टी, शिरूर कासार आदी तालुक्‍यांकडे पावसाने पाठ फिरविली.

संपूर्ण लातूर जिल्ह्यात सोमवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत पावसाचा टिपूसही बरसला नाही. उस्मानाबाद जिल्ह्यातील ४२ पैकी केवळ लोहारा मंडळात सर्वाधिक ३१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. उर्वरित ७ मंडळांत १ ते १२ मिलिमीटर दरम्यान पावसाची नोंद झाली. 

६५ मिलिमीटरवरील पावसाची मंडळे (मिमी)

वडीगोद्री ७८
गोंदी ७१
परळी ६५

 


इतर बातम्या
खानदेशात तिसऱ्या दिवशीही रिमझिम सुरूचजळगाव : खानदेशात मागील तीन दिवस सतत रिमझिम सुरू...
सोलापूर जिल्ह्यात भिज पाऊस, जोर नाहीचसोलापूर  ः गेल्या अनेक दिवसांपासूनच्या...
पावसाची सर्वदूर संततधार; धरणसाठ्यात वाढपुणे : गेल्या दोन दिवसापासून राज्यातील बहुतांशी...
पुणे जिल्ह्याच्या धरणक्षेत्रात पावसाची...पुणे ः पुणे जिल्ह्यातील बहुतांशी भागात पावसाचा...
राज्यात आज आणि उद्या पाऊस जोर धरणारपुणे :  गेल्या तीन ते चार दिवसापासून...
वऱ्हाडात पावसाची संततधार सुरूअकोला ः मागील दोन दिवसांपासून वऱ्हाडात पाऊस...
नागपूर जिल्ह्यात मोठा आणि तान्हा पोळा...नागपूर : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे...
पंतप्रधान किसान ट्रॅक्टर योजना... पुणे : ‘पंतप्रधान किसान ट्रॅक्टर योजना...
औरंगाबाद जिल्ह्यात शेतकऱ्यांना ८५००...औरंगाबाद :  जिल्ह्यातील ९६३ शेतकऱ्यांकडून...
मराठवाड्यात सुमारे ४७ लाख हेक्टरवर खरीपऔरंगाबाद : मराठवाड्यातील खरिपाचे सर्वसाधारण...
गाव करतेय गवतांचे संवर्धन शाश्वत प्रगतीच्या मार्गावर निघालेले...
खानदेशात तीन दिवसांपासून भिज पाऊसजळगाव  ः खानदेशात मागील तीन दिवसांपासून भिज...
अमळनेरमध्ये रासायनिक खतांचा वापर वाढलावावडे, जि. जळगाव  : अमळनेर तालुक्यात जवळपास...
खडकवासलातून ११ हजार ७३५ क्युसेक विसर्गपुणे : खडकवासला धरणातून बुधवार (ता. १२) पासून...
सातपुड्यात मूगाच्या नुकसानीची शक्यताजळगाव  ः खानदेशात सातपुडा पर्वत भागात पाऊस...
गडचिरोलीत युरियाची कृत्रिम टंचाईगडचिरोली : जिल्ह्यात दोन महिन्यानंतर बरसलेल्या...
परभणीत बँकांचे उंबरठे झिजवून...परभणी : यंदा खरीप हंगामात जिल्ह्यातील बॅंका...
मुंगळा परिसरात रानडुकरांचा धुडगूसमुंगळा जि. वाशीम ः चांगल्या पावसामुळे यंदा या...
‘रासाका’ सुरू करा, अन्यथा उपोषण’नाशिक : यंदाचा ऊस गाळप हंगाम ऑक्टोबर महिन्यापासून...
एफआरपी थकविणाऱ्या कारखान्यांवर कारवाई...नांदेड ः प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालया...