पाच जिल्ह्यांत पुन्हा पावसाच्या सरी

पाच जिल्ह्यांत पुन्हा पावसाच्या सरी
पाच जिल्ह्यांत पुन्हा पावसाच्या सरी

औरंगाबाद : पावसाचे प्रमाण घटले असले तरी सलग दुसऱ्या दिवशीच्या चोवीस तासांत मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद व लातूर या पाच जिल्ह्यांतील ९८ मंडळांत पावसाची तुरळक ते हलकी हजेरी लागली. मात्र, पडणारा पाऊस नैसर्गिक की कृत्रिम, हे प्रश्‍नचिन्ह कायम आहे. 

मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद व लातूर या पाच जिल्ह्यांतील ९८ मंडळात शुक्रवारी (ता. २३) सकाळपर्यंतच्या चोवीस तासांत तुरळक, हलक्‍या पावसाची हजेरी लागली. त्यामध्ये औरंगाबादमधील २२, जालना व बीडमधील प्रत्येकी १३, लातूरमधील २९, तर उस्मानाबादमधील २१ मंडळांचा समावेश आहे. लातूर जिल्ह्यातील काही मंडळात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. 

औरंगाबाद तालुक्‍यातील ४, पैठण १, सिल्लोड २, सोयगाव १, वैजापूर ३, गंगापूर ५, कन्नड ५, तर खुल्ताबादमधील एका मंडळात पावसाची हजेरी लागली. लोहगाव मंडळात १५, अंबाई १४, लासूरगाव मंडळात २१ मिलिमिटर पाऊस झाला. उर्वरित मंडळात तुरळक ते हलका पाऊस झाला. जालना जिल्ह्यातील ४९ पैकी १३ मंडळांत पाऊस झाला. धनगरपींप्री १७, अंबड १०, परतूर १७ मिलिमिटर पाऊस झाला. उर्वरित मंडळातील पावसाची हजरी तुरळकच राहिली. 

बीड जिल्ह्यातील ६३ पैकी केवळ १३ मंडळांत तुरळक पाऊस झाला. चौसाळा मंडळात २०, कि. आडगाव मंडळात २० व माजलगाव मंडळात ११.२० मिलिमिटर पाऊस झाला. लातूर जिल्ह्यातील ५३ पैकी २९ मंडळांत पाऊस झाला. काही मंडळांत समाधानकारक पाऊस झाला. लातूर तालुक्‍यातील ६, औसा ७, रेणापूर, अहमदपूर, चाकूर आदी तालुक्‍यांतील प्रत्येकी १, निलंगामधील ७, देवणी व शिरूर अनंतपाळमधील प्रत्येकी ३ मंडळांत पाऊस झाला. लातूर मंडळात ३९ मिलिमिटर, मुरूड १८, बाभळगाव १७, हरंगुळ बु. १८, औसा २१, लामजाना १६, किल्लारी १२, मातोळा २०, भादा २४, बेलकुंड१८, रेणापूर१५, निलंगा १३, अंबूलगा बु. १२, कासार शिरसी २७, मदनसुरी १४, कासारबालकुंदा ११, देवणी बु. ३३, वलांडी १०, बोरोळ २५, शिरूर अनंतपाळ १४, तर साकोळमध्ये १३ मिलिमिटर पाऊस झाला.  उस्मानाबाद जिल्ह्यातील ४२ पैकी २१ मंडळांत पाऊस झाला.

उस्मानाबादमधील ६, तुळजापूर, भूममधील १, उमरगा ४, लोहारा २, कळंब ४, तर वाशी तालुक्‍यातील ३ मंडळांत पाऊस झाला. पाडोळी मंडळात सर्वाधिक २६, तर त्यापाठोपाठ जागजी १९, सावरगाव १०, उमरगा २४, नारगवाडी १४, माकणी १९, मोहा मंडळांत १० मिलिमिटर पाऊस झाला. 

१४ ठिकाणी क्‍लाउड सीडिंग

पावसासाठीच्या कृत्रिम प्रयोगांतर्गत गुरुवारी (ता.२२) जालना, परभणी, बीड जिल्ह्यांत आकाशात १४ ठिकाणी क्‍लाउड सीडिंग करण्यात आले. विभागीय आयुक्‍त सुनील केंद्रे व महसूल उपायुक्‍त सतिश खडके यांनी प्रत्यक्ष प्रयोगासाठीच्या सीडिंगचा अनुभव घेतला. अंबड, घनसावंगी, गंगाखेड, माजलगाव, बीड, गेवराई आदी तालुक्‍यांतील काही गावांत आकाशात पावसायोग्य असलेल्या ढगांवर हे सीडिंग करण्यात आले. या प्रयोगानंतर काही ठिकाणी पाऊस पडल्याचा दावाही प्रशासनातर्फे करण्यात आला. बुधवारी (ता. २१) १९ ठिकाणी क्‍लाउड सीडिंग करण्यात आले होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com