Agriculture news in marathi, Rainfall again in five districts in Marathvada | Page 2 ||| Agrowon

पाच जिल्ह्यांत पुन्हा पावसाच्या सरी
टीम अॅग्रोवन
शनिवार, 24 ऑगस्ट 2019

औरंगाबाद : पावसाचे प्रमाण घटले असले तरी सलग दुसऱ्या दिवशीच्या चोवीस तासांत मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद व लातूर या पाच जिल्ह्यांतील ९८ मंडळांत पावसाची तुरळक ते हलकी हजेरी लागली. मात्र, पडणारा पाऊस नैसर्गिक की कृत्रिम, हे प्रश्‍नचिन्ह कायम आहे. 

औरंगाबाद : पावसाचे प्रमाण घटले असले तरी सलग दुसऱ्या दिवशीच्या चोवीस तासांत मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद व लातूर या पाच जिल्ह्यांतील ९८ मंडळांत पावसाची तुरळक ते हलकी हजेरी लागली. मात्र, पडणारा पाऊस नैसर्गिक की कृत्रिम, हे प्रश्‍नचिन्ह कायम आहे. 

मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद व लातूर या पाच जिल्ह्यांतील ९८ मंडळात शुक्रवारी (ता. २३) सकाळपर्यंतच्या चोवीस तासांत तुरळक, हलक्‍या पावसाची हजेरी लागली. त्यामध्ये औरंगाबादमधील २२, जालना व बीडमधील प्रत्येकी १३, लातूरमधील २९, तर उस्मानाबादमधील २१ मंडळांचा समावेश आहे. लातूर जिल्ह्यातील काही मंडळात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. 

औरंगाबाद तालुक्‍यातील ४, पैठण १, सिल्लोड २, सोयगाव १, वैजापूर ३, गंगापूर ५, कन्नड ५, तर खुल्ताबादमधील एका मंडळात पावसाची हजेरी लागली. लोहगाव मंडळात १५, अंबाई १४, लासूरगाव मंडळात २१ मिलिमिटर पाऊस झाला. उर्वरित मंडळात तुरळक ते हलका पाऊस झाला. जालना जिल्ह्यातील ४९ पैकी १३ मंडळांत पाऊस झाला. धनगरपींप्री १७, अंबड १०, परतूर १७ मिलिमिटर पाऊस झाला. उर्वरित मंडळातील पावसाची हजरी तुरळकच राहिली. 

बीड जिल्ह्यातील ६३ पैकी केवळ १३ मंडळांत तुरळक पाऊस झाला. चौसाळा मंडळात २०, कि. आडगाव मंडळात २० व माजलगाव मंडळात ११.२० मिलिमिटर पाऊस झाला. लातूर जिल्ह्यातील ५३ पैकी २९ मंडळांत पाऊस झाला. काही मंडळांत समाधानकारक पाऊस झाला. लातूर तालुक्‍यातील ६, औसा ७, रेणापूर, अहमदपूर, चाकूर आदी तालुक्‍यांतील प्रत्येकी १, निलंगामधील ७, देवणी व शिरूर अनंतपाळमधील प्रत्येकी ३ मंडळांत पाऊस झाला. लातूर मंडळात ३९ मिलिमिटर, मुरूड १८, बाभळगाव १७, हरंगुळ बु. १८, औसा २१, लामजाना १६, किल्लारी १२, मातोळा २०, भादा २४, बेलकुंड१८, रेणापूर१५, निलंगा १३, अंबूलगा बु. १२, कासार शिरसी २७, मदनसुरी १४, कासारबालकुंदा ११, देवणी बु. ३३, वलांडी १०, बोरोळ २५, शिरूर अनंतपाळ १४, तर साकोळमध्ये १३ मिलिमिटर पाऊस झाला. 
उस्मानाबाद जिल्ह्यातील ४२ पैकी २१ मंडळांत पाऊस झाला.

उस्मानाबादमधील ६, तुळजापूर, भूममधील १, उमरगा ४, लोहारा २, कळंब ४, तर वाशी तालुक्‍यातील ३ मंडळांत पाऊस झाला. पाडोळी मंडळात सर्वाधिक २६, तर त्यापाठोपाठ जागजी १९, सावरगाव १०, उमरगा २४, नारगवाडी १४, माकणी १९, मोहा मंडळांत १० मिलिमिटर पाऊस झाला. 

१४ ठिकाणी क्‍लाउड सीडिंग

पावसासाठीच्या कृत्रिम प्रयोगांतर्गत गुरुवारी (ता.२२) जालना, परभणी, बीड जिल्ह्यांत आकाशात १४ ठिकाणी क्‍लाउड सीडिंग करण्यात आले. विभागीय आयुक्‍त सुनील केंद्रे व महसूल उपायुक्‍त सतिश खडके यांनी प्रत्यक्ष प्रयोगासाठीच्या सीडिंगचा अनुभव घेतला. अंबड, घनसावंगी, गंगाखेड, माजलगाव, बीड, गेवराई आदी तालुक्‍यांतील काही गावांत आकाशात पावसायोग्य असलेल्या ढगांवर हे सीडिंग करण्यात आले. या प्रयोगानंतर काही ठिकाणी पाऊस पडल्याचा दावाही प्रशासनातर्फे करण्यात आला. बुधवारी (ता. २१) १९ ठिकाणी क्‍लाउड सीडिंग करण्यात आले होते.

इतर बातम्या
सप्टेंबरमधील पावसामुळे प्रकल्पांना...अकोला  : गेल्यावर्षात अत्यल्प पावसामुळे...
पिंपळनेर बाजार समितीत कांद्याला ३१०० ते...पिंपळनेर, जि. धुळे  ः साक्री कृषी उत्पन्न...
तुरुंगात गेलेल्यांनी विचारू नये, की...सोलापूर ः ‘‘मी घरच्यांना सांगून आलो आहे, आता...
शेतीत सुधारित तंत्राने शाश्‍वत उत्पन्न...सोलापूर ः शेतीमध्ये सुधारित तंत्रज्ञान...
येत्या निवडणुकीत जनता पुन्हा आम्हाला...कोल्हापूर ः सरकारने केलेल्या कामाचा लेखाजोखा घेऊन...
मराठवाडा दुष्काळमुक्‍तीसाठी सरकारचे...औरंगाबाद : वॉटर ग्रिड, गोदावरीच्या तुटीच्या...
साताऱ्यातील धरणांमध्ये ९८ टक्‍क्‍यांवर...सातारा : जिल्ह्यातील प्रमुख धरणांच्या पाणलोट...
पुणे ः दूध उत्पादकांना लिटरला एक रूपया...पुणे ः जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना...
नियोजनशून्य कारभारामुळे ६० टक्केच निधी...मुंबई ः भाजप-शिवसेना युती सरकारची पाच वर्षांतील...
लष्करी अळीमुळे येतेय दूध व्यवसायावर संकटनगर ः मक्यावर आलेल्या अमेरिकन लष्करी अळीच्या...
मराठवाडा वॉटर ग्रिडची अंमलबजावणी...परभणी: मराठवाडा वॉटर ग्रिडची अंमलबजावणी व्यापक...
शेतकऱ्यांमध्ये केलेल्या जनजागृतीतून...बुलडाणा  ः कृषी विभागाने लष्करी अळीच्या...
पिंपळगाव बसवंत बाजार समितीत होणार...नाशिक: बाजार समितीचे कार्यक्षेत्र निफाड...
लष्करी अळीची शेतकऱ्यांमध्ये धास्तीरुईखेड मायंबा, जि. बुलडाणा ः ‘‘अमेरिकन लष्करी...
फवारणी केलेला मका चाऱ्यात वापरू नका:...पुणे (प्रतिनिधी)ः  राज्यात सध्या मक्यावर...
लष्करी अळीमुळे डेअरी, पोल्ट्रीला १३००...पुणे : राज्यातील डेअरी व पोल्ट्री उद्योगासाठी...
बाजार समित्यांतील रोख व्यवहारांवरील...नवी दिल्ली ः रोखीच्या व्यवहारांवर नियंत्रण आणून...
‘एफएमओ’चा सह्याद्री फार्म्सला १२०...नाशिक : शेतकरी उत्पादक कंपन्यांनी स्वतःच्या...
मानधनवाढीसाठी आशा कर्मचाऱ्यांचे मूक...नाशिक : आशा व गटप्रवर्तकांचे मानधन तिप्पट...
अकोल्यात पावसाळी वातावरणामुळे मूग...अकोला  ः गेल्या १५ दिवसांपासून कुठे रिमझिम...