मराठवाड्यातील २६६ मंडळांमध्ये पाऊस

राजुरा, येसगाव शिवारात जोरदार पावसामुळे बंधारे भरले
राजुरा, येसगाव शिवारात जोरदार पावसामुळे बंधारे भरले

औरंगाबाद/नांदेड ः मराठवाड्यातील ८ जिल्ह्यांतील ६३ तालुक्यांतील २६६ मंडळांमध्ये रविवारी (ता. २१) सकाळी आठ पर्यंतच्या २४ तासांमध्ये हलका ते जोरदार पाऊस झाला. औरंगाबाद जिल्ह्यातील ८ मंडळे हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांतील प्रत्येकी १ मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली. औरंगाबाद, जालना, नांदेड, हिंगोली, परभणी जिल्ह्यांत पावसाचा जोर होता. लातूर, बीड, उस्मानाबाद जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी पाऊस झाला.

औरंगाबाद जिल्ह्यातील ९ तालुक्यांतील ६३ मंडळांमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस झाला. सिल्लोड, कन्नड तालुक्यांत पावसाचा जोर अधिक होता. अजिंठा (९५ मिमी), अंबाई (१०३ मिमी), गोळेगाव (९१ मिमी), कन्नड (११९ मिमी), चिकलठाणा (६५), चापानेर (१४२ मिमी), नाचनवेल (६९), चिंचोली लिंबाजी (७१) या मंडळामध्ये अतिवृष्टी झाली.

जालना जिल्ह्यातील ८ तालुक्यांतील ३७ मंडळांमध्ये हलका ते मध्यम पाऊस झाला. जालना, भोकरदन, जाफ्रबाद, मंठा तालुक्यांत पावसाचा जोर होता. परभणी जिल्ह्यातील ८ तालुक्यांतील २९ मंडळांमध्ये हलका ते मध्यम पाऊस झाला. हिंगोली जिल्ह्यातील सर्व ५ तालुक्यांतील ३० मंडळांमध्ये हलका ते जोरदार पाऊस झाला. कळमनुरी मंडळामध्ये सर्वाधिक ६९ मिलिमीटर पाऊस झाला. नांदेड जिल्ह्यातील १६ तालुक्यांतील ७४ मंडळांमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस झाला. नांदेड, अर्धापूर, भोकर, उमरी कंधार, लोहा, किनवट, माहूर, बिलोली, नायगाव तालुक्यांत पावसाचा जोर अधिक होता. कुंडलवाडी मंडळांमध्ये सर्वाधिक ७० मिलिमीटर पाऊस झाला.

लातूर जिल्ह्यातील ७ तालुक्यांतील ११ मंडळांमध्ये तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस झाला. उस्मानाबाद जिल्ह्यातील ५ तालुक्यांतील १० मंडळांमध्ये तुरळक ठिकाणी हलका पाऊस झाला. बीड जिल्ह्यातील ५ तालुक्यांतील १२ मंडळांमध्ये हलका ते मध्यम पाऊस झाला.

मंडळनिहाय पाऊस (मिलिमीटरमध्ये) ः औरंगाबाद जिल्हा ः औरंगाबाद १८, उस्मानपुरा ४४, चौका ६४, लाडसावंगी २०, चिकलठाणा २१, फुलंब्री २५, आळंद १७, वडोदे बाजार १५, बिडकीन ३१, आडूळ १८, लोहगाव ६४, ढोरकीन ४६, अजिंठा ९५, अंबाई १०३, अमठाना ४७, भराडी २८, गोळेगाव ९१, निल्लोड २०, बोरगां बाजार २६, सोयगाव ६२, बनोटी ५९, सावलदरबारा ४९, वैजापूर ३१, शिवूर २६, खंडाळा ३४, महालगाव २४, लाडगाव २२, लासुरगाव ३४, गारज ५६, नागमठाण २८, लोणी ५२, बोरसर २७, वाळूज ४७, शेंदूरवादा २६, मांजरी १८, सिध्दनाथ वडगाव ३७, हर्सुल ५५, भेनडाला २४, कन्नड ११८, पिशोर ५९, चिकलठाणा ६५, करंजखेडा ६१, देवगाव रंगारी ३९, चापानेर १४२, नाचनवेल ६९, चिंचोली लिंबाजी ७१, वेरुळ २५, सुलतानपूर ५१, बाजारसावंगी ४७.

जालना जिल्हा ः जालना १७, रामनगर ५२,विरेगाव ४३, पाचनवडगांव ४०, वागूळ जहांगीर ४०, बावणे पांगरी १५,धावडा २४, पिंपळगांव रेणुकाई ४४, राजूर २५, अनवा ४०, जाफराबाद २५, टेंभुर्णी ४१, कुंभारझरी ३६, माहोरा १५, ढोकसाळ ४२, तळणी ३७, पांगरी गोसावी १५,जामखेड २१, रोहिलागड ५४.

परभणी जिल्हा ः परभणी ६, झरी ७, बोरी ५, चारठाणा ५,बामणी १४, सावंगी म्हाळसा ३२, गंगाखेड ७, पालम १३, पूर्णा २०, ताडकळस १०, चुडावा २९.

हिंगोली जिल्हा ः हिंगोली १७, माळहिवरा ३५, सिरसम २७, नरसी नामदेव २२, डिग्रस २७, कळमनुरी ६९, आखाडा बाळापूर २, डोंगरकडा ३३, वाकोडी २४, सेनगांव २९, आजेगाव ४०, साखरा ५७, पानकनेरगांव २४, हत्ता २८, वसमत २१, गिरगांव २४, औंढा नागनाथ ३७, जवळा बाजार २४, येळेगाव १८, साळना २९.

नांदेड जिल्हा ः नांदेड २३, नांदेड ग्रामीण २४, तुप्पा १८, विष्णुपुरी १८, वसरणी २१, वझीराबाद २३, तरोडा २७, लिंबगाव ३०, मुदखेड २७, मुगट ३३, बारड २०, अर्धापूर १८, दाभड २९, मालेगाव ५२, उमरी ४०, सिंधी २९, गोळेगांव ३५, कंधार १६, कुरुला १६, उस्माननगर ३९, पेठवडज १७, फुलवळ २५, बारुळ ३८, लोहा १५, कलंबर २८, सोनखेड ३१, शिवडी २१, कापसी ५१, किनवट १५, इस्लापूर १७, बोधडी ३०, दहेली ४२, शिवणी ७२, माहूर ५३, वानोळा ५६, सिंदखेड २१, निवघा १७, आष्टी १६, हिमातनगर १४, जवळगांव १३, बिलोली १८, आदमपूर १६, लोहगांव ३०, सगरोळी १२, कुंडलवाडी ७०, धर्माबाद १०, जारिकोट १४, नायगाव ३५,नरसी १८,बरबडा ३८, कुंटूर ६२, मुखेड ३०, चांडोळा ३३.

लातूर जिल्हा ः हाडोळती ११. 

बीड जिल्हा ः धामणगाव १६, दौलवडगाव ५९, पिंपळा १३.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com