सातारा जिल्ह्यात पश्चिम भागात पावसाचा जोर कायम

जिल्ह्यात पश्चिम भागात पावसाचा जोर कायम
जिल्ह्यात पश्चिम भागात पावसाचा जोर कायम

सातारा ः जिल्ह्याच्या पश्चिम भागात जोर वाढला असल्याने शेतातील सर्व कामे ठप्प झाली आहे. महाबळेश्वर, जावली, पाटण, सातारा या तालुक्यांत अनेक ठिकाणी दमदार पाऊस येत आहे. या चारही तालुक्यांत सरासरी ५० मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस होत असल्याने अनेक शेतात पाणी साचून पिके कुजण्याचा धोका निर्माण झाला आहे.

जिल्ह्यात पश्चिम भागात पावसाचा जोर कायम राहिल्याने शेतकऱ्यांचा चिंता वाढू लागली आहे. महाबळेश्वर, जावली, पाटण, सातारा, या चार तालुक्यांत पावसाचे प्रमाण अधिक आहे. पावसाचा संततधारेमुळे अनेक ठिकाणी पिके पाण्यात राहिल्याने कुजण्यास प्रारंभ झाला आहे. कराड, कोरेगाव, वाई, खंडाळा या तालुक्यांत कमी अधिक प्रमाणात तशीच परिस्थिती आहे. या तालुक्यातही पावसाचे प्रमाण जास्त आहे. माण, खटाव, फलटण या दुष्काळी तालुक्यांत दमदार पावसाची प्रतीक्षा शेतकऱ्यांना लागून राहिली आहे. या तालुक्यात अजूनही तुरळक पाऊस सुरू असल्याने पिकांचा अवस्था वाईट होऊ लागली आहे.

तालुकानिहाय पाऊस मिलिमीटरमध्ये सातारा- ५४.८९. जावली- ६५.५३, पाटण- ४७.०५, कराड- १६.८५, कोरेगाव- १८.६७, खटाव- १२.३९, माण- २.५७, फलटण- १.११, खंडाळा- ११.२५, वाई- १६.३४, महाबळेश्वर- १५९.०८ एकूण ३१.७८

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com