मराठवाड्यात पावसाचा धुमाकूळ सुरूच

मराठवाड्यात पावसाचा धुमाकूळ सुरूच
मराठवाड्यात पावसाचा धुमाकूळ सुरूच

औरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत पावसाचा धुमाकूळ शुक्रवारी (ता. २५) सकाळपर्यंतच्या २४ तासांत सुरू होता. सहा जिल्ह्यांतील ३१ मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली. बीडमधील माजलगाव तालुक्‍यात सर्वाधिक सरासरी १०७.८३ मिलिमीटर पाऊस झाला. बीडमधीलच वडवणी, परभणीतील सेलू, पाथरी, मानवत, लातूरमधील अहमदपूर, नांदेडमधील मुखेड तालुक्‍यात जोरदार पाऊस झाला. या पावसाने खरिपातील सोयाबीन, मका, कपाशी आदी पिकांना फटका बसला. सीताफळासह इतर फळपिकांचे मोठे नुकसान झाले. औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद व लातूर या पाच जिल्ह्यांतील २७२ मंडळांपैकी २५६ मंडळांत पावसाची हजेरी लागली. 

औरंगाबाद जिल्ह्यातील ६५ पैकी ६१ मंडळांत पाऊस झाला. बहुतांश मंडळात हलका, मध्यम, तर काही ठिकाणी दमदार पाऊस बरसला. पैठण, सिल्लोड, गंगापूर तालुक्‍यांत पावसाचा जोर अधिक होता. जालना जिल्ह्यातील सर्व ४९ मंडळांत पावसाची दमदार हजेरी लागली. घनसावंगी, अंबड, मंठा आदी तालुक्‍यांत पावसाचा जोर होता. बीड जिल्ह्यातील ६३ पैकी ६१ मंडळांत पाऊस झाला. माजलगाव, धारूर, परळी, गेवराई, शिरूर कासार, बीड आदी तालुक्‍यांत सर्वाधिक जोर होता.

 लातूर जिल्ह्यातील ५३ पैकी ५२ मंडळात तुरळक ते हलका पाऊस झाला. अहमदपूर तालुक्‍यात पावसाचा जोर थोडा अधिक होता. उस्मानाबाद जिल्ह्यातील ४२ पैकी ३३ मंडळात तुरळक ते हलका पाऊस झाला. लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यात पावसाचा जोर सर्वांत कमी राहिला. 

जिल्हानिहाय अतिवृष्टीची मंडळे (मि.मी)

औरंगाबाद ः नांदर ६६  जालनाः सातोना ८१, वडीगोद्री ९१, गोंदी ७२ बीड ः पिंपळनेर ११०, गेवराई ६५, धोंडराई ७०, कौडगाव ९६, माजलगाव ९५, गंगामसला ८५, दिंद्रूड ८६, नित्रूड १०४, तालखेड ९७, किं. आडगाव १८०, पिंपळगाव गाडे ७५. लातूर ः अहमदपूर ७६, शिरूर ७०. 

जिल्हानिहाय पावसाची मंडळे (३० मि.मीच्या पुढे)

औरंगाबाद जिल्हा पैठण ४३, बालानगर ३९, पाचोड ६१, आडूळ ४५, लोहगाव ३०, विहामांडवा ५७, पिंपळगाव पी ४२, ढोरकीन ४०,  मांजरी ३२, नाचनवेल ३१, चिंचोली लिंबाजी ३५.
जालना जिल्हा जालना ३५, जालना ग्रामीण ३०, पाचनवडगाव ४०, वाग्रुळ जहांगीर ४०, दाभाडी ४५, सेलगाव ५०, बावणे पांगरी ३०, हस्नाबाद ३५, राजूर ४०, परतूर ४१, आष्टी ५४, मंठा ४०, ढोकसाल ३६, अंबड ५५, जामखेड ५१, सुखापूरी ६०, घनसावंगी ३५, राणी उंचेगाव ४१, रांजणी ४२, तिर्थपुरी ४५, अंतरवली टेंबी ६३, जांब समर्थ ३४. 
बीड जिल्हा बीड ४०, पेंडगाव ४९, उमापूर ५५, चकलांबा ५८, जातेगाव ५०, तलवाडा ४६, रेवकी ४५, सिरसदेवी ४५, शिरूर कासार ५५, तिंतरवणी २८, वडवणी ६४, अंबाजोगाई ३१, घाटनांदूर ३४, मोहखेड ६०, तेलगाव ३९, नागापूर ६२, धर्मापुरी ४२,   
लातूर जिल्हा  नळगीर ३७, किनगाव ४९, हडळोती ४१, अंधोरी ४१, जळकोट ३६, 
बीड जिल्हा उस्मानाबाद जिल्हा ः सावरगाव ३३,

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com