कारंजालाड, जि.
ताज्या घडामोडी
यवतमाळ जिल्ह्यात पावसाचा सोयाबीनला फटका; एकरी उत्पादकतेत घट
यवतमाळ ः जिल्ह्यात झालेल्या पावसाचा फटका बसल्याने सोयाबीनच्या उताऱ्यातही घट नोंदविण्यात आली आहे. परिणामी, पुरेसा पैसा नसल्याने दिवाळीसारखा सण असूनही बाजारपेठेत मात्र शुकशुकाट निर्माण झाला आहे.
सुरुवातीला खंड देत चिंता वाढविणाऱ्या पावसाने त्यानंतर मात्र जिल्ह्यात सर्वदूर हजेरी लावली. ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात पावसाने जोरदार हजेरी लावत अनुशेष भरून काढला. हा सर्व पाऊस पिकांसाठी पोषक ठरला असतानाच रब्बी हंगामालाही त्याचा फायदा होणार आहे. परंतु आता मात्र परतीच्या पावसाने कपाशी, सोयाबीनचे नुकसान केले आहे.

जिल्ह्याच्या अनेक भागांत परतीचा पाऊस रोजच हजेरी लावत आहे. त्याचा परिणाम काढणीस आलेल्या सोयाबीनच्या उत्पादकतेवरही नोंदविला गेला आहे. कोरडवाहू माळरानावरील जमिनीत ३ ते ४ पोती आणि काळ्या कसदार जमिनीतून अवघी सहा ते सात पोती इतकीच सोयाबीनची उत्पादकता मिळाली आहे. परिणामी, सोयाबीनच्या एकरी उत्पादकता खर्चाची भरपाई देखील शक्य नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढीस लागली आहे. पाण्याची संततधार असल्याने पिकात तण वाढीस लागले होते. त्याच्या नियंत्रणावर देखील शेतकऱ्यांचा मोठा खर्च झाला. त्यानंतरही शेतात तणाचे नियंत्रण होऊ शकले नाही. कीड-रोगाचा देखील प्रादुर्भाव या वर्षी अधिक झाल्याचे चित्र होते.
सोयाबीन दरामुळेही वाढली चिंता
सध्या बाजारात जुन्या सोयाबीनला ३२२५ ते ३६६१ रुपयांचा दर मिळत आहे. बाजारात दाखल झालेल्या नव्या सोयाबीनचे व्यवहार २८०० ते ३२६३ रुपयांने होत आहेत. त्यामुळे देखील शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पाडली आहे.
- 1 of 582
- ››