Agriculture news in marathi; Rainfall crisis on ginning industry | Agrowon

यवतमाळ जिल्ह्यात पावसाचा सोयाबीनला फटका; एकरी उत्पादकतेत घट

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 10 ऑक्टोबर 2019

यवतमाळ  ः जिल्ह्यात झालेल्या पावसाचा फटका बसल्याने सोयाबीनच्या उताऱ्यातही घट नोंदविण्यात आली आहे. परिणामी, पुरेसा पैसा नसल्याने दिवाळीसारखा सण असूनही बाजारपेठेत मात्र शुकशुकाट निर्माण  झाला आहे. 

सुरुवातीला खंड देत चिंता वाढविणाऱ्या पावसाने त्यानंतर मात्र जिल्ह्यात सर्वदूर हजेरी लावली. ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात पावसाने जोरदार हजेरी लावत अनुशेष भरून काढला. हा सर्व पाऊस पिकांसाठी पोषक ठरला असतानाच रब्बी हंगामालाही त्याचा फायदा होणार आहे. परंतु आता मात्र परतीच्या पावसाने कपाशी, सोयाबीनचे नुकसान केले  आहे.

यवतमाळ  ः जिल्ह्यात झालेल्या पावसाचा फटका बसल्याने सोयाबीनच्या उताऱ्यातही घट नोंदविण्यात आली आहे. परिणामी, पुरेसा पैसा नसल्याने दिवाळीसारखा सण असूनही बाजारपेठेत मात्र शुकशुकाट निर्माण  झाला आहे. 

सुरुवातीला खंड देत चिंता वाढविणाऱ्या पावसाने त्यानंतर मात्र जिल्ह्यात सर्वदूर हजेरी लावली. ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात पावसाने जोरदार हजेरी लावत अनुशेष भरून काढला. हा सर्व पाऊस पिकांसाठी पोषक ठरला असतानाच रब्बी हंगामालाही त्याचा फायदा होणार आहे. परंतु आता मात्र परतीच्या पावसाने कपाशी, सोयाबीनचे नुकसान केले  आहे.

जिल्ह्याच्या अनेक भागांत परतीचा पाऊस रोजच हजेरी लावत आहे. त्याचा परिणाम काढणीस आलेल्या सोयाबीनच्या उत्पादकतेवरही नोंदविला गेला आहे. कोरडवाहू माळरानावरील जमिनीत ३ ते ४ पोती आणि काळ्या कसदार जमिनीतून अवघी सहा ते सात पोती इतकीच सोयाबीनची उत्पादकता मिळाली आहे. परिणामी, सोयाबीनच्या एकरी उत्पादकता खर्चाची भरपाई देखील शक्‍य नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढीस लागली आहे. पाण्याची संततधार असल्याने पिकात तण वाढीस लागले होते. त्याच्या नियंत्रणावर देखील शेतकऱ्यांचा मोठा खर्च झाला. त्यानंतरही शेतात तणाचे नियंत्रण होऊ शकले नाही. कीड-रोगाचा देखील प्रादुर्भाव या वर्षी अधिक झाल्याचे चित्र होते. 

सोयाबीन दरामुळेही वाढली चिंता
सध्या बाजारात जुन्या सोयाबीनला ३२२५ ते ३६६१ रुपयांचा दर मिळत आहे. बाजारात दाखल झालेल्या नव्या सोयाबीनचे व्यवहार २८०० ते ३२६३ रुपयांने होत आहेत. त्यामुळे देखील शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पाडली आहे.
 


इतर ताज्या घडामोडी
जीएम पिकांच्या मान्यतेसाठी केंद्राकडे...नागपूर: जागतिकस्तरावर जीएम पिकांच्या लागवडीस...
विविध मागण्यांसाठी रेशन दुकानदार ...नाशिक: राज्यातील स्वस्त धान्य दुकानदार व...
मका खरेदी तातडीने सुरू कराबुलडाणा ः मोताळा तालुक्‍यात मागील दहा दिवसांपासून...
शेतकऱ्यांना त्रास झाल्यास भाजप आंदोलन...अकोला ः शेतकऱ्यांना बी-बियाणे, कर्जपुरवठा तसेच...
सिंधुदुर्गात पाऊस सुरूच सिंधुदुर्ग: जिल्ह्यात तिसऱ्या दिवशीही...
जादा खरेदी दर, नापासच्या अधिक ...अकोला ः महाबीजने सोयाबीन वाणाच्या प्रमाणित...
ऊस उत्पादक केंद्राचे वैरी आहेत काय? कोल्हापूर: केंद्र सरकारने शेतकऱ्यांना दिलेल्या...
अकोला जिल्हा परिषदेचा ७६ कोटींचा निधी...अकोला  ः ‘कोरोना’मुळे निर्माण झालेल्या...
हिंगोली जिल्ह्यात ५९ कोटींचे पीककर्ज...हिंगोली   ः हिंगोली जिल्ह्यातील विविध...
कापूस, सोयाबीन उत्पादक विमा...गडचिरोली: धान उत्पादक ३४ हजार शेतकऱ्यांना सुमारे...
नांदेडमध्ये ४७ कोटी ४७ लाखांचे पीक कर्ज...नांदेड : नांदेड जिल्ह्यातील बॅंकांनी...
जालन्यात पाच हजार टन खते एकाच दिवशी...जालना  : जिल्ह्यात एकाच दिवशी पाच हजार...
कर्जमुक्‍ती योजनेची प्रक्रिया ३०...भंडारा ः शासनाने जाहीर केलेल्या महात्मा ज्योतिराव...
जयपूरमध्ये वीज पडून लाखो रुपयांच्या...नाशिक : पूर्वमोसमी पाऊस सुरू झाल्यानंतर बागलाण...
बुलडाणा जिल्ह्यात १५ तारखेपर्यंत...बुलडाणा  : यंदा जिल्ह्यात मॉन्सूनपूर्व पाऊस...
भाजीपाल्याची थेट खरेदी विक्री व्यवस्था...पुणे ः कोरोना टाळेबंदीमध्ये शहरातील विविध भागात...
सातारा जिल्ह्यात सर्वदूर पावसाची हजेरीसातारा ः जिल्ह्यात सोमवारी सर्वदूर पावसाने हजेरी...
कापूस खरेदीसाठी शेतकऱ्यांचा रास्तारोकोयवतमाळ ः महागाव तालुक्‍यातील गुंज येथील...
पुणे जिल्ह्यात पीककर्ज वितरणात...पुणे ः लाॅकडाऊनच्या काळात होरपळून निघालेल्या...
किरकोळ आजारांकडे नको दूर्लक्षमहिलांनी घराकडून शेताकडे जाताना चेहऱ्यावर पदर...