Agriculture news in marathi; Rainfall crisis on ginning industry | Agrowon

पावसामुळे जिनिंग उद्योगावर संकट

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 10 ऑक्टोबर 2019

बोदवड, जि. जळगाव  : अतिपावसाने कपाशी पिकाला फटका बसल्याने हंगाम लांबला आहे. परिपक्व बोंडे झालेल्या कपाशी पिकाचेही नुकसान अधिक झाल्याने वेचणी हवी तशी सुरू नाही. बोंडांचा दर्जाही चांगला नाही. यामुळे दसरा सण साजरा झाला तरीदेखील बोदवड व परिसरातील जिनिंग प्रेसिंग कारखान्यांमध्ये कापसाची हवी तशी आवक नाही. यामुळे जिनिंगमधील काम बंदच आहे. 

बोदवड, जि. जळगाव  : अतिपावसाने कपाशी पिकाला फटका बसल्याने हंगाम लांबला आहे. परिपक्व बोंडे झालेल्या कपाशी पिकाचेही नुकसान अधिक झाल्याने वेचणी हवी तशी सुरू नाही. बोंडांचा दर्जाही चांगला नाही. यामुळे दसरा सण साजरा झाला तरीदेखील बोदवड व परिसरातील जिनिंग प्रेसिंग कारखान्यांमध्ये कापसाची हवी तशी आवक नाही. यामुळे जिनिंगमधील काम बंदच आहे. 

मुक्ताईनगर, जामनेर, बोदवड हे तालुके कपाशी लागवडीसाठी ओळखले जातात. जूनच्या सुरवातीला लागवड झालेल्या कपाशीच्या पिकात बोंडे परिपक्व झाली आहेत. झाडावर खालील बाजूस लागलेली बहुतांश बोंडे सततच्या पावसामुळे काळवंडली आहेत. यामुळे दिवाळीपर्यंत चांगल्या दर्जाचा कापूस येण्याची शाश्वती नाही. झाडांवर लागणाऱ्या फुले, पात्यांची गळतीही होत आहे. दसरा सणालाच अनेक जिनिंग कारखान्यांमध्ये कापूस येतो. आवक सुरू झाली, की जिनिंगचे काम सुरू होते.

बोदवड तालुका कपाशी उद्योगासाठी प्रसिद्ध आहे. तालुक्‍यात जिनिंग मोठ्या प्रमाणावर आहेत. तसेच कपाशीच्या सरकीवर प्रक्रिया करणारे अनेक लहान-मोठे उद्योग या ठिकाणी आहेत. येथील कपाशीला देश-विदेशांत मोठ्या प्रमाणावर मागणी असते. तालुक्‍यातील जिनिंग उद्योगाची व्याप्ती लक्षात घेता, अनेकांना यापासून रोजगार मिळतो. हजारो कुटुंबांचे उदरनिर्वाह कपाशी उद्योगावर चालतात. या वर्षी पाऊस समाधानकारक असल्याने मोठ्या प्रमाणावर कपाशीची लागवड करण्यात आली, त्यामुळे कापसाचे उत्पादन वाढण्याची शक्‍यता व्यक्त केली जात होती. असे असताना मात्र सतत सुरू असलेल्या पावसामुळे कपाशीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे.

सप्टेंबर व या महिन्यातील पावसामुळे कापसाच्या कैऱ्या या झाडावरच सडत आहेत. त्यामुळे कपाशीच्या उत्पादनात घट येणार आहे. याचा परिणाम जिनिंग उद्योगावर होऊन आवक घटली आहे. तालुक्‍यातील जिनिंगमध्ये दरवर्षी गणेश चतुर्थीला कापूस खरेदीला सुरुवात केली जाते. वर्षभरात किमान आठ महिने तरी जिनिंग सुरू असल्याने अनेकांना रोजगार मिळतो. या वर्षी पावसामुळे कापूस निघण्यास उशीर झाला आहे. दिवाळीचा सण काही दिवसांवर आला आहे, तरीही कापसाची हवी तशी आवक नसल्याने खरेदीदार, मजुरांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. 

दरवर्षी दसऱ्यापर्यंत दोन हजार क्विंटल कापसाची आवक होते. परंतु, या वर्षी पाऊस जास्त असल्याने फक्त पाचशे ते सहाशे क्विंटल कापसाची आवक आहे. जास्त पावसामुळे कपाशीच्या कैऱ्या काळ्या पडत आहेत. शेतकऱ्यांचेही मोठे नुकसान होत आहे. यामुळे जिनिंग व्यवसाय एक ते दीड महिना उशिराने सुरू होईल. 
- अरविंद जैन,  जिनिंग प्रेसिंग कारखानदार, बोदवड (जि. जळगाव)
 


इतर बातम्या
रेशीम उद्योगासाठी शेतकऱ्यांनी पुढे यावे...औसा, जि. लातूर :  ‘‘रेशीम उद्योगाकडे...
औरंगाबाद जिल्ह्यात विजेअभावी सिंचनाची...औरंगाबाद : पंधरवडा रात्री तर पंधरवडा दिवसा...
जीआय टॅगिंगयुक्त हापूसला दीड लाखापर्यंत...रत्नागिरी : ‘‘निर्यातीत हापूसचा टक्के घसरत असून...
कावपिंप्रीत चार वर्षांनंतर बहरली पिकेकावपिंप्री, जि. जळगाव : यंदा कावपिंप्रीसह...
नीरा-देवघरच्या पाणीवाटपावरुन पिलीवमध्ये...सोलापूर : राज्य सरकारने नीरा- देवघर धरणातील...
‘टेंभू’च्या पाण्यासाठी जास्त पंप सुरू...सांगली : शेतकऱ्यांच्या मागणीनुसार टेंभू उपसा...
खानदेशात कांदा दरातील चढउतारामुळे...जळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये...
विदर्भात पावसाची शक्यतापुणे: पूर्व आणि पश्चिमेकडील वाऱ्यांचा संगम होत...
सांगली जिल्ह्यातून सव्वादोन हजार टन...सांगली ः दुष्काळ, अवकाळी आणि अतिवृष्टीच्या...
ई-पीक पाहणी प्रकल्पाची प्रायोगिक...सिल्लोड : हंगामनिहाय किती क्षेत्रावर कोणत्या...
अठ्ठेचाळीस कृषी महाविद्यालयांची...पुणे : विद्यार्थ्यांकडून लक्षावधी रुपये शुल्क...
सिंधुदुर्गच्या पूर्व पट्ट्यात आंब्याला...सिंधुदुर्ग: फेब्रुवारी महिना संपत आला तरी...
पशुधनाचे मार्चमध्ये होणार लसीकरणपुणे ः गाई, म्हशी, शेळ्या, कालवडी आजारी पडू नये...
निर्धारित निर्यातीनंतरच बफर स्टॉकवरील...नवी दिल्ली: देशातील ज्या साखर कारखान्यांनी...
खारपाण पट्ट्यातील येऊलखेड बनले कृषी...अकोला: विदर्भाची पंढरी शेगाव हे संपूर्ण...
हुंडी चिठ्ठी, मायक्रो फायनान्स...अकोला  ः जिल्ह्यात हुंडी चिठ्ठी तसेच मायक्रो...
शेतकरी गटांनी बीजोत्पादन कार्यक्रम...अकोला ः अधिक उत्पादनासाठी शेतकरी गटांनी...
नाशिक येथे तीनदिवसीय पुष्पोत्सवाला...नाशिक  : प्रत्येकाच्या हक्काची तीन झाडं हवी...
न्हावी परिसरात मका पिकावर लष्करी अळीचा...न्हावी, जि. जळगाव ः न्हावीसह परिसरात मक्‍याची...
जळगाव ः कापसाच्या खेडा खरेदीला कमी...जळगाव ः कापसाची खेडा खरेदी मागील आठवड्यात...