पुणे जिल्ह्यातील धरण क्षेत्रात पावसाची संततधार

पुणे जिल्ह्यातील धरण क्षेत्रात पावसाची संततधार
पुणे जिल्ह्यातील धरण क्षेत्रात पावसाची संततधार

पुणे : पुणे जिल्ह्याच्या धरण क्षेत्रात पावसाची संततधार सुरू आहे. तर जिल्ह्याच्या उर्वरित भागात पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी सुरू आहेत. धरणांमध्ये येणाऱ्या आवकेनुसार पाण्याचा विसर्गही कमी अधिक करण्यात येत आहे. पावसाचा जोर कमी झाल्याने नद्यांची पाणीपातळी ओसरली आहे. भीमा नदीच्या पाणलोटातून असलेल्या पाणी पुरवठ्यामुळे उजनी धरणाने शंभरी गाठली आहे. 

जिल्ह्यातील कुकडी, भीमा, घोड, भामा, इंद्रायणी, पवना, मुळा-मुठा, नीरा आणि कानंदी, आरळा या नद्या दुथडी भरून वाहत आहेत. खडकवासला प्रकल्पातील चारही धरणे भरली असून, सर्व धरणांचा विसर्ग सुरूच आहे. दुपारी १२ वाजता खडकवासला धरणातून २७ हजार क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात येत होत. मुळशी धरणातील विसर्ग ५ हजार क्युसेक विसर्ग सुरू होता. मुळा मुठेची पूरस्थिती आेसरली असून, बंडगार्डन बंधाऱ्याजवळ ३१ हजार क्युसेक वेगाने पाणी वाहत होते. 

वीर धरणातून विसर्ग वाढवून ७८ हजार करण्यात येत असल्याने नीरा नदीला पूर स्थिती आहे. उजनी धरण शंभर टक्के भरले असून, दौंड येथील नदीपात्रात १ लाख १६ हजार क्युसेक वेगाने पाणी वाहत आहे. उजनी धरणातून पाण्याचा विसर्ग १ लाख ५१ हजारांपर्यंत वाढला आहे. नीरा नृसिंहपूर येथे नदीपात्रात २ लाख ६४ हजार क्युसेक वेगाने पाणी वाहत असल्याचे जिल्हा प्रशानातर्फे सांगण्यात आले. 

बुधवारी (ता. ७) सकाळी आठ वाजेपर्यंतच्या २४ तासांत जिल्ह्यातील धरण क्षेत्रात पडलेला पाऊस (मिलीमीटरमध्ये) टेमघर ८०, वरसगाव ७७, पानशेत ७३, खडकवासला २०, पवना ९७, कासारसाई १७, मुळशी ७१, कळमोडी ३७, भामा आसखेड २६, आंद्रा २६, वडीवळे १०४, गुंजवणी ५५, नीरा देवघर १९३, भाटघर ५०, पिंपळगाव जोगे २७, माणिकडोह २८, वडज २०, डिंभे ३६.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com