Agriculture news in Marathi, Rainfall in dams catchment area of ​​Pune district | Agrowon

पुणे जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाच्या सरी
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 28 जून 2019

पुणे ः चार ते पाच दिवसांपासून पुणे जिल्ह्याच्या अनेक भागांत पावसाच्या जोरदार सरी पडत आहेत. बुधवारी (ता. २६) सायंकाळी मावळ, मुळशी, भोर, वेल्हा, हवेली तालुक्यांत धरण क्षेत्रातही पावसाने हजेरी लावली. विसापूर, कळमोडी धरण क्षेत्रातही पावसाच्या जोरदार सरी कोसळ्याने भात रोपवाटिकेच्या कामांना चांगलाच वेग आला आहे. 

पुणे ः चार ते पाच दिवसांपासून पुणे जिल्ह्याच्या अनेक भागांत पावसाच्या जोरदार सरी पडत आहेत. बुधवारी (ता. २६) सायंकाळी मावळ, मुळशी, भोर, वेल्हा, हवेली तालुक्यांत धरण क्षेत्रातही पावसाने हजेरी लावली. विसापूर, कळमोडी धरण क्षेत्रातही पावसाच्या जोरदार सरी कोसळ्याने भात रोपवाटिकेच्या कामांना चांगलाच वेग आला आहे. 

गेल्या आठवड्यापासून पुणे जिल्ह्यातील अनेक भागांत हवामान ढगाळ होते. त्यामुळे उकाड्यात वाढ झाली होती. दुपारनंतर पुणे शहरासह परिसरात तुरळक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. बुधवारी (ता. २६) दिवसभर हवामान ढगाळ होते. यामुळे तर पुणे शहरासह मावळ, मुळशी, भोर, वेल्हा या तालुक्यासह घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. यामुळे भात रोपवाटिकाना दिलासा मिळत असून रोपेही वाढीच्या अवस्थेत आहेत.

गुरुवारी (ता. २७) सकाळी आठ वाजेपर्यंत विसापूर धरणाच्या पाललोट क्षेत्रात सर्वाधिक ४८ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद जलसंपदा विभागाकडे झाली आहे. तर कळमोडी धरणाच्या क्षेत्रातही ४२ मिलिमीटर पाऊस पडला. खडकवासला ३६, आंध्रा ३०, डिंभे १९, गुंजवणी १६, पानशेत ९, कासारसाई ८, घोड, वरसगाव ७, येडगाव ५, टेमघर, निरा देवधर, भाटघर या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात तीन मिलिमीटर पाऊस पडला. अशीच स्थिती पुढील काही दिवस राहिल्यास धरणात नव्याने पाण्याची आवक सुरू होऊन पाणी पातळीत वाढ होण्यास मदत होईल. 

दररोज होत असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांनाही चांगलाच दिलासा मिळत असून शेतकऱ्यांनी भात रोपवाटिकेची कामे वेगाने हाती घेतली आहेत. उत्तरकडील खेड, जुन्नर, आंबेगाव या तालुक्यात तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्या. तर पूर्व पट्ट्यातील दौंड, शिरूर, इंदापूर, पुरंदर, बारामती या तालुक्यात काही अंशी हवामान ढगाळ होते. मात्र, गेल्या दोन ते तीन दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी खरिपाची तयारी सुरू केली आहे.

इतर बातम्या
वऱ्हाडात सरासरी ६१.५९ टक्के मतदानअकोला ः गेल्या १५ दिवसांपासून सुरू असलेल्या...
सोलापूर जिल्ह्यात मतदान शांततेतसोलापूर ः सोलापूर जिल्ह्यात रात्रभर पडत असलेल्या...
दिंडोरी, नाशिक भागांत डाऊनीचा...नाशिक   : जिल्ह्यात दिंडोरी, नाशिक...
इंदापुरात १२०० एकर द्राक्ष बागा उद्‌...भवानीनगर, जि. पुणे  : इंदापूर तालुक्‍यातील...
सांगली जिल्ह्यात २० टक्के क्षेत्रावर...सांगली  ः गेल्या आठवड्यात झालेला पाऊस,...
पुणे जिल्ह्यात सर्वदूर पावसाची हजेरीपुणे : जिल्ह्याच्या सर्वच भागांत दोन-तीन...
अमेरिकेमध्ये कपाशीवर विषाणुजन्य ब्ल्यू...अमेरिकेमध्ये कपाशीवर प्रथमच विषाणूजन्य ब्ल्यू...
नगर जिल्ह्यात अजूनही १४२ टॅंकर सुरूचनगर ः पावसाळा संपला असला तरी अजूनही जिल्ह्यातील...
वादळी पावसाचा अंदाज कायमपुणे  : अरबी समुद्रात तयार झालेले कमी दाबाचे...
पावसामुळे लांबला कापसाचा हंगामराळेगाव, जि. यवतमाळ ः अति पावसामुळे कापसाचा हंगाम...
पावसाचा पुन्हा दणकापुणे  : मॉन्सूनोत्तर पावसाचा दणका सुरूच आहे...
जळगाव, पुणे जिल्ह्यात ईव्हीएम, ...जळगाव  ः जिल्ह्यात सोमवारी मतदानाच्या दिवशी...
सोलापूर जिल्ह्यात पावसाचा पहिल्यांदाच...सोलापूर ः सोलापूर जिल्ह्यात गेल्या दोन...
कोयनेसह पाच धरणांतून विसर्गसातारा  ः जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत...
जिल्हा बँकांबाबत अनास्कर यांनी ...पुणे  : राज्यातील शेतकऱ्यांच्या घामाच्या...
मराठवाड्यातील ३७१ मंडळांमध्ये पाऊसऔरंगाबाद/ परभणी ः मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांतील...
पुणे जिल्ह्यात संततधार पाऊसपुणे : पुणे जिल्ह्यात सर्वदूर शनिवारपासून (ता. १९...
पावसामुळे भात उत्पादक धास्तावलेपुणे : दोन ते तीन दिवसांपासून पावसाने पुन्हा...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत ५...नांदेड : विधानसभा निवडणुकीसाठी नांदेड, परभणी,...
बुलडाणा जिल्ह्यात २० लाख ३९ हजार मतदार...बुलडाणा : जिल्ह्यात बुलडाणा, चिखली, मलकापूर,...