Agriculture News in Marathi, Rainfall deficit in India | Agrowon

वायव्य, मध्य भारतात पावसाची हुलकावणी
संदीप नवले
सोमवार, 18 सप्टेंबर 2017

पुणे ः यंदा देशात चांगला पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला होता. तरी दरवर्षीप्रमाणे पावसाने यंदाही देशातील वायव्य आणि मध्य भारतात हुलकावणी दिली असल्याचे एक जून ते १३ सप्टेबर या कालावधीत झालेल्या पावसाच्या नोंदीवरून दिसून येते.

देशात आत्तापर्यंत ७५२.७ मिलिमीटर एवढा पाऊस पडला आहे. एक जून ते सात सप्टेंबर या कालावधीत ईशान्य भारतातील हिमालय, पश्‍चिम बंगाल, सिक्कीम, आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश येथे मुसळधार पाऊस पडला.

पुणे ः यंदा देशात चांगला पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला होता. तरी दरवर्षीप्रमाणे पावसाने यंदाही देशातील वायव्य आणि मध्य भारतात हुलकावणी दिली असल्याचे एक जून ते १३ सप्टेबर या कालावधीत झालेल्या पावसाच्या नोंदीवरून दिसून येते.

देशात आत्तापर्यंत ७५२.७ मिलिमीटर एवढा पाऊस पडला आहे. एक जून ते सात सप्टेंबर या कालावधीत ईशान्य भारतातील हिमालय, पश्‍चिम बंगाल, सिक्कीम, आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश येथे मुसळधार पाऊस पडला.

ईशान्य भारतात सरासरी १२८०.५ मिलिमीटर एवढा पाऊस पडतो. प्रत्यक्षात ईशान्य भारतात १२६६.६ मिलिमीटर पाऊस पडला आहे. सरासरीच्या तुलनेत एक टक्के कमी पाऊस पडला आहे.

सर्वदूर झालेल्या पावसामुळे पिकांना चांगला मिळाला असला तरी अनेक भागात नुकसान झाल्याचेही चित्र पाहावयास मिळाले. वायव्य भारतात सरासरी ५६८.५ मिलिमीटर एवढा पाऊस पडतो. यंदा ५१९.७ मिलिमीटर एवढा पाऊस पडला आहे. सरासरीच्या तुलनेत आत्तापर्यंत नऊ टक्के कमी पाऊस पडला.

मध्य भारतात जुलैमध्ये पडलेल्या पावसाच्या खंडामुळे अनेक भागात दुष्काळजन्य परिस्थिती उद्भवली होती. महाराष्ट्रातही पावसाचा मोठा खंड पडल्याने पिके वाया गेली. दरवर्षी मध्य भारतात सरासरी ८९५.६ मिलिमीटर एवढा पाऊस पडतो. यंदा १३ सप्टेंबरपर्यत ८११.४ मिलिमीटर म्हणजेच नऊ टक्के कमी पाऊस पडला. दक्षिण द्वीपकल्पाच्या अनेक भागात कमी पाऊस पडला असून, गेल्या पंधरवाड्यात चांगला पाऊस झाल्याचे चित्र आहे.

दक्षिण भारतात जोरदार पावसाचा अंदाज
अरबी समुद्र ते कर्नाटक यादरम्यान चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. ही स्थिती अरबी समुद्र व केरळच्या दिशेने सरकत आहे. त्यामुळे येत्या बुधवारपर्यंत (ता. २०) केरळ, लक्षद्वीप, कर्नाटक, कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात जोरदार पाऊस पडेल; परंतु आंध्र प्रदेश, तेलंगणा, छत्तीसगड, विदर्भ, मराठवाडा, झारखंड, ओडिशा आणि पश्‍चिम बंगालच्या अनेक भागात पावसाचा जोर कमी होऊन हलका पाऊस पडण्याची शक्‍यता आहे.

उत्तर भारतातही हलक्‍या पावसाची शक्‍यता आहे, तर २१ ते २८ सप्टेंबर या कालावधीत पावसाचा जोर कमी होणार आहे, असा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला. 

इतर ताज्या घडामोडी
कलिंगडांच्या जनुकीय प्रदेशांचा घेतला...आंतरराष्ट्रीय संशोधकांचा गट कलिंगडाच्या सात...
औरंगाबाद जिल्ह्यात मका खरेदीसाठी दहा...औरंगाबाद : मक्याला किमान आधारभूत किंमत मिळावी,...
सांगली जिल्ह्यात यंदा पावसाची ‘रेकॉर्ड...सांगली : जिल्ह्यात गेल्या २० वर्षातील सर्वाधिक...
युरिया ब्रिकेटची पन्हाळा तालुक्यात शंभर...कोल्हापूर : कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन...
परभणीत साडेचार लाख हेक्टरवर पिके वायापरभणी : ऑक्टोबर महिन्यातील अतिवृष्टीमुळे...
शिरपूर उपबाजारात सोयाबीनची आवक वाढलीशिरपूर, जि. वाशीम  : सलग सुरू असलेला पाऊस...
पणन संचालकपदी कोणाची वर्णी लागणार?पुणे ः शेतमाल विपणनच्या ३०७ बाजार समित्या, ९००...
धक्कादायक ! कांदा नुकसानीच्या...नाशिक  : चालू वर्षी दुष्काळामुळे होरपळून...
अमरावती : रब्बी हंगाम क्षेत्रात होणार...अमरावती ः मॉन्सूनोत्तर पाऊस खरीप पिकांच्या मुळावर...
‘भातकुली’वर पाणीटंचाईचे सावटअमरावती  ः सुरुवातीला उघडीप त्यानंतर...
पुणे विभागात रब्बीचा चार लाख हेक्टरवर...पुणे  ः ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यांत...
साताऱ्यात राष्ट्रीयीकृत बँकांकडून...सातारा ः अतिपावसाने शेती क्षेत्राचे कोट्यवधींचे...
पुणे बाजार समितीत ‘ई-नाम’ची अंमलबजावणी...पुणे :  शेतीमालाच्या ऑनलाइन लिलावांतून...
माण तालुक्यात पीक पंचनाम्यांमध्ये...दहिवडी, जि. सातारा  : पावसाने जोरदार तडाखा...
राज्यात अखेर राष्ट्रपती राजवटमुंबई ः चौदाव्या विधानसभेसाठी कोणत्याच...
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या ऊस...कोल्हापूर  : यंदाच्या प्रतिकूल परिस्थितीच्या...
विमा प्रतिनिधी शोधताना शेतकऱ्यांची दमछाकयवतमाळ ः मॉन्सूनोत्तर पावसाने झालेल्या...
‘बुलबुल’ प्रभावित शेतकऱ्यांना मदत जाहीरभुवनेश्‍वर, ओडिशा:  राज्याला बुलबुल...
तण निर्मूलनातून तण व्यवस्थापनाकडेवास्तविक तण विज्ञानाचा संबंध विविध कृषी शाखांशी...
जळगावात कोबी १८०० ते ३००० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (...