नगर जिल्ह्यातील सहा महसूल मंडळांत अतिवृष्टी

पावसामुळे शेताचे बांध फुटले
पावसामुळे शेताचे बांध फुटले

नगर : जिल्ह्यातील ३५ महसूल मंडळांत शनिवारी जोरदार पाऊस झाला आहे. अन्य महसूल मंडळांतही हलका पाऊस झाला. रविवारी (ता. २१) सकाळपर्यंत झालेल्या पावसाच्या नोंदीनुसार सहा महसूल मंडळांत अतिवृष्टी झालेली असून, सहापैकी तीन महसूल मंडळे नगर शहरातील आहेत. शनिवारी झालेल्या पावसामुळे खरीप पिकांना मोठा आधार मिळाला आहे. अकोले तालुक्यातील भंडारदरा, मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही पावसाला सुरवात झाली असली तरी पूर्वीएवढा जोर नाही. 

पावसाळ्याचा दीड महिना आता उलटला आहे. जिल्ह्यात यंदा पावसाला नेहमीच्या तुलनेत पंधरा दिवस उशिराने सुरवात झाली. मध्यंतरी झालेल्या पावसावर पन्नास टक्के पेरण्या झाल्या, परंतू त्यानंतर पावसाने पुन्हा दडी मारल्याने पेरण्या रखडल्या, तर ज्यांनी पेरणी केली त्यांची पिकेही अडचणीत आली होती. मात्र शनिवारी  झालेल्या पावसाने जिल्हाभरातील दहा ते बारा मंडळे वगळता अन्य मंडळांत पावसाने हजेरी लावली. त्यामुळे खरिपाला जीवदान मिळाले आहे.

शनिवारी सहा महसूल मंडळांत अतिवृष्टी झाली असून नगरमधील सावेडीत सर्वाधिक ११७ मिलिमीटर पाऊस झाला. नालेगावमध्ये १०८, भिंगारमध्ये ८०, नागापूर मंडळात ८२ मिलिमीटर पाऊस झाला. याशिवाय वांबोरी मंडळात ७६, आणि पारनेर तालुक्यातील वाडेगव्हाण मंडळात ८२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

रविवारी (ता. २१) सकाळपर्यंतच्या २४ तासांत झालेला पाऊस (मिमी) ः श्रीगोंदा ५५, पेडगाव २४, देवदैठण २२, राशीन ५३, भांबोरा ४२, श्रीरामपूर ३९, उंदीरगाव  ५०, राहुरी २६, वांबोरी ७६, ब्राम्हणी ५४, टाकळीमियॉं ५६, पुणतांबा २८, नेवासा खुर्द ८०, नेवासा बुद्रुक ५२, सलाबतपूर २६, वडाळा बहिरोबा ५८, सोनई १५, नालेगाव १०८, जेऊर २२, केडगाव ५२, चास ५९, भिंगार ८०, नागापुर ८२, वाळकी ५५, चिचोंडी पाटील ५६, सावेडी ११७, शेवगाव २२, सुपा ः २१, वाडेगव्हाण ८२, भाळवणी २९, संगमनेर ३१, धांदरफळ २७, समानपूर ३४, रवंदे २५.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com