पुणे जिल्ह्यात पावसाच्या आकडेवारीत पुन्हा मोठी तफावत

जेव्हा-जेव्हा आस्मानी संकट ओढावते, तेव्हा असेच काहीतरी आकडेवारीचे गोंधळ घातले जातात. कृषी आणि महसूल विभागातील तपशिलात एवढी तफावतच कशी येऊ शकते. याची सखोल चौकशी सरकारने करावी. - रघुनाथ शिंदे, शेतकरी, खैरेनगर, ता. शिरुर.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

पुणे  : पुणे जिल्ह्याच्या विविध भागांत सोमवारी (ता. ४) सांयकाळी मुसळधार पाऊस झाला. पावसाचा वेग इतका प्रचंड होता, की काही मिनिटांतच सर्वत्र पाणीच पाणी झाले. मंगळवारी (ता. ५) सकाळपर्यंतच्या २४ तासांत पडलेल्या पावसात आणि महसूल व कृषी विभागाच्या आकडेवारीत मात्र खूपच तफावत असल्याचे दिसून आली आहे. 

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसनीबाबत विमा परतव्याची, तसेच राज्य शासनाकडून मदतीची मागणी होत आहे. अशा वेळी शासनाच्याच दोन यंत्रणांकडून वेगळी आकडेवारी सादर होत असल्याने आम्हाला नुकसानभरपाई मिळण्यात अडचणी निर्माण होतील, अशी शक्यता आणि याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी योग्य ती दखल घ्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.   

राज्याचा महसूल विभाग जिल्हा प्रशासनाकडून मंडलनिहाय पावसाची नोंद घेतली जाते. ही नोंद नैसर्गिक आपत्तीमध्ये नुकसानभरपाईची मदत देण्यासाठी ग्राह्य धरली जाते. तर कृषी विभागाच्या महावेध प्रकल्पांतर्गत स्वयंचलित हवामान केंद्राच्या माध्यमातून मंडलनिहाय पावसाची नोंद होते. ही आकडेवारी पीकविमा परतवावा, पीक नियोजनासाठी विचारात घेतली जाते. मात्र या दोन्ही आकडेवारीमध्ये मोठी तफावत असल्याची तक्रारी शेतकरी सातत्याने करत आहेत. गेले काही दिवस जिल्ह्यात सातत्याने अतिवृष्टी होत असून, ओढ, नाले ओसंडून वाहत आहेत. शेतामध्ये पाणी साचून खरिपाच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. 

नुकसानीचे पंचनामेदेखील सुरू आहेत. तर अनेक ठिकाणी पाणी साचून राहिल्याने रब्बीच्या पेरण्याही खोळंबल्या आहेत. यातच सोमवारी सांयकाळी पुणे जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये मुसळधार पाऊस पडला. जोरदार पावसामुळे रस्त्यांना ओढ्याचे स्वरूप आले. काही मिनिटांतच सर्वत्र पाणीच पाणी झाले. ठिकाणी पडलेल्या पावसाची माहिती घेण्यासाठी आकडेवारी घेतली असता. यात मोठी तफावत दिसून आली आहे. या दोन वेगवेगळ्या आकडेवारीतून काय साध्य होणार, असा प्रश्न निर्माण होत आहे.    

मंगळवारी (ता. ५) काळपर्यंतच्या जिल्ह्यात निवडक ठिकाणच्या पावसाच्या नोंदी (मिलिमीटरमध्ये) 
ठिकाण   महसूल विभाग  कृषी विभाग
पुणे वेधशाळा  ३१  ८
मुंढवा-केशवनगर  १७ उपलब्ध नाही
कोथरूड ३२ ५.८
खडकवासला १६ ६.५
खेड शिवापूर ३०
चिंचवड १२ १.८
हडपसर   २१ १०.५
वाघोली १३ २.८
घोटावडे  १० ४.८
भोलावडे  १७ ३९.३
नसरापूर  १२ २३.५
किकवी ११ ३०
वेळू  २० 
आंबवडे ४८ ३३.८
मंचर  ०  १७
लोणी भापकर   २  १७.८
इंदापूर  १४
परिंचे ५२.५

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com