मध्य प्रदेश, गुजरातसह दक्षिणेत अतिवृष्टीचा इशारा

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
पुणे ः गुजरात परिसरात चक्राकार वाऱ्याची स्थिती असून, कोकण ते केरळ या दरम्यान कमी दाबाचा पट्टा आहे. त्यामुळे मध्य प्रदेश, गुजरात, कोकण, गोवा, विदर्भ, झारखंड, बिहार, पश्चिम बंगाल, तमिळनाडू आणि केरळ राज्यांतील काही भागांत अतिवृष्टी होण्याचा इशारा हवामान विभागाने खात्याने दिला.
सध्या ओडिशा, कोकण, गोवा या ठिकाणी पाऊस पुन्हा सक्रिय झाला आहे. तसेच मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, मध्य महाराष्ट्र, नागालॅंड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुराच्या काही भागांत पावसाने पुन्हा जोर धरला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील कोकण, मध्य महाराष्ट्र, गोवा, उत्तराखंड, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि ओडिसातील काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता अाहे. 
बंगालच्या उपसागराच्या वायव्य भागात चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. तर ओडिशा, पश्चिम बंगाल आणि बंगालचा उपसागर या दरम्यान कमी दाबाचा पट्टा आहे. 
तर अमृतसर, कर्नाल, मणिपूर, सिंद्धी, अंबिकानगर, चाईबसा ते बंगालचा उपसागर या दरम्यान कमी दाबाचा पट्टा आहे.
तर कोकण, ते केरळ या दरम्यान कमी दाबाचा पट्टा आहे. गुजरातचा दक्षिण भाग ते मध्य महाराष्ट्र या भागात चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. ही स्थिती समुद्रसपाटीपासून १.५ ते ७.६ किलोमीटर उंचीवर आहे.
तसेच मध्य प्रदेशाच्या भागात चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे.
तर काही ठिकाणी ढगाळ हवामान असून, अनेक ठिकाणी सकाळपासून कडक ऊनही पडत असल्याचे चित्र आहे.
मंगळवारी (ता. १९) सकाळपर्यंत हर्णे येथे देशातील सर्वाधिक पाऊस पडल्याची नोंद झाली. तर चांदबली, महाबळेश्वर, वेंगुर्ला, पंतनगर, रत्नागिरी, गोवा, झार्सुगंडा, रायपूर, संबळपूर, फुलबनी, बरेल्ली, भोपळ, खांदवा, सोहरा, इंफाव, सुंदरगड, अलिंबाग, भूवनेश्वर अगुंबे अशा अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com