कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाचा अंदाज

पावसाला पोषक हवामान झाल्याने राज्याच्या कमाल तापमानात घट झाली. तर किमान तापमानात वाढ झाल्याने राज्यात थंडी कमी झाली. ३ ते ९ डिसेंबर या आठवड्याच्या कालावधीत कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज आहे
Rainfall forecast in Konkan, Central Maharashtra, Marathwada
Rainfall forecast in Konkan, Central Maharashtra, Marathwada

पुणे : पावसाला पोषक हवामान झाल्याने राज्याच्या कमाल तापमानात घट झाली. तर किमान तापमानात वाढ झाल्याने राज्यात थंडी कमी झाली. ३ ते ९ डिसेंबर या आठवड्याच्या कालावधीत कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज आहे. तर वाढलेले किमान तापमान कमी होऊन थंडीत वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

२५ नोव्हेंबर ते १ डिसेंबर या आठवडाभराच्या कालावधीत कोकण, मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात पावसाने हजेरी लावली. दक्षिण कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक, रायगड जिल्ह्यात सरासरीइतका पाऊस पडला. मध्य महाराष्ट्रातील  कोल्हापूर, जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक तर पुणे, सोलापूर, सांगली, सातारा जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला. उर्वरित राज्यात मुख्यत: कोरडे हवामान होते.  

गत आठवड्याच्या सुरुवातीला उघडीप होती. मात्र, अखेरीस राज्यात पावसाला सुरुवात झाली. १ डिसेंबर व २ डिसेंबर रोजी राज्याच्या अनेक भागात जोरदार पावसाने हजेरी लावली. ३ ते ९ डिसेंबर या आठवडाभरामध्ये कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात सरासरी पेक्षा अधिक पावसाचा अंदाज आहे. विदर्भात मुख्यत: पावसाची उघडीप राहण्याची शक्यता आहे. राज्यात असलेला पाऊस आणि उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे राज्याच्या कमाल-किमान तापमानात घट होत आहे. 

पहाटेच्या तापमानात घट होणार असल्याने राज्यात थंडी परतण्याची शक्यता आहे. ३ ते ९ डिसेंबर या कालावधीत कोकण, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम विदर्भात किमान तापमान सरासरीच्या तुलनेत ० ते २ अंशांनी कमी राहण्याची शक्यता असून, उर्वरित राज्यात किमान तापमान सरासरीपेक्षा ० ते २ अंशांनी अधिक राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com