राज्यात पावसाचा अंदाज, तापमान वाढणार

ढगाळ हवामान आणि पावसाच्या हजेरीने तापमानात चढ-उतार सुरू आहेत. किमान तापमानाचा पारा वाढल्याने राज्यातून थंडी गायब झाली आहे.
Rainfall forecast in the state, temperature will rise
Rainfall forecast in the state, temperature will rise

पुणे : ढगाळ हवामान आणि पावसाच्या हजेरीने तापमानात चढ-उतार सुरू आहेत. किमान तापमानाचा पारा वाढल्याने राज्यातून थंडी गायब झाली आहे. १९ ते २५ नोव्हेंबर या आठवड्याच्या कालावधीत राज्यात सर्वदूर सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज आहे. तर किमान तापमानातील वाढ कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. ११ ते १७ नोव्हेंबर या आठवडाभराच्या कालावधीत कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भाच्या काही जिल्ह्यांमध्ये हलक्या ते जोरदार पावसाने हजेरी लावली. कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, सोलापूर, मराठवाड्यातील नांदेड, विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यांत सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली. पुणे, सांगलीत सरासरी इतका पाऊस झाला. तर नगर यवतमाळ, वर्धा आणि गोंदिया जिल्ह्यांतही पावसाने हजेरी लावली. उर्वरित राज्यात अंशतः ढगाळ आणि कोरडे हवामान होते.  बंगालच्या उपसागर, अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे दक्षिण भारतातील राज्यांमध्ये पावसाचा जोर वाढला आहे. तर महाराष्ट्राच्या विविध भागांत पाऊस पडत आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार १९ ते २५ नोव्हेंबर या आठवडाभरामध्ये संपूर्ण राज्यात हलका ते मध्यम पावसाची शक्यता असून, सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज आहे. दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्राच्या जिल्ह्यांमध्ये पावसाचे प्रमाण अधिक राहण्याची शक्यता आहे.   पावसाळी वातावरण आणि ढगाळ हवामानामुळे राज्याच्या किमान तापमानात मोठी वाढ झाली आहे. कमाल तापमानातही चढ-उतार होतच आहे. १९ ते २५ नोव्हेंबर या कालावधीत राज्यातील बहुतांशी भागात किमान तापमान सरासरी ते सरासरीपेक्षा वर राहण्याची शक्यता आहे. पूर्व विदर्भात किमान तापमान सरासरीच्या तुलनेत ४ ते ६ अंशांनी अधिक, कोकणात ० ते २ अंशांनी अधिक तर उर्वरित राज्यात किमान तापमान सरासरीपेक्षा २ ते ४ अंशांनी अधिक राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com