विदर्भ, कोकणात पावसाचा अंदाज

आज (ता. २४) कोकण, विदर्भात सर्वदूर पावसाचा अंदाज आहे. तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात काही ठिकाणी मेघगर्जना, विजांसह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
Rainfall forecast in Vidarbha, Konkan
Rainfall forecast in Vidarbha, Konkan

पुणे : राज्यात पावसाने दमदार हजेरी लावल्यानंतर दोन दिवस पावसाचा जोर काहीसा कमी होण्याची चिन्हे आहेत. आज (ता. २४) कोकण, विदर्भात सर्वदूर पावसाचा अंदाज आहे. तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात काही ठिकाणी मेघगर्जना, विजांसह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा दक्षिणेकडे आला असून, राजस्थानच्या जैसलमेरपासून, चित्तोगड, तिकामगड, अंबिकापूर, पुरी ते बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे. पश्‍चिम राजस्थान, आणि छत्तीसगड परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. तेलंगणा परिसरावरही नव्याने चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली आहे. 

कमी दाब क्षेत्र वाढविणार पावसाचा जोर झारखंड आणि परिसरावर असलेले कमी दाबाचे क्षेत्र निवळून गेले आहे. यातच म्यानमारच्या किनाऱ्यालगत असलेल्या चक्राकार वाऱ्यांची स्थिती मुळे पूर्व मध्य बंगालच्या उपसागरात आज (ता. २४) सायंकाळपर्यंत नवीन कमी दाबाचे क्षेत्र तयार होणार असून, ते ओडिशाच्या किनाऱ्याकडे येण्याचे संकेत आहेत. या प्रणालीमुळे रविवारी (ता. २६) पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. राज्यात पावसाचा जोर काहीसा कमी झाला असला तरी उद्या (ता. २४) कोकण, पश्‍चिम विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. विदर्भासह, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांसह पावसाची शक्यताही हवामान विभागाने वर्तविली आहे. 

जोरदार पावसाचा  इशारा (येलो अलर्ट) कोकण : रायगड, रत्नागिरी.  विदर्भ : अकोला, वाशीम, यवतमाळ.

विजा, मेघगर्जनेसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) मराठवाडा : परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर. विदर्भ : बुलडाणा, अमरावती, वर्धा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com