Agriculture news in Marathi Rainfall forecast in Vidarbha, Konkan | Page 2 ||| Agrowon

विदर्भ, कोकणात पावसाचा अंदाज

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 24 सप्टेंबर 2021

आज (ता. २४) कोकण, विदर्भात सर्वदूर पावसाचा अंदाज आहे. तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात काही ठिकाणी मेघगर्जना, विजांसह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

पुणे : राज्यात पावसाने दमदार हजेरी लावल्यानंतर दोन दिवस पावसाचा जोर काहीसा कमी होण्याची चिन्हे आहेत. आज (ता. २४) कोकण, विदर्भात सर्वदूर पावसाचा अंदाज आहे. तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात काही ठिकाणी मेघगर्जना, विजांसह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा दक्षिणेकडे आला असून, राजस्थानच्या जैसलमेरपासून, चित्तोगड, तिकामगड, अंबिकापूर, पुरी ते बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे. पश्‍चिम राजस्थान, आणि छत्तीसगड परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. तेलंगणा परिसरावरही नव्याने चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली आहे. 

कमी दाब क्षेत्र वाढविणार पावसाचा जोर
झारखंड आणि परिसरावर असलेले कमी दाबाचे क्षेत्र निवळून गेले आहे. यातच म्यानमारच्या किनाऱ्यालगत असलेल्या चक्राकार वाऱ्यांची स्थिती मुळे पूर्व मध्य बंगालच्या उपसागरात आज (ता. २४) सायंकाळपर्यंत नवीन कमी दाबाचे क्षेत्र तयार होणार असून, ते ओडिशाच्या किनाऱ्याकडे येण्याचे संकेत आहेत. या प्रणालीमुळे रविवारी (ता. २६) पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. राज्यात पावसाचा जोर काहीसा कमी झाला असला तरी उद्या (ता. २४) कोकण, पश्‍चिम विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. विदर्भासह, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांसह पावसाची शक्यताही हवामान विभागाने वर्तविली आहे. 

जोरदार पावसाचा 
इशारा (येलो अलर्ट)
कोकण :
रायगड, रत्नागिरी. 
विदर्भ : अकोला, वाशीम, यवतमाळ.

विजा, मेघगर्जनेसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट)
मराठवाडा :
परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर.
विदर्भ : बुलडाणा, अमरावती, वर्धा.


इतर अॅग्रो विशेष
दहा वर्षांवरील हरभरा वाणांना अनुदान नाहीपुणे ः राज्यात रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना हरभरा...
प्रक्रिया उद्योगातून शेती झाली किफायतशीरमानकरवाडी (ता. जावळी, जि. सातारा) येथील संगीता...
यंदा कापूस तेजीतच राहणारपुणे : महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेशात...
पावसाने वाढली सोयाबीनची आवक नागपूर ः मध्य प्रदेशात पावसाच्या शक्‍यतेमुळे...
ड्रायपोर्टमुळे संत्रा निर्यातीला चालनानागपूर : वर्धा जिल्ह्यातील सिंधी रेल्वे येथे...
शेतीमाल साठवणूक, तारण कर्ज, ब्लॉकचेनची... पुणे : राज्य वखार महामंडळाच्या शेतीमाल...
मतदार नोंदणीसाठी राज्यभरात...नागपूर : राज्यात सर्व ग्रामपंचायतींमध्ये १६...
अकोल्यातील सिंचन प्रकल्पांच्या...अकोला ः जिल्ह्यातील सर्व सिंचन प्रकल्पांची देखभाल...
अन्नधान्य भाववाढीच्या चर्चा निराधारपुणे : सध्या अन्नधान्य महागाईच्या चर्चांना ऊत आला...
राज्यात थंडीची चाहूलपुणे : नैऋत्य मोसमी वारे (मॉन्सून)...
इंधन दरवाढ, महागाई दिसत नाही, कांद्याची...नाशिक : एकीकडे इंधन खर्च, निविष्ठांचे वाढते दर,...
पावसामुळे द्राक्ष हंगामात अडचणी वाढल्यानाशिक : सप्टेंबर महिन्यापासून द्राक्ष उत्पादक...
सरासरी ते सरासरीपेक्षा कमी तापमानाचा...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) १४...
महाराष्ट्राच्या समृद्ध पीकसंपदेचा...संगमनेर, जि. नगर ः ‘‘महाराष्‍ट्रात पिकांची मोठी...
सांगली जिल्ह्यात ५० टक्के द्राक्ष...सांगली : जिल्ह्यात द्राक्ष पिकाच्या फळछाटणीची गती...
लखीमपूर खेरी घटनेतील  शेतकऱ्यांच्या...वर्धा : उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे भाजप...
राज्यभरात निघणार लखीमपूर खेरी  किसान...  नाशिक : उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खेरी...
गोड्या पाण्यात निर्यातक्षम व्हेमानी...गोड्या पाण्यात कोळंबी व त्यातही ‘व्हेनामी’ जातीचे...
‘ऑयस्टर’ मशरूमला मिळवली बाजारपेठसांगली जिल्ह्यातील बावची येथील प्रदीप व राजेंद्र...
कृषी विकासाचे भगीरथ ठरलेल्या...पुणे : कष्टकरी शेतकऱ्यांच्या मनगटाला बारा...