agriculture news in marathi, rainfall in four districts,aurangabad, maharashtra | Agrowon

मराठवाड्यातील चार जिल्ह्यांत पाऊस
टीम अॅग्रोवन
रविवार, 21 जुलै 2019

औरंगाबाद / जालना : औरंगाबाद, जालना या दोन जिल्ह्यांतील ११४ मंडळांपैकी तब्बल ७३ मंडळांत हलक्या, मध्यम ते दमदार पावसाने हजेरी लावली. जालना जिल्ह्यातील जामखेड मंडळात जोरदार पाऊस झाला. शनिवारी (ता. २०) सकाळपर्यंतच्या चोवीस तासांत ९३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. याशिवाय लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यातही जोरदार पाऊस झाला.

औरंगाबाद / जालना : औरंगाबाद, जालना या दोन जिल्ह्यांतील ११४ मंडळांपैकी तब्बल ७३ मंडळांत हलक्या, मध्यम ते दमदार पावसाने हजेरी लावली. जालना जिल्ह्यातील जामखेड मंडळात जोरदार पाऊस झाला. शनिवारी (ता. २०) सकाळपर्यंतच्या चोवीस तासांत ९३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. याशिवाय लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यातही जोरदार पाऊस झाला.

औरंगाबाद जिल्ह्यातील ६५ पैकी ४७ मंडळांत प्रदीर्घ खंडानंतर पावसाने हजेरी लावली. शुक्रवारी (ता. १९) तुरळक ते हलक्‍या स्वरूपाचा पाऊस झाला. शनिवारी सकाळपर्यंतच्या चोवीस तासांत मात्र बऱ्याच मंडळांत मध्यम ते दमदार स्वरूपाचा पाऊस बरसला. फुलंब्री तालुक्‍यातील फुलंब्री मंडळात २० मिलिमीटर, वडोदबाजार ४५, आळंद ३८, पीरबावडा २७, पैठण तालुक्‍यातील बिडकीन २३, पाचोड २९, ढोरकीन २२, वैजापूर तालुक्‍यातील लासूरगाव मंडळात ४६, गंगापूर तालुक्‍यातील सिद्धनाथ वडगाव मंडळात ३१, कन्नड तालुक्‍यातील पिशोर मंडळात ३०, खुल्ताबाद तालुक्‍यातील सुलतानपूर मंडळात ४१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. उर्वरित मंडळांत १ ते १८ मिलिमीटर दरम्यान कमी-अधिक प्रमाणात पावसाची नोंद झाली. 

शनिवारीही औरंगाबाद जिल्ह्यातील कायगाव, शेंदूरवादा, गंगापूर, जामगाव, लोहगाव आदी ठिकाणी पाऊस झाला. जालना जिल्ह्यातील ४९ मंडळांपैकी २६ मंडळांत पावसाने हजेरी लावली. अंबड, बदनापूर तालुक्‍यात पावसाचा जोर अधिक राहिला. जालना तालुक्‍यातील जालना मंडळात २५ मिलिमीटर, पाचनवडगाव २२, बदनापूर तालुक्‍यातील दाभाडी ६३, सेलगाव ६०, बावणे पांगरी ४०, अंबड तालुक्‍यातील अंबड ३३, जामखेड ९३, वडीगोद्री ३०, रोहीलागड ५०, सुखापूरी २८, तर घनसावंगी तालुक्‍यातील रांजणी मंडळात २५ मिलिमीटर पाऊस झाला. उर्वरित मंडळात १ ते १९ मिलिमीटर दरम्यान पाऊस झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

लातूर जिल्ह्यातील ४७, तर उस्मानाबाद जिल्ह्यातील ३८ मंडळांत पाऊस झाला. लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्‍यांतर्गत खंडाळी मंडळात ७१ मिलिमीटर, तर उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम तालुक्‍यांतर्गत येत असलेल्या ईट मंडळात ८१ मिलिमीटर पाऊस झाला. लातुरातील अहमदपूर, उदगीर, चाकूर, देवणी तालुक्‍यासह लातूर तालुक्‍यातील काही मंडळांत दमदार पाऊस झाला. 

उदगीर तालुक्‍यातील उदगीर मंडळात ४६ मिलिमीटर, देवर्जन ३८, वाढवणा बु. २५, नागलगाव ५०, अहमदपूर तालुक्‍यातील अहमदपूर २०, किनगाव ३४, शिरूर ताजबंद २१, अंधोरी ४०, चाकूर तालुक्‍यातील शेळगाव २६, लातूर तालुक्‍यातील गातेगाव २०, मुरूड २८, चिंचोली ब. २०, निलंगा तालुक्‍यातील पानचिंचोली २०, अंबूलगा बु. २०, औराद श. २५, निटूर ५२, देवणी तालुक्‍यातील देवणी बु. ३७, शिरूर अनंतपाळ तालुक्‍यातील हिसामाबाद २५, साकोळ मंडळात ३० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. 

तुळजापूर मंडळात ५९ मिलिमीटरची नोंद

उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब, भूम, लोहार, तुळजापूर तालुक्‍यातील बहुतांश मंडळांत मध्यम ते दमदार पाऊस झाला. भूम तालुक्‍यातील भूम मंडळात ३७ मिलिमीटर, अंबी २०, लोहारा तालुक्‍यातील लोहारा मंडळात २३, जेवळी २९, कळंब तालुक्‍यातील शरधोन मंडळात २२, गोविंदपूर ३८, उस्मानाबाद तालुक्‍यातील जागजी मंडळात ३१, केशेगाव २४, तुळजापूर तालुक्‍यातील तुळजापूर मंडळात ५९, मंगरूळ २०, सालगरा मंडळात ३८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. 

इतर बातम्या
नगर जिल्ह्यातील ४३ हेक्टर जमीन गेली...नगर  ः जिल्ह्यात पंधरा दिवसांपूर्वी गोदावरी...
नत्राच्या दुहेरी समस्यांवर मात...जागतिक पातळीवर नत्राचे प्रदूषण आणि शेतीसाठी...
डाळिंबाच्या मार्केटिंग, प्रक्रिया...सोलापूर  : ‘‘जिल्ह्यात उत्पादन होणारे डाळिंब...
जळगाव जिल्हा सहकारी दूध संघाला तीन...जळगाव  ः जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक...
औरंगाबाद जिल्ह्यात पावसाअभावी टोमॅटोचे...औरंगाबाद :  जिल्ह्यातील टोमॅटोचे आगार...
अकोला जिल्ह्यातील पाच पशुवैद्यक दवाखाने...अकोला  ः जिल्हा परिषदेअंतर्गत चालविल्या...
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील २३ धरणे भरलीसिंधुदुर्ग : मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील २३...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत...नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील अनेक...
दसरा, दिवाळीसाठी चांदवड तालुक्यात...नाशिक  : चांदवड तालुक्यातील शेतकरी दसरा,...
नगर जिल्ह्यातील वाहून गेलेल्या...नगर : पुराच्या पाण्याने वाहून गेलेल्या जमिनीचे...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे...सिंधुदुर्ग   ः अतिवृष्टीचा भाजीपाला...
महापुराच्या स्थितीतही ‘त्यांनी’ तीन...नवेखेड, जि. सांगली  : मसुचिवाडी (ता....
वसंतराव नाईक यांनी आधुनिक तंत्रज्ञान...पुसद, जि. यवतमाळ   ः देशातील...
सरकारला खरीप, रब्बीतील फरक कळत नाही :...पैठण, जि. औरंगाबाद  : राज्यातील शेतकऱ्यांची...
पूरग्रस्त भागातील घरांच्या दुरुस्तीसाठी...मुंबई  : पूरग्रस्त ग्रामीण भागातील वाहून...
पीक नुकसानभरपाई नको; संपूर्ण कर्जमाफीच...कऱ्हाड, जि. सातारा   ः महापुराने हुती...
नगर जिल्ह्यात ४०५ टॅंकरद्वारे पाणीपुरवठानगर  ः जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी पावसाने...
पूरग्रस्तांना एक हेक्टरसाठी मिळणार...मुंबई : राज्यात विविध भागांत आलेल्या...
राज्याचा पाणीसाठा ६१ टक्क्यांवर;...पुणे : जुलै आणि ऑगस्ट महिन्याच्या सुरवातीला...
‘दावणीची दौलत’ चाऱ्याअभावी खचली; दक्षिण...कोल्हापूर/ सांगली : बारमाही पाण्याने भरलेल्या...