सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला 

सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला
सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला

सातारा : जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी दमदार पावसाचा जोर कायम राहिला आहे. या पावसामुळे शेतात पाणी साचले नद्या, ओढे दुधडी भरून वाहू लागले आहेत. जिल्ह्यात सोमवारी सकाळी आठ पर्यंत २४ तासांत एकूण सरासरी ३०.४२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. 

जिल्ह्यात दमदार पाऊस सुरू आहेत. पश्चिमेकडे महाबळेश्वर, जावली, पाटण, सातारा, कऱ्हाड, वाई, या तालुक्यात संततधार पाऊस सुरू आहे. अधूनमधून पावसाच्या जोरदार सरी येत आहे. जिल्ह्यातील सर्व प्रमुख धरणे पश्चिम भागात असल्याने या पावसामुळे धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत आहे. तसेच नद्यांच्या पाणीपातळीत ही वाढ झाल्याने नद्यांनी दुधडी भरून वाहत आहेत. शेतातही मोठ्या प्रमाणात पाणी साचू लागल्याने पाणी बाहेर काढण्यासाठी शेतकऱ्यांना प्रयत्न करावे लागत आहे. 

भात पिकांसाठी हा पाऊस सर्वात उपयोगी ठरत आहे. डोंगरदऱ्यातून पाणी मोठ्या प्रमाणात वाहू लागल्याने भाताचे वाफे पाण्यानी भरले आहेत. पश्चिमेच्या तुलनेत पूर्व भागात पावसाचे प्रमाण कमी आहे. खटाव, खंडाळा, कोरेगाव या दुष्काळी तालुक्यात मध्यम ते हलका पाऊस पडला आहे. प्रामुख्याने माण व फलटण तालुक्यात पावसाचे प्रमाण खुप कमी असल्याने या तालुक्यातून अजून पाण्याची टंचाई जाणवत असल्याने टँकरचा आधार घ्यावा लागत आहे. 

तालुकानिहाय पाऊस मिलिमीटरमध्ये व कंसात एकूण पाऊस : सातारा- ३३.७९ (८०६.६३), जावळी- ५६.३७ (९९२.४०), पाटण- ५१.३६ (८७०.५७), कराड- २५.३८ (४०३.२३), कोरेगाव- १०.५६ (३४१.२२), खटाव- ६.३० (१९६.६१), माण- ०.१४ (१०७.७०), फलटण- २.३३ (१३६.११), खंडाळा- ६.६५(२७७.८५) , वाई- १४.४३ (४१४.८६), महाबळेश्वर- २०७ (३२०७.३९)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com