Agriculture News in Marathi Rainfall increased soybean arrivals | Page 2 ||| Agrowon

पावसाने वाढली सोयाबीनची आवक 

टीम अॅग्रोवन
रविवार, 24 ऑक्टोबर 2021

मध्य प्रदेशात पावसाच्या शक्‍यतेमुळे शेतकऱ्यांनी एकाचवेळी सोयाबीन विक्रीसाठी बाजारात आणण्यावर भर दिला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची आवक वाढली आहे.

नागपूर ः मध्य प्रदेशात पावसाच्या शक्‍यतेमुळे शेतकऱ्यांनी एकाचवेळी सोयाबीन विक्रीसाठी बाजारात आणण्यावर भर दिला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची आवक वाढली असून, त्यामध्ये उज्जैन, मंदसौर, आष्टा, सिहोर या बाजार समित्यांमध्ये तर रात्रीपासूनच शेतकरी ट्रॅक्‍टरने माल घेऊन येत असल्याने रात्रीदेखील अनेक बाजार समित्यांमधील उलाढाल सुरू होती. काही बाजार समित्यांमध्ये ट्रॅक्‍टरसाठी जागाच नसल्याने शेतकऱ्यांना बाजार समितीबाहेरच ताटकळत राहावे लागले. 

बियाण्यातील तेजी आणि उपलब्धतेचा अडसर असतानाही देशांतर्गत सोयाबीन लागवड क्षेत्रात गेल्या वर्षीच्या तुलनेत पाच ते सात टक्‍के वाढीचा दावा सोयाबीन प्रोसेसर असोसिएशन ऑफ इंडियाकडून केला जात आहे. तरीही शेतकरी सोयाबीन विकण्याची घाई करीत आहेत. परिणामी दर पडले असून, शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. 
तेलवर्गीय पिकांना मिळणाऱ्या दराच्या परिणामी हे घडल्याचे कारण त्यामागे नोंदविण्यात आले आहे. २०२० या वर्षीच्या खरिपात देशात १२० लाख हेक्‍टर क्षेत्रावर लागवड आणि उत्पादन १०५ लाख टन होते. 

मध्य प्रदेशला सोयाबीनचे हब म्हणून ओळखले जाते. सुमारे ६० लाख हेक्‍टरपेक्षा अधिक क्षेत्रावर सोयाबीनची लावगड या राज्यात राहते. या वर्षी मात्र बियाणे उपलब्धतेमधील अडचणीच्या परिणामी हे क्षेत्र अवघ्या ५५.५८७ हेक्‍टरपर्यंत मर्यादित राहिले. या क्षेत्रातून ५२.२९२ लाख टन उत्पादनाचा अंदाज सोपाकडून वर्तविण्यात आला आहे. मात्र परतीच्या पावसाने मध्य प्रदेशातही दाणादाण उडविल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. परिणामी, पीक काढणी आणि मळणीनंतर त्याच्या विक्रीचाच विचार केला जात असल्याने बाजारातील आवक वाढली आहे. बाजार समित्या यामुळे हाउसफुल्ल झाल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात आले. काही बाजार समित्यांमध्ये ३० हजार पोत्यांपेक्षा अधिकची आवक होत असल्याची माहितीदेखील देण्यात आली.

 बाजारात मिळतोय ३८०० ते ५४०० दर 
मध्य प्रदेशातील काही बाजार समित्यांमध्ये अडत्यांकडून रात्रीच शेतकऱ्यांचा माल खाली करून घेतला जात असला तरी लिलावाची प्रक्रिया सकाळीच होत असल्याने इतर शेतकऱ्यांना ताटकळत राहावे लागत असल्याची स्थिती आहे. पावसाच्या शक्‍यतेने शेतकरी शेतीमाल विकला जात असल्याने बाजारात ३८०० ते ५४०० रुपयांचा दर मिळत आहे.

प्रतिक्रिया

मध्य प्रदेशात २५३ बाजार समित्या आहेत. सुरुवातीला दर तेजीत होते. त्यानंतरच्या काळात मात्र केंद्र सरकारने आयात शुल्कात केलेली घट त्यासोबतच १२ लाख मेट्रिक टन सोयाबीन आयात अशा कारणांमुळे दर घसरून आता पूर्वीप्रमाणेच ३८०० ते ५४०० रुपयांवर आले आहेत. दरात आणखी घसरण होईल किंवा पावसामुळे पीक खराब होईल या भीतीमुळे शेतकऱ्यांकडून माल विक्रीसाठी आणला जात आहे. 
- तरुण वेदमुथा (जैन), व्यापारी, आष्टा बाजार समिती, मध्य प्रदेश


इतर बातम्या
नवीन ११४० कृषिपंपांना जोडण्या ः पडळकरनांदेड : ‘‘राज्य शासनाने सुरू केलेल्या कृषिपंप...
नाशिक: किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत...नाशिक: खरीप पणन हंगाम २०२१-२२ मध्ये केंद्र...
सांगली जिल्ह्यात बाधित पिकांचे पंचनामे...सांगली ः जिल्ह्यात गेल्या पाच ते सहा दिवसांपूर्वी...
जळगाव : नावासह पत्ता दुरुस्तीसाठी  ६५...जळगाव : जिल्ह्यात मतदार यादी विशेष संक्षिप्त...
खानदेशात रब्बी पिकांची पेरणी रखडत जळगाव ः खानदेशात रब्बी पिकांची पेरणी रखडतच सुरू...
नाशिक : दुधाळ जनावरांच्या गटवाटप ...नाशिक : पशुसंवर्धन विभागामार्फत नावीन्यपूर्ण...
सोलापूर :सिद्धेश्‍वर कारखान्याला...सोलापूर ः कुमठे येथील श्री सिद्धेश्‍वर सहकारी...
राज्यामध्ये थंडीत वाढ होण्याची शक्यतापुणे : राज्याच्या किमान तापमानात घट होऊ लागली आहे...
मराठवाड्यात रब्‍बीत कपाशीची लागवडऔरंगाबाद : मराठवाडा म्हणजे कपाशीचा पट्टा. या...
मर रोगामुळे तुरीचे उभे पीक वाळू लागलेनांदेड : जिल्ह्यात अतिवृष्टीच्या तडाख्यातून...
बळिराजासाठी पोलिस आले धावूनसिरोंचा, गडचिरोली : शेतात पांढरे सोने, अर्थात...
आंदोलनातील शहिदांना आर्थिक भरपाई द्यावी...नवी दिल्ली ः कृषी कायद्यांविरोधातील शेतकरी...
आरक्षण नाही, तर मतदान नाही; ओबीसींचा...भंडारा : २७ टक्के ओबीसी आरक्षणाबाबत राज्य सरकारने...
सोयाबीन बाजारात हेलकावेपुणे ः पंधरा दिवसांपासून सोयाबीन बाजारात चढ-उतार...
नांदेड जिल्ह्यात फळपीक विमा मंजुरीची...नांदेड : मागील वर्षी मृग तसेच आंबिया बहरासाठी...
औरंगाबाद : जमिनीवरील अत्याचार थांबवू;...औरंगाबाद : आम्ही आमच्या गावातील जमिनीवर होणारे...
प्रोग्रेसिव्ह पॅनेलला  काठावरचे बहुमत पुणे ः पुणे बाजार समितीमधील भुसार व्यापाऱ्यांची...
उत्पादन खर्च वाढल्याने येवल्याची पैठणी...येवला, जि. नाशिक : राजवस्त्र, अर्थात येवल्याची...
रेशीम कोषाला सोनेरी दिवसपुणे : चालू वर्षी रेशीम कोषाला सोन्याचे दिवस आले...
पुणे :एकवीस जागांसाठी २९९ अर्जपुणे : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या...