कोल्हापूरच्या पश्‍चिमेस पावसाचा जोर वाढला

कोल्हापूरच्या पश्‍चिमेस पावसाचा जोर वाढला
कोल्हापूरच्या पश्‍चिमेस पावसाचा जोर वाढला

कोल्हापूर : जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात शुक्रवारी (ता. २६) दिवसभर संततधार पाऊस झाला. गगनबावडा, चंदगड, राधानगरी तालुक्‍यांत दिवसभर पाऊस सुरू असल्याचे पाटबंधारे विभागाच्या सूत्रांनी सांगितले.  दरम्यान, गेल्या ४ दिवसांपासून थोड्या थोड्या प्रमाणात या भागात पाऊस होत होता. शुक्रवारी पहाटेपासून जोरदार पाऊस सुरू झाला. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पावसाची सुरवात झाल्याने शेतकऱ्यांत समाधान व्यक्त होत आहे. पावसास पुन्हा सुरवात झाल्याने नद्यांच्या पाणीपातळीत पुन्हा वाढ होत असल्याचे पाटबंधारे विभागातून सांगण्यात आले. पूर्वेकडील तालुक्‍यात मात्र ढगाळ हवामानच आहे. जिल्ह्यातील राधानगरी धरणात शुक्रवार अखेर ६.८६ टीएमसी पाणीसाठा आहे. कोदे लघुप्रकल्प व जांबरे मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरलेला आहे. पंचगंगा नदीवरील शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी व तेरवाड, भोगावती नदीवरील खडक कोगे, कासारी नदीवरील यवलूज असे एकूण आठ बंधारे पाण्याखाली आहेत. नजीकच्या कोयना धरणात ५३.५४ टीएमसी तर अल्लमट्टी धरणात ११६.८६९ इतका पाणीसाठा आहे. जिल्ह्यातील धरणांमध्ये पाणीसाठा पुढीलप्रमाणे ः तुळशी २.१९ , वारणा २२.३६ , दूधगंगा १२.३४ , कासारी २.१६ , कडवी २.०६, कुंभी २, पाटगाव २.६५ टीएमसी, चिकोत्रा ०.८१, चित्री १.३२, जंगमहट्टी १.०५, घटप्रभा १.५६, जांबरे ०.८२, कोदे लघुपाटबंधारे प्रकल्पात ०.२१ टी.एम.सी. पाणीसाठा आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com