Agriculture news in marathi; Rainfall in Khandesh | Agrowon

खानदेशात संततधार पाऊस

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 27 सप्टेंबर 2019

जळगाव  ः खानदेशात बुधवारी (ता. २५) रात्री अनेक भागांत मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस झाला. यामुळे नदी, नाल्यांना पुन्हा एकदा पूर आला आहे. चाळीसगाव (जि. जळगाव) नजीकच्या गिरणा धरणातून पाण्याचा विसर्ग गुरुवारी (ता. २६) सकाळी वाढविण्यात आला. या धरणातून सकाळी १० हजार क्‍युसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता. 

जळगाव  ः खानदेशात बुधवारी (ता. २५) रात्री अनेक भागांत मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस झाला. यामुळे नदी, नाल्यांना पुन्हा एकदा पूर आला आहे. चाळीसगाव (जि. जळगाव) नजीकच्या गिरणा धरणातून पाण्याचा विसर्ग गुरुवारी (ता. २६) सकाळी वाढविण्यात आला. या धरणातून सकाळी १० हजार क्‍युसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता. 

गेल्या २४ तासात धडगाव व अक्कलकुवा (जि. नंदुरबार) येथील काही भागांत अतिवृष्टी झाल्याची माहिती आहे. या भागातील उदय नदीला मोठा पूर आला आहे. धुळे जिल्ह्यात शिरपूर, शिंदखेडा, धुळे, साक्री येथे मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. साक्री येथे सलग दोन ते तीन तास संततधार पाऊस सुरू होता. जळगाव जिल्ह्यात भुसावळ, बोदवड, मुक्ताईनगर, जामनेर, एरंडोल, पाचोरा, जळगाव, धरणगाव, चोपडा, यावल या भागांत संततधार पाऊस झाला. गेल्या २४ तासांत कुठेही अतिवृष्टी झालेली नसल्याची माहिती मिळाली. 

गिरणा नदीवरील गिरणा धरणाचे लाभक्षेत्र गुजरातमधील डांग जिल्ह्यानजीकचे सापुतारा व नाशिकमधील मालेगाव, दिंडोरी आदी भागांत आहे. या भागात जोरदार पाऊस झाल्याने नाशिक जिल्ह्यातील या नदीवरील हरणबारी, चणकापूर, केळझर या प्रकल्पांमधून पाण्याचा मोठा विसर्ग गिरणा धरणाकडे सोडण्यात आला. गिरणा धरणातील आवक गुरुवारी पहाटे वाढली. या धरणातून गुरवारी सकाळी १० हजार क्‍युसेक पाण्याचा विसर्ग सुरू असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. या पावसामुळे उडदासह कापूस पिकाचे नुकसान झाले आहे. सखल भागात पाणी साचल्याने चोपडा, जळगाव, अमळनेर, पाचोरा आदी भागांतील काळ्या कसदार जमिनीत कापूस पिकाला फटका बसत आहे. मूळकूज रोग कापूस पिकात वाढण्याची भीती आहे. 

गेल्या २४ तासांतील पाऊस (गुरुवारी सकाळी आठपर्यंत, मिलिमीटरमध्ये) ः जळगाव ः एरंडोल १८, पाचोरा १४, धरणगाव १७, जळगाव २४. धुळे ः शिरपूर २१, शिंदखेडा १८. 


इतर ताज्या घडामोडी
औरंगाबादमध्ये आज रानभाज्या महोत्सवऔरंगाबाद  ः ‘‘वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...
सांगलीत ६८ हजार शेतकऱ्यांनी उतरवला...सांगली  ः जिल्ह्यातील ६८ हजार ०१८...
रिसोडमध्ये पावसाची उघडीपवाशीम  ः राज्यात बऱ्याच भागात पाऊस धुमाकूळ...
वाशीम जिल्ह्यात एक लाख ४२ हजार हेक्टर...वाशीम ः पंतप्रधान पीकविमा योजनेत जिल्ह्यातील...
खानदेशात ताग लागवडीला पसंतीजळगाव  ः कमी पाण्यात व उशिरा लागवड करूनही...
पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत घटकोल्हापूर : पश्चिम भागात पावसाचा जोर घटल्याने...
परभणी विभागात बिजोत्पादन होणार २७ हजार...परभणी : यंदा महाबीजच्या परभणी विभागातील परभणी,...
अकोल्यात पाऊस सुरुचनगर  ः अकोले तालुक्याच्या पश्चिम आदिवासी...
विदर्भातील पोल्ट्री व्यावसायिकांचे...अमरावती : विदर्भातील पोल्ट्री व्यावसायिकांना...
इगतपुरी, नाशिक तालुक्यात वाऱ्यामुळे...नाशिक : जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात झालेल्या...
विक्रीअभावी मालवंडीत लिंबू उत्पादकांना...मालवंडी, जि. सोलापूर ः बार्शी तालुक्यातील मालवंडी...
सफेद चिप्पी कांदळवन वृक्ष घोषितमुंबई: सफेद चिप्पी (sonneratia alba) या कांदळवन...
यंदा बैल पोळा उत्साहात साजरा होणार रोपळे बुद्रूक , ता.पंढरपूर , जि . सोलापूर...
हलक्‍या ते मध्यम स्वरूपात पावसाची शक्‍...महाराष्ट्रावरील हवेच्या दाबात बदल होत असून,...
औरंगाबादमध्ये बटाटे २००० ते २४०० रुपये...औरंगाबाद  : येथील कृषी उत्पन्न बाजार...
औसा तालुक्यात उडीद, मूग व्हायरसच्या...औसा, जि. लातूर : तालुक्यातील उडीद आणि मूग ही पिके...
शेतमजुरांसाठी कौशल्याधारीत प्रशिक्षण...नाशिक: बदलत्या पीक पद्धतीमध्ये कीडनाशक फवारणी,...
कोल्हापूर जिल्ह्यात वादळ, पुराचा उसाला...कोल्हापूर: जोरदार वाऱ्यासह सुरु असलेल्या पावसाने...
पुणे जिल्ह्यात पावसामुळे भात लागवडीला...पुणे ः गेल्या चार ते पाच दिवसांपासून पुणे...
पाथरूडच्या बंधाऱ्यांत मुबलक पाणीपाथरूड, जि. उस्मानाबाद : येथील दुधना नदीवर...