खानदेशात ९७ टक्क्यांवर पाऊस

खानदेशात पाऊस सरासरी लवकरच गाठेल, अशी स्थिती असून, एकूण सरासरीच्या तुलनेत ९७ टक्के पाऊस झाला. नंदुरबारात ९५, धुळ्यात ९६ तर जळगाव जिल्ह्यात सरासरीच्या ११९ टक्के पाऊस झाला आहे.
Rainfall in Khandesh at 97%
Rainfall in Khandesh at 97%

जळगाव ः खानदेशात पाऊस सरासरी लवकरच गाठेल, अशी स्थिती असून, एकूण सरासरीच्या तुलनेत ९७ टक्के पाऊस झाला. नंदुरबारात ९५, धुळ्यात ९६ तर जळगाव जिल्ह्यात सरासरीच्या ११९ टक्के पाऊस झाला आहे. जळगाव जिल्ह्यात गुरुवारी (ता. १०) अधिक पाऊस झाला. फक्त तीन तासांत जिल्ह्यात ९५ मिलिमीटर पाऊस झाला. गेल्या तीन दिवसांत पावसाची टक्केवारी वाढली असून, ती ९७ टक्क्यांवर पाऊस झाला आहे.

यंदा जूनमध्ये पावसाने हजेरी लावली. नंतर १२ दिवस पावसाचा जूनमध्ये खंड होता. जुलैमध्येही एकदा जळगाव जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. पुन्हा १५ दिवस पावसाचा खंड राहिला. ऑगस्टच्या सुरुवातीलाही पावसाने दडी मारली. पण ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात जोरदार पाऊस सुरू झाला.  नंदुरबारात जुलै महिन्यात जेमतेम ५४ टक्के पाऊस झाला. नंतर जोरदार पाऊस आला. त्यात टक्केवारी वाढली आहे. अर्थातच एक दोन दिवसांत अधिक पाऊस येण्याचे प्रमाण नंदुरबारातही अधिक आहे.

जळगाव जिल्ह्यात एकूण ७६५ मिलिमीटर, धुळ्यात ७७५ मिलिमीटर तर नंदुरबारात ८१९ मिलिमीटर पाऊस होत असतो. जळगाव जिल्ह्यात यंदा गेल्या वर्षापेक्षा अधिकचा पाऊस सप्टेंबरमध्ये झाला आहे. जळगाव जिल्ह्यातील जोरदार पावसाने भोकरबारी वगळता इतर सर्व प्रकल्प भरले आहेत. गुरुवारी व शुक्रवारी (ता. ११) धुळ्यातील साक्री, शिंदखेडा, शिरपूर या तालुक्यांना पावसाने झोडपले आहे.

जळगाव जिल्ह्यातही शुक्रवारी यावल, जळगाव, धरणगाव, एरंडोल येथे पाऊस झाला. शुक्रवारी जिल्ह्यात एकूण १११ मिलिमीटर पाऊस झाला. काही मंडळांमध्ये अतिजोरदार पाऊस झाल्याची माहिती मिळाली. पाऊस चांगला झाल्याने खानदेशात सर्वत्र रब्बी हंगामाबाबत सकारात्मक वातावरण तयार झाले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com