Agriculture news in marathi, Rainfall in Khandesh is near on average | Agrowon

खानदेशात पाऊस सरासरीच्या उंबरठ्यावर
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 13 सप्टेंबर 2019

जळगाव : मागील आठवडाभरापासून खानदेशात अधूनमधून बरसणाऱ्या पावसामुळे जलसाठे मुबलक झाले आहेत. याच वेळी पाऊस शंभरी किंवा सरासरी गाठेल, असे संकेतही मिळत असल्याची स्थिती आहे.  

जळगाव : मागील आठवडाभरापासून खानदेशात अधूनमधून बरसणाऱ्या पावसामुळे जलसाठे मुबलक झाले आहेत. याच वेळी पाऊस शंभरी किंवा सरासरी गाठेल, असे संकेतही मिळत असल्याची स्थिती आहे.  

गेल्या २४ तासांत (बुधवारी (ता. ११) सकाळी आठपर्यंत) खानदेशात सर्वत्र कमी अधिक पाऊस झाला. कुठेही अतिवृष्टी झाली नसली, तरी सततच्या पावसामुळे टक्केवारी वाढली आहे. जळगाव जिल्ह्यात सरासरीच्या ९७ टक्के, धुळ्यात ९५ टक्के, तर नंदुरबारात १६५ टक्‍क्‍यांवर पाऊस झाला आहे. या २४ तासांतील पावसात अनेक तालुक्‍यांमध्ये पावसाने शंभरी गाठली आहे. त्यात जळगाव जिल्ह्यातील यावल, रावेर, मुक्ताईनगर, अमळनेर, चोपडा, भुसावळ, एरंडोल, धुळ्यातील साक्री, शिरपूर, नंदुरबारमधील नवापूर, तळोदा, शहादा, अक्कलकुवा, धडगाव, नंदुरबार या तालुक्‍यांमध्ये १०० टक्के पाऊस झाला. या आठवड्यातील पावसात जळगाव जिल्ह्यातील महत्त्वाची गिरणा नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. 

मागील वर्षी १० सप्टेंबरपर्यंत जळगाव जिल्ह्यात फक्त एकूण ४२७.३ मिलिमीटर पाऊस झाला होता. यंदा १० सप्टेंबरअखेर ६२५.२ मिलिमीटर पाऊस झाला. मागील दोन दिवस कुठेही अतिजोरदार किंवा मुसळधार पाऊस झाला नाही. तरी मध्यम स्वरूपाचा पाऊस झाल्याने जलसाठे वाढले आहेत. धुळे जिल्ह्यातील कनोली, सोनवद या अनेक वर्षे कोरड्या असलेल्या प्रकल्पातील साठा वाढला आहे. 

शिरपूर (जि. धुळे) तालुक्‍यातील अनेर नदीला पुन्हा एकदा पूरस्थिती निर्माण झाली आहे. खानदेशात मंगळवारी (ता. १०) दिवसभर अधूनमधून हलका व मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. जळगाव, धरणगाव, एरंडोल भागांत सायंकाळी मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. धुळे, शिंदखेडा, साक्री, शिरपूर येथेही पावसाने हजेरी लावली. रात्रीदेखील अधूनमधून पावसाचा शिडकावा सुरू होता. 

बुधवारी सकाळी अकरापर्यंत  २४ तासांतील पाऊस (मिमी) 

जळगाव जिल्हा चोपडा २३, यावल २१, जळगाव १५, एरंडोल १९, पाचोरा १३, जामनेर १४. धुळे ः शिरपूर १९, धुळे १३, शिंदखेडा १९. 
नंदुरबार अक्कलकुवा ३१, धडगाव ३६, नवापूर ३१.

 

इतर ताज्या घडामोडी
नाशिकमध्ये उद्या द्राक्ष ऑक्टोबर छाटणी...नाशिक : महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ,...
सीताफळ कोरडवाहू क्षेत्रासाठी लाभदायी ः...अमरावती ः सीताफळ हे कोरडवाहू क्षेत्राला तारून...
वर्धा ः पांदण रस्ते विकासाकरिता दहा...वर्धा ः निविष्ठा व शेतमालाच्या वाहतुकीत पांदण...
अतिवृष्टीबाधितांना प्रशासनाकडून आर्थिक...गडचिरोली ः अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या...
नुकसानग्रस्त मका उत्पादकांना एकरी २५...परभणी : लष्करी अळीच्या प्रादुर्भावाने मका पिकाचे...
शिक्षक, ग्रामसेवकांना नोकरीच्या ठिकाणी...पुणे  : जिल्हा परिषदेकडून नियुक्त करण्यात...
हिंगोली जिल्ह्यात हळदीच्या क्षेत्रात...हिंगोली  ः यंदा (२०१९-२०) हिंगोली जिल्ह्यात...
नगर जिल्ह्यातील सहा तालुक्यांत अजूनही...नगर ः जिल्ह्यातील सहा तालुक्यांत अजूनही कमीच...
कर्जमुक्तीच्या मागणीसाठी चार गावांमध्ये...परभणी  ः शासनाने केलेली कर्जमाफी फसवी आहे....
सरकारने शेतकऱ्यांना  ५० हजार कोटींची...सातारा   : गेल्या पाच वर्षांत राज्य...
पितृपंधरवाड्यामुळे पुण्यात भाज्यांना...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
दुष्काळमुक्त महाराष्ट्रासाठी...सिंधुदुर्ग  ः कर्जमुक्त आणि दुष्काळमुक्त असा...
मागण्या मंजूर झाल्याने ग्रामसेवकांचे...अकोला  ः विविध मागण्यांसाठी राज्यात २२...
उदयनराजे भोसले यांचा अखेर भाजपमध्ये...नवी दिल्ली  : राष्ट्रवादी काँग्रेसचे...
औषधी गुणधर्म लक्षात घेता, पेरू, शेवगा...सोलापूर ः ‘‘पेरू आणि शेवगा ही तशी दुर्लक्षित पिके...
वंचित, कष्टकरी संघटना विधानसभा लढविणार...पुणे  : राज्य आणि केंद्र सरकारच्या विरोधात...
भंडारा जिल्‍ह्यात पावसामुळे शेकडो हेक्‍...भंडारा ः मध्य प्रदेशातील संततधारेमुळे जिल्ह्यात...
सांगली येथे गूळ ३२०० ते ३८७५ रुपये...सांगली  : येथील बाजार समितीत शनिवारी (ता. १४...
`कांदा आयातीचे धोरण शेतकऱ्यांना...पुणे  : कांदा आयात करण्याचे केंद्र सरकारचे...
स्मार्ट ग्रामअंतर्गत सायखेडा, गिरोली,...वाशीम ः जिल्हा परिषद पंचायत विभागातर्फे...