नगर जिल्ह्यात एक हजार हेक्टरवर पावसाने नुकसान

नगर ः नगर जिल्ह्यामधील राहाता, राहुरी, नेवासा, श्रीरामपूर, कोपरगाव, संगमनेर, अकोले, श्रीगोंदा, कर्जत तालुक्यातील बहूतांश भागात बुधवारी (ता. २५) सायंकाळी जोरदार पाऊस झाला. काही गावांत गारपीट झाली. या पावसाने शेतीपिके, भाजीपाला, फळपिकांचे साधारण एक हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर नुकसान झाल्याचा अंदाज आहे. जिल्हा प्रशासनाने अजून पंचनाम्याचे आदेश दिलेले नव्हते. मात्र, आपत्ती व्यवस्थापनानुसार पंचनामे केले जातील, असे कृषी विभागातून सांगण्यात आले.
Rainfall loss of over one thousand hectares in the nagar district

नगर जिल्ह्यामध्ये सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पाऊस झाला. बुधवारी सायंकाळी संगमनेर, राहुरी, राहाता, कर्जत, श्रीरामपूर, नेवासा तालुक्यात जोरदार पाऊस झाला. काही ठिकाणी गारा पडल्या. भंडारदरा परिसरात ही पाऊस झाला. राहाता तालुक्यातील लोणी, कोल्हार, बाभळेश्वर परिसरात झालेल्या पावसाने काढणीला आलेला गहू, द्राक्षबागा, डाळिंब, कांद्याचे नुकसान झाले. दरम्यान संगमनेर तालुक्यातील वरूडी पठार येथे एका शेतकरयाचा वीज मृत्यू झाला आहे.  

श्रीगोंदा तालुक्यातील आढळगाव, कोकणगाव, भावडी, घोडेगाव, तांदळी दुमाला भागाला तर कर्जत तालुक्यातील निंबे, देमणवाडी, माही जळगाव, भागात पावसाचा तडाखा बसला. नेवासा तालुक्यातील वडाळा महादेव, पानेगाव, मांजरी, शिरेगाव, वळण, करजगाव भागात पाऊस झाला. मंगळवारी झालेल्या पावसाने सुमारे एक हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. अजून पंचनामे करण्याचे आदेश दिलेले नाहीत, मात्र आपत्ती व्यवस्थापनानुसार पंचनामे होतील, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवाजीराव जगताप यांनी सांगितले.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com