राज्यातील 200 मंडळांत अतिवृष्टी

गुरुवारी (ता.21) विदर्भात जोरदार तर कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्राच्या उत्तर भागात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सुत्रांनी वर्तविला आहे.
राज्यातील 200 मंडळांत अतिवृष्टी
राज्यातील 200 मंडळांत अतिवृष्टी

पुणे ः कोकण, मध्य महाराष्ट्र व विदर्भातील काही भागात हवेचे दाब कमी झाल्यामुळे जोरदार पाऊस पडत आहे. कोकणातही धुवाधार पाऊस सुरू असून राज्यातील दोनशे मंडळात अतिवृष्टी झाली आहे. पालघर जिल्ह्यातील माणिकपूर मंडळात सर्वाधिक 371 मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली.

जोरदार पावसामुळे पिकांमध्ये साचून राहिल्याने नुकसानीची भीती वाढली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी नद्या दुथडी भरून वाहत असून कोयना, जायकवाडी, उजनी, भंडारदरा, खडकवासला, गंगापूर अशी मुख्य काही धरणे भरल्याने पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. काही ठिकाणी अतिदक्षतेचा इशाराही देण्यात आला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात दोन दिवसांत नद्यांची पातळी पाच ते दहा फुटांनी वाढली, चिकोत्रा वगळता सर्वच लघू व मध्यम पाटबंधारे प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरु होता. तर -पुणे जिल्ह्यातील पंधरा धरणांतून पाण्याचा विसर्ग करण्यात आला. नगर जिल्ह्यातील भंडारदरा, वाकी, निळवंडे, मुळा आणि आढळा धरणांतून विसर्ग सुरू होता.

बुधवारी सकाळी 11 वाजता खडकवासला धरणातून सर्वाधिक 22 हजार 880 क्‍युसेकने विसर्ग करण्यात आला होता. कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, पालघर, मुंबई परिसरात बुधवारी (ता.20) सकाळपासून हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत होता.

मध्य महाराष्ट्रातही पुणे जिल्ह्यातील पुणे शहर, मावळ, मुळशी, भोर, वेल्हा, शिरूर, साताऱ्यातील महाबळेश्वर, कोल्हापुरातील काही भाग, नगरमधील अकोले तालुक्‍यातील काही मंडळे, राहुरी, नाशिकमधील इगतपुरीतील काही भागात हलक्‍या सरी बरसत होत्या. उर्वरित भागात हवामान ढगाळ होते. मराठवाडा व विदर्भातही काही भागात हवामान ढगाळ होते. काही काही ठिकाणी ऊन पडल्याचे चित्र होते.

कोकणात मुसळधार गेल्या दोन ते तीन दिवसांपासून कोकणात जोरदार पाऊस सुरू आहे. परंतु, सोमवारपासून कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे. मंगळवारीही पावसाचा जोर कायम राहिल्याने कोकणातील अनेक भागांत अतिवृष्टी झाली. कोकणातील पालघर जिल्ह्यातील बहुतांशी सर्वच मंडळात 200 हून अधिक मिलिमीटर पाऊस झाला आहे.

मुंबईच्या परिसरातही जोरदार पडला. तर ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग या जिल्ह्यातील बहुतांशी सर्वच मंडळात अतिवृष्टी झाली असून या मंडळात शंभरहून अधिक मिलिमीटर पाऊस पडला आहे. त्यामुळे काही ठिकाणी भात पिकांचे नुकसान झाले. मुसळधार झालेल्या पावसामुळे कोकणातील विहार, तानसा, भातसा, मध्य वैतरणा, भांडूप, तुलसी, वैतरणा, अप्पर वैतरणा ही धरणे भरली असून पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे.

मध्य महाराष्ट्रात जोर कायम मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, नाशिक, कोल्हापूर, नगर जिल्ह्यांतील काही भागात पावसाचा जोर कायम होता. बुधवारी सकाळपर्यंत नाशिक, नगर, पुणे, सातारा आणि कोल्हापुरातील 22 मंडळात अतिवृष्टी झाली. काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस पडला. पुणे, नगर, नाशिक, सातारा, सांगली जिल्ह्यांच्या पूर्व भागात हलका पाऊस पडला.

सोलापूर आणि नगरच्या काही भागात ढगाळ हवामान होते. तर काही ठिकाणी ऊन पडल्याचे चित्र होते. खान्देशातील जळगाव जिल्ह्यातील काही मंडळात हलका पाऊस पडला. तर धुळे, नंदुरबार जिल्ह्यांत ढगाळ हवामान होते. काही ठिकाणी ऊन पडल्याचे चित्र होते. पश्‍चिम पट्ट्यात असलेल्या सह्याद्रीच्या खोऱ्यात झालेल्या जोरदार पावसामुळे ओढे, नाले, नद्या भरून वाहत होत्या.

त्यामुळे काही भागात भात, तूर, बाजरी, तूर, सोयाबीन, मूग, कापूस या पिकांचे काही प्रमाणात नुकसान झाले. जोरदार पावसामुळे गंगापूर, मुळा, भंडारदरा, निळवंडे, कोयना, उजनी, खडकवासला, घोड, कळमोडी, चासकमान, भामा आसखेड, वडीवळे, आंध्रा, मुळशी, वरसगाव, पानशेत, गुंजवणी, निरा देवधर, वीर अशा काही धरणातून पाणी सोडण्यात आले होते. त्यामुळे पुण्यातील मुळा-मुठा, नगरमधील मुळा, नाशिकमधील गोदावरी नद्या दुथडी भरून वाहत होत्या.

 मराठवाड्याला पावसाचा दिलासा मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, उस्मानाबाद जिल्ह्यातील काही मंडळात पावसाच्या हलक्‍या सरी बरसल्याने मराठवाड्याला काहीसा दिलासा मिळाला. उर्वरित भागात ढगाळ हवामान होते. काही ठिकाणी पावसाने उघडीप दिली होती. त्यामुळे वातावरणात दमटपणा वाढला होता. बीड, लातूर, नांदेड, परभणी, हिगोली जिल्ह्यांत ढगाळ हवामान होते. अनेक ठिकाणी सकाळपासून पडल्याचे चित्र होते.

त्यामुळे आर्द्रतेत वाढ होऊन कमाल तापमानात वाढ झाल्याची स्थिती होती. सध्या मराठवाड्यातील जायकवाडी धरणात नाशिक, नगर जिल्ह्यांतून पाणी सोडल्यामुळे जायकवाडी धरणातून पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. त्यामुळे कापूस, तूर, मूग, बाजरी पिकांना दिलासा मिळाला असून पिकेही वाढीच्या अवस्थेत असून काही ठिकाणी बाजरी, मूग, सोयाबीन पिके काढणीच्या अवस्थेत आली आहेत.

विदर्भातही हलक्‍या सरी विदर्भातील गोंदिया आणि चंद्रपूर भागात हवेचे दाब कमी झाल्यामुळे या जिल्ह्यांतील तीन मंडळात अतिवृष्टी झाली. वर्धा, गोंदिया आणि चंद्रपूर जिल्ह्यांतील काही भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला असून काही ठिकाणी हवामान ढगाळ होते. त्यामुळे कापूस, तूर पिकांना दिलासा मिळाला.

तर बुलडाणा, वाशीम, अमरावती, यवतमाळ, नागपूर, भंडारा जिल्ह्यांतील काही मंळडात हलका पाऊस पडला. अकोला जिल्ह्यात हवामान ढगाळ हवामान होते. काही ठिकाणी ऊन पडले होते. सध्या विदर्भात तूर, कापूस, बाजरी ही पिके वाढीच्या अवस्थेत आहेत.

मंडळनिहाय झालेला पाऊस ः मिलिमीटरमध्ये ठाणे ः ठाणे 140, बाळकुम 162, भाईंदर 265, मुंबई 178.2, दहिसर 164, बेलापूर 218, कल्याण 164, उप्पेर 164, तितवाळा 133,2, ठाकुर्ली 132.2, नांदगाव 135, मुरबाड 171, भिवंडी 140, उप्पेर 132, अनगाव 96, दिघाशी 110, पाढगा 120, खर्बव 129, शहापूर 96, खर्डी 135, किन्हावली 117.2, वसीद 80, ढोलखांब 125, उल्हासनगर 184, अंबरनाथ 175, गोरेगाव 103.3, कुंभारर्ली 176, बदलापूर 238,

रायगड ः अलिबाग 118, पोयनाड 134, किहिम 126, सरल 190, चारी 127, चौऊल 76, रामराज 80, पनवेल 254 पोयान्जे 240.2, वोव्हाले 205.3, करनाळा 285, तळोजे 217, मोरांबे 196.2, कर्जत 204, नेरळ 362, खडाव 79, कळंब 80, कशाळे 76.3, चौक 220, वावोशी 71, खोपोली 153, उरण 240, खोप्रोली 223, जसाई 202, पाली 105, आटोने 97, जमबुलपाडा 102, पेण 220, हमरापूर 235, वाशी 162, कासू 155, कामरळी 150, बिरवडी 75, महाड 88, करंजवाडी 93, नाते 85, खरवली 79, तुडील 105, मानगाव 114, इंदापूर 106, गोरेगाव 94, लोनारे 97, निझामपूर 85, पोलादपूर 105, कोन्डवी 146, वाकन 151, बोर्ली 91, श्रीवर्धन 120, बोर्लीपांचटन 92.3, म्हासळा 152.8, खामगाव 128.6, ताळा 92,

रत्नागिरी ः चिपळून 95, खेर्डी 98, रामपूर 90, वहाळ 115, सावर्डे 188, असुर्डे 105, शिरगाव 198, दापोली 152, बुरोन्डी 80, अंजर्ला 228, वाकवली 120, पालगड 93, वेळवी 192, शिर्शी 70, कुळवंडी 76, दाभीळ 120, आंब्लोळी 90, मंडनगड 116, म्हाप्रळ 118, देव्हरे 110, रत्नागिरी 95, खेडशी 101, पावस 84, फनसोप 74, तरवाल 74, पाली 146, कांदवाई 90, मुरदेव 114, माखजन 77, अंगवली 120, कोंडगाव 118, देवळे 113, देवरूख 95, तुळसानी 81, तेर्हे 93, सौदळ 112, कोढया 116, जैतापूर 134, कुंभावडे 73, नाते 132, ओनी 105, पांचळ 112, लांजा 148, भाम्बेड 132, पुनस 95, सातवली 102, विलवडे 160

सिंधुदूर्ग ः मिठबाम्ब 72, पाटगाव 76, पेढूर 99, मासुरे 117, श्रावण 112, आचरा 103, पोयीप 108, आंब्लोली 192, म्हापन 93, कांकवली 114, फोंन्डा 118, फोंडा 17, सांगवे 107, नांदगाव 92, वागडे 89, काडवळ 127, पिंगुळी 72, येडगाव 107, भुईबावडा 78

पालघर ः वसई 369, मांढवी 327, आगाशी 350, निर्मळ 354, विरार 315, मानिकपूर 371, वाडा 206, कडुस 92, कोने 159, कांचड 198, डहाणू 321.4, मल्याण 318.6, साईवन 100.8, कासा 164, चिचनी 284, पालघर 156, मनोर 198. भोईसर 151, सफाला 188, आगरवाडी 218, तारापूर 294.4, जव्हार 200, साखर 200, मोखाडा 201.2, खोढाळा 144, तलासरी 122, झारी 153, विक्रमगड 190, तालवाडा 178

नाशिक ः इगतपुरी 83, धारगाव 110, वेळुंजे 115

नगर ः अकोले 95, राजूर 90, शेडी 95

पुणे ः मळे 83, पिरंगुड 85, निगुडघर 94, लोणावळा 122, राजुर 110

सातारा ः बामनोळी 95, केळघर 70.8, हेलवक 152, मोरगिरी 73, महाबळेश्वर 248.4, तपोळा 172.4, लमाज 150.4, कोल्हापूर ः राधानगरी 98, गगनबावडा 93, सळवन 94, गावसे 105

गोंदिया ः गोंदिया 74, मोहाडी 78.3

चंद्रपूर ः कोतगूळ 70.2

दृष्टीक्षेपात

  • माणिकपूर मंडळात सर्वाधिक 371 मिलिमीटर; कोकणात धुवाधार
  • मराठवाड्याला दिलासा, विदर्भाला जोरदार पावसाची अपेक्षा
  • भात, तूर, भाजीपाला पिकांमध्ये साचले पाणी, महाबळेश्वर येथील स्ट्रॉबेरी लागवड ठप्प
  • अमरावती जिल्ह्यातील पूर्णा प्रकल्पाचे दरवाजे उघडले
  • खडकवासला, राधानगरी, गंगापूर, भंडारदरा, कोयना, तारळी, धोम-बलकवडी, कण्हेर धरणांतून पाण्याचा विसर्ग
  • कृष्णा, वारणा नद्यांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ, पंचगंगेचे पाणी पात्राबाहेर
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com