Agriculture news in marathi; Rainfall in many parts of Khandesh | Agrowon

खानदेशात अनेक भागांत पावसाने नुकसान

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 8 ऑक्टोबर 2019

जळगाव  ः खानदेशात रविवारी (ता. ६) सायंकाळी व रात्री अनेक भागांत पावसाने हजेरी लावली. यामुळे ज्वारी, कापूस, बाजरी या पिकांचे अंशतः नुकसान झाल्याची माहिती आहे. 

जळगाव  ः खानदेशात रविवारी (ता. ६) सायंकाळी व रात्री अनेक भागांत पावसाने हजेरी लावली. यामुळे ज्वारी, कापूस, बाजरी या पिकांचे अंशतः नुकसान झाल्याची माहिती आहे. 

खानदेशात सर्वत्र ऊन सावल्यांचा खेळ सुरू आहे. स्वच्छ सूर्यप्रकाशित वातावरण नसल्याने धान्याची उघड्यावरील स्वच्छता, वाळवणूक यासंबंधी अडचणी येत आहेत. सध्या सोयाबीन मळणीवर आला आहे. परंतु, वातावरण कोरडे नसल्याने मळणीसंबंधी अडचणी येत आहेत. सकाळी ऊन व दुपारनंतर ढगाळ वातावरण, अशी स्थिती असते. ही बाब लक्षात घेता शेतकरी सकाळीच कापूस वेचणी, पीक कापणीसंबंधीची कामे उरकून घेत आहेत. अशातच रविवारी सायंकाळी अनेक भागांत जोरदार पाऊस झाल्याने उघड्यावर वाळवणुकीसाठी ठेवलेले धान्य, पिके यांची नासाडी झाली. जळगाव जिल्ह्यातील यावल, चोपडा, जळगाव, जामनेर, पाचोरा, धुळ्यातील शिरपूर, शिंदखेडा, धुळे आदी भागांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला.

जळगाव, यावल भागांत सुमारे आठ ते १० मिनिटे मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. सुरवातीला सुसाट वाराही अनेक भागांत होता. यामुळे पूर्वहंगामी कापूस, ज्वारी लोळली. त्यात या पिकांचे अंशतः नुकसान झाले. सुमारे दोन ते तीन मिनिटे सुसाट वारा होता. त्याचा जोर काही वेळेत कमी झाल्याने अधिकचे नुकसान टळले. परंतु, कापसाची बोंडे ओली झाली. ती काळवंडून त्यांचे १०० टक्के नुकसान होण्याची भीती आहे. या पावसामुळे मळणीवर आलेल्या ज्वारी पिकातील कापणीचे काम काही दिवस लांबणीवर पडणार आहे. ज्वारीचा दर्जा फारसा घसरलेला नसल्याचे सांगण्यात आले. 

पूर्वमशागतीला वेग
पावसाचे संकेत व ढगाळ वातावरण लक्षात घेता अनेक शेतकरी मागील दोन-चार दिवसांपासून मूग, उडदाखाली रिकाम्या झालेल्या क्षेत्रात ट्रॅक्‍टर व बैलजोडीच्या साह्यने पूर्वमशागत करून घेत आहेत. कारण, पाऊस आल्यास मशागत रखडेल व पुढील रब्बी हंगामाची पेरणी लांबणीवर पडू शकते, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. 
 


इतर ताज्या घडामोडी
योग्य पद्धतीने करा बटाटा काढणीयंदा बटाटा पिकाची काढणी फेब्रुवारी- मार्च...
मध्य प्रदेशात द्राक्ष लागवडीसाठी ‘...पुणे : मध्य प्रदेशातील बागायतदार शेतकरी आता...
खरबूज लागवड तंत्रज्ञानखरबूज पिकाची लागवड जानेवारी ते मार्च यादरम्यान...
नांदर्खे, खोंडमळीत आधार प्रमाणीकरण,...नंदुरबार  ः महात्मा फुले कर्जमुक्ती...
जळगाव  : आधार प्रमाणीकरण करण्यासाठी...जळगाव  : महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी...
कांदा दरांवरील दबाव वाढलाजळगाव  ः खानदेशातील प्रमुख बाजार...
गडहिंग्लजमध्ये यंदा अधिक पाणीसाठागडहिंग्लज, जि. कोल्हापूर : गतवर्षीच्या ऑगस्ट...
यवतमाळ जिल्हा बॅंकेकरिता तब्बल ३००...यवतमाळ  ः जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या...
मोसंबीला खतमात्रा देणे अत्यंत आवश्‍यक...औरंगाबाद : ‘‘मोसंबी पीक हे शेतकऱ्यांची...
उच्च तंत्रज्ञानावर आधारित फुलशेती...नाशिक : मालेगाव तालुक्यातील वडेल येथील कृषी...
नांदेड विभागात साखरेचे २५ लाख क्विंटलवर...नांदेड : नांदेड विभागातील परभणी, हिंगोली, नांदेड...
नांदेड जिल्ह्यातील भूजल पातळीत १.२६...नांदेड : नांदेड जिल्ह्यातील भूजल पातळीमध्ये...
नाशिक : माथाडींच्या संपामुळे बाजार...नाशिक  : राज्यातील माथाडी कामगारांच्या...
‘भीमा’च्या कामगारांचे पैसे पाच...मोहोळ, जि. सोलापूर : कामगारांच्या खात्यावर ५...
सावरकरांच्या गौरव प्रस्तावावरून भाजप...मुंबई ः स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या गौरव...
करमाळ्यात शुद्ध; पंढरपुरात सर्वांत...सोलापूर : जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याचे ६१५...
शिवस्मारक निविदेत गैरव्यवहार नाही;...मुंबई ः मुंबईजवळच्या अरबी समुद्रात उभारण्यात...
तूर खरेदीसाठी हमी देण्याबाबत मंत्रिमंडळ...मुंबई ः ‘‘राज्यात सध्या ३१७ तूर खरेदी केंद्रे...
पुणे जिल्ह्यात भाजीपाला पिकांकडे...पुणे ः गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून पोषक...
राज्यसभेच्या निवडणुकीसाठी २६ मार्चला...मुंबई ः राज्यसभेच्या ५५ जागांसाठी येत्या २६ मार्च...