सोलापूर जिल्ह्यात बहुतांश भागांत पाऊस

सोलापूर जिल्ह्यात बहुतांश भागांत पाऊस
सोलापूर जिल्ह्यात बहुतांश भागांत पाऊस

सोलापूर : जिल्ह्यात विजेच्या कडकडाटासह मंगळवारी (ता. २४) दुपारनंतर अनेक भागांत पावसाने सुरुवात केली. त्यात जोर नसला तरी बहुतांश भागांत त्याची हजेरी सुखावणारी होती. त्यामुळे काहीसे समाधान असले, तरी पावसाचा आणखी जोर वाढण्याची अपेक्षा आहे. 

दरम्यान, या पावसात अक्कलकोट तालुक्‍यातील मैंदर्गी येथे वीज पडून एक विवाहित महिला मृत पावली. बार्शी तालुक्‍यातील वैराग येथे १०, तर अक्कलकोट तालुक्‍यातील जेऊर येथे पाच शेळ्या दगावल्या आहेत. बुधवारीही (ता. २५) पुन्हा सकाळी उशीशिरा सूर्यदर्शन झाले. तसेच काही भागात पावसाने हलकी हजेरीही लावली. 

मंगळवारी दिवसभर ढगाळ आणि काहीसे ऊन असे वातावरण होते. दुपारनंतर वातावरणात एकदमच बदल झाला. रात्री उशिरापर्यंत अनेक भागात पावसाने सुरवात केली. बार्शी, अक्कलकोट, पंढरपूर, करमाळा, मोहोळ, मंगळवेढा भागात त्याने चांगलीच हजेरी लावली. याच दरम्यान विजेच्या कडकडाटासह पाऊस झाला. यात दुपारी दोनच्या सुमारास मैंदर्गी (ता. अक्कलकोट) येथे पूजा हुगी (वय-२७) या शेतमजूर महिलेचा मृत्यू झाला. निंबळक (ता. बार्शी) येथे १० शेळ्या दगावल्या, तसेच जेऊर (ता. अक्कलकोट) येथेही पाच शेळ्या दगावल्या. 

बुधवारीही पुन्हा दुसऱ्या दिवशी पावसाने सकाळपासूनच सुरवात केली. पण दुपारनंतर त्याने विश्रांती घेतली. माढा तालुक्‍यात झालेल्या पावसामुळे सीना नदीच्या पाण्यात वाढ झाली आहे. सीना नदीमध्ये यापूर्वी उजनीतून सोडलेले पाणी सुरू होते. त्यातच पावसाने पाणी पडल्याने पाणीपातळी काहीशी वाढली आहे.

बार्शी तालुक्‍यात झालेल्या पावसामुळे भोगावती नदीलाही अनेक वर्षांनंतर पाणी आले आहे. त्या पाण्याचे पूजन इर्ले येथील ग्रामस्थांनी केले. सध्या पावसाने पुन्हा सुरुवात केली असली, तरी त्याचा जोर आणखी वाढायला हवा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com