agriculture news in marathi Rainfall in Nanded district Longing; The sowing was stoped | Agrowon

नांदेड जिल्ह्यात पावसाची ओढ; पेरण्या खोळंबल्या

टीम अॅग्रोवन
बुधवार, 23 जून 2021

नांदेड : जिल्ह्यात जून महिन्याच्या सुरवातीपासून पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीनसह कपाशी, हळद, तूर, मुग, उडीद, ज्वारी या पिकांच्या पेरण्यांना सुरवात केली. परंतु मागील तीन दिवसांपासून पावसाने ओढ दिल्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी थांबवली आहे.

नांदेड : जिल्ह्यात जून महिन्याच्या सुरवातीपासून पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीनसह कपाशी, हळद, तूर, मुग, उडीद, ज्वारी या पिकांच्या पेरण्यांना सुरवात केली. परंतु मागील तीन दिवसांपासून पावसाने ओढ दिल्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी थांबवली आहे.

शनिवारपर्यंत जिल्ह्यात एक लाख ४८ हजार ९१५ हेक्टरनुसार २०.५ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे.  
जिल्ह्यात मागील पंधरा दिवसांत १६६.४० मिलीमीटरनुसार २०.४० टक्के पावसाची नोंद झाली. यामुळे शेतकरी पेरणीच्या कामांना लागले. शेतकऱ्यांनी जिरायती भागात सोयाबीन, कापूस, ज्वारी, तूर, मूग, उडीद, तीळ, कारळ या पिकांची पेरणी केली. शनिवारपासून (ता.१९) पावसाने हुलकावणी दिली. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरण्यांची कामे थांबवली आहेत.

शेतकऱ्यांनी पावसाची वाट बघून सोयाबीनला तुषार संचाव्दारे पाणी देण्याची व्यवस्था केली आहे. परंतु पाणी नसलेले शेतकरी आकाशाकडे टक लावून आहेत. यंदा सोयाबीन बियाणांची टंचाई आहे. 

सोयाबीन पेरून पाच-सहा दिवस झाले. या काळात पावसाने पाठ फिरविली. त्यामुळे पिकाला तुषार संचाद्वारे पाणी द्यावे लागले.
- परमेश्वर शिंदे, शेतकरी, धनंज बु, ता. लोहा.


इतर बातम्या
पीककर्जाचे ‘वरातीमागून घोडे’पुणे ः शेतकऱ्यांना खरिपासाठी दिल्या जाणाऱ्या पीक...
शेतकरी पुत्रांचा #सोयाबीन ट्रेंडनांदेड : सोयाबीनचे दर ११ हजारांवरून पाच हजार...
कोकणात पावसाचा जोर कायमपुणे : राज्यात गेले काही दिवस पावसाने हजेरी लावली...
विदर्भ, कोकणात पावसाचा अंदाजपुणे : राज्यात पावसाने दमदार हजेरी लावल्यानंतर...
शेट्टींची कारखान्यांशी सेटलमेंट :...जयसिंगपूर, जि कोल्हापूर : थकीत ‘एफआरपी’वरील पंधरा...
पाऊस सुरूच; ओल्या दुष्काळाचे सावटपरभणी ः राज्यात आठ दिवसांपासून पावसाचे पुनरागमन...
मुंबै बँकेची चौकशी केवळ सुडाने आणि...मुंबई ः मुंबै बँकेच्या विरोधात चौकशी करण्याचा...
सेंद्रिय शेतीतून काळ्या आईचे आरोग्य जपा...नाशिक : रासायनिक शेतीचे परिणाम दिसत असल्याने...
नागपुरात पावणेदोन वर्षातही  कर्जमाफीची...नागपूर : शेतकऱ्यांवरील कर्जाचा डोंगर कमी...
नागपुरात ओला दुष्काळ जाहीर करण्याची...नागपूर : सरकारी नियमानुसार ११० टक्क्यांहून अधिक...
जळगावात ई-पीक नोंदणी प्रक्रियेत अडचणीवावडे, जि. जळगाव : राज्य शासनाने शेतातील पीकपेरा...
हवामान बदलाची दिशा ओळखा : शास्त्रज्ञ...कोल्हापूर : हवामान बदलांचा सर्वाधिक परिणाम बर्फाळ...
नगर : कांदादरात प्रति क्विंटल  दोनशे...नगर : बाजार समित्यांत कांद्याची आवक कमी झालेली...
परभणीत कृषी विद्यापीठाचे रब्बी पिकांचे...परभणी ः वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाने उत्पादित...
मुळा, भंडारदरा,  निळवंडेतून विसर्ग नगर : अकोले तालुक्याच्या पश्चिम भागात दोन...
गोदावरीच्या पाणीपातळीत  वाढ नाशिक : गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्याच्या...
मराठवाड्यात नुकसानग्रस्त पिकांचे ६७.२६...औरंगाबाद : प्राथमिक अंदाजात जवळपास १५ लाख हेक्‍...
नांदेड जिल्ह्यात नुकसानग्रस्त...नांदेड : जिल्ह्यात जुले, ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये...
जळगावातील धरणांत ८० टक्के उपयुक्त...जळगाव ः जिल्ह्यात पावसाने आतापर्यंत लावलेल्या...
ऊसबिलाचे तुकडे पाडू  दिले जाणार नाहीत...सातारा : ऊसबिलाचे तुकडे पाडू दिले जाणार नाहीत,...