Agriculture news in Marathi Rainfall in Nanded, Parbhani and Hingoli district for the third consecutive day | Agrowon

नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी पाऊस

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 2 एप्रिल 2020

नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील २६ मंडळांमध्ये सलग तिसऱ्या दिवशी मंगळवारी (ता.३१) पाऊस झाला. वादळी वारे, पावसामुळे शेतीपिके, फळपिकांचे नुकसान झाले. 

नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील २६ मंडळांमध्ये सलग तिसऱ्या दिवशी मंगळवारी (ता.३१) पाऊस झाला. वादळी वारे, पावसामुळे शेतीपिके, फळपिकांचे नुकसान झाले. 

नांदेड जिल्ह्यातील देगलूर, मुखेड, कंधार तालुक्यातील ११ मंडळांमध्ये हलका ते मध्यम, तर परभणी जिल्ह्यातील पूर्णा, गंगाखेड, मानवत,पालम तालुक्यातील ८ मंडळांमध्ये वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस झाला. हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव, कळमनुरी, वसमत तालुक्यातील ७ मंडळांत हलक्या ते मध्यम पावसाने हजेरी लावली.

सलग तीन दिवसांपासून
वादळी वाऱ्यासह पाऊस येत आहे. त्यामुळे रब्बी सुगीतील, हळद काढणीची कामे खोळंबली आहेत. काढणी केलेला शेतमाल भिजत आहे. वाऱ्यामुळे फळगळ होऊन मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकरी धास्तावले आहेत. 

मंळनिहाय पाऊस (मि.मी) 

नांदेड जिल्हा देगलूर ११, खानापूर २, शहापूर १६, मुखेड २, येवती २, मुक्रमाबाद २, कंधार ३, उस्माननगर ७, बारुळ २,पेठवडज २, फुलवळ १०. 
परभणी जिल्हा पालम १, पूर्णा ३, ताडकळस ५, लिमला २१, चुडावा २, गंगाखेड १४, माखणी २, कोल्हा ६. 
हिंगोली जिल्हा गोरेगाव २५, पानकनेरगाव ३.२५, हत्ता ०.२५, वसमत ०.५०, नांदापूर १, आखाडा बाळापूर ०.२५, वारंगा ०.२५.

 


इतर ताज्या घडामोडी
भाटी मिऱ्या समुद्रात नांगरलेली जहाज...चिपळूण, रत्नागिरी : निसर्ग चक्रीवादळाचा जोरदार...
जीएम पिकांच्या मान्यतेसाठी केंद्राकडे...नागपूर: जागतिकस्तरावर जीएम पिकांच्या लागवडीस...
विविध मागण्यांसाठी रेशन दुकानदार ...नाशिक: राज्यातील स्वस्त धान्य दुकानदार व...
मका खरेदी तातडीने सुरू कराबुलडाणा ः मोताळा तालुक्‍यात मागील दहा दिवसांपासून...
शेतकऱ्यांना त्रास झाल्यास भाजप आंदोलन...अकोला ः शेतकऱ्यांना बी-बियाणे, कर्जपुरवठा तसेच...
सिंधुदुर्गात पाऊस सुरूच सिंधुदुर्ग: जिल्ह्यात तिसऱ्या दिवशीही...
जादा खरेदी दर, नापासच्या अधिक ...अकोला ः महाबीजने सोयाबीन वाणाच्या प्रमाणित...
ऊस उत्पादक केंद्राचे वैरी आहेत काय? कोल्हापूर: केंद्र सरकारने शेतकऱ्यांना दिलेल्या...
अकोला जिल्हा परिषदेचा ७६ कोटींचा निधी...अकोला  ः ‘कोरोना’मुळे निर्माण झालेल्या...
हिंगोली जिल्ह्यात ५९ कोटींचे पीककर्ज...हिंगोली   ः हिंगोली जिल्ह्यातील विविध...
कापूस, सोयाबीन उत्पादक विमा...गडचिरोली: धान उत्पादक ३४ हजार शेतकऱ्यांना सुमारे...
नांदेडमध्ये ४७ कोटी ४७ लाखांचे पीक कर्ज...नांदेड : नांदेड जिल्ह्यातील बॅंकांनी...
जालन्यात पाच हजार टन खते एकाच दिवशी...जालना  : जिल्ह्यात एकाच दिवशी पाच हजार...
कर्जमुक्‍ती योजनेची प्रक्रिया ३०...भंडारा ः शासनाने जाहीर केलेल्या महात्मा ज्योतिराव...
जयपूरमध्ये वीज पडून लाखो रुपयांच्या...नाशिक : पूर्वमोसमी पाऊस सुरू झाल्यानंतर बागलाण...
बुलडाणा जिल्ह्यात १५ तारखेपर्यंत...बुलडाणा  : यंदा जिल्ह्यात मॉन्सूनपूर्व पाऊस...
भाजीपाल्याची थेट खरेदी विक्री व्यवस्था...पुणे ः कोरोना टाळेबंदीमध्ये शहरातील विविध भागात...
सातारा जिल्ह्यात सर्वदूर पावसाची हजेरीसातारा ः जिल्ह्यात सोमवारी सर्वदूर पावसाने हजेरी...
कापूस खरेदीसाठी शेतकऱ्यांचा रास्तारोकोयवतमाळ ः महागाव तालुक्‍यातील गुंज येथील...
पुणे जिल्ह्यात पीककर्ज वितरणात...पुणे ः लाॅकडाऊनच्या काळात होरपळून निघालेल्या...