agriculture news in marathi, Rainfall in Nanded, Parbhani and Hingoli districts | Agrowon

नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत पावसाचा कहर

टीम अॅग्रोवन
बुधवार, 22 ऑगस्ट 2018

नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात पावसाने कहर केला असून, मंगळवारी (ता. २१) सकाळी आठ वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये या तीन जिल्ह्यांतील २४ तालुक्यांतील ८० मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली.

नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात पावसाने कहर केला असून, मंगळवारी (ता. २१) सकाळी आठ वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये या तीन जिल्ह्यांतील २४ तालुक्यांतील ८० मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली.

ओढे-नाले, नद्यांना पूर आले आहे. छोटे पूल पुरामुळे पाण्याखाली गेल्यामुळे अनेक गावांचा संपर्क काही काळ तुटला होता. पुराचे पाणी शेतातील उभ्या पिकांमध्ये शिरले. बांध फुटून जमीन खरडून गेल्याने खरीप, फळपीक, भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले. येलदरी, सिधद्धेश्वर, इसापूर, विष्णुपुरी, उर्ध्व मानार, निम्न मानार, निम्न दुधना, करपरा, मासोळी या प्रकल्पांसह गोदावरी नदीवरील उच्च पातळी बंधाऱ्यातील पाणीसाठा वाढला. विष्णुपुरी प्रकल्प, तसेच ढालेगाव बंधाऱ्यातून नदीपात्रात विसर्ग केला जात आहे.

पुरामुळे पाच जणांचा मृत्यू
मारुती बुरकुले (रा. वडगाव ज., ता. हिमायतनगर), भारत तोरकड (ता. कवाना, ता. हदगाव) हे दोघे सोमवारी (ता. २०) नाल्याला आलेल्या पुरात वाहून गेले. त्यापैकी मारुती यांचा मृतदेह दुपारी सापडला. मांजरम येथील पुलावरून सोमवारी (ता. २०) रात्री साडेनऊच्या सुमारास वाहून गेलेल्या तवेरा गाडीतील गंगाराम दिवटे, पारूबाई दिवटे, अनुसया दिवटे (रा. बरबडा, ता. नायगाव) यांचे शोध व बचाव पथकामार्फत मृतदेह बाहेर काढण्यात आले. पुरामध्ये वाहून गेलेल्या विनायक गायकवाड (वय ३०) (रा. बेंद्री, ता. नायगाव) यांचा मृतदेह बेंद्री गावापासून एक किलोमीटर अंतरावर बुधवारी (ता. २१)सकाळी सापडला, असे प्रशासकीय सूत्रांनी सांगितले. नांदेड जिल्ह्यातील ८० पैकी ६० मंडळांमध्ये, तसेच १६ पैकी १२ तालुक्यांत अतिवृष्टी झाली. परभणी जिल्ह्यातील पाच तालुक्यांतील ७ आणि हिंगोली जिल्ह्यातील चार तालुक्यांतील १३ मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली.

मंडळनिहाय पाऊस (मिलिमीटरमध्ये) नांदेड जिल्हा ः नांदेड शहर ७८, नांदेड ग्रामीण ७९, वजीराबाद ८२, वसरणी ८४, तरोडा ७८, तुप्पा ७५, लिंबगाव ९०, विष्णुपुरी ८०, अर्धापूर ७७, दाभड ७५, मालेगाव ६८, हिमायतनगर १३०, सरसरम ९५, जवळगाव ९५, हदगाव ९६, तामसा ७९, मनाठा ४०, पिंपरखेड ९८, निवघा ४८, तळणी ८६,आष्टी १०१, किनवट ८३, बोधडी ५५, इस्लापूर ६५, जलधारा ६९, शिवनी ८५, मांडवी ३१, माहूर ४८, वानोळा ४३, वाई ३८, सिंदखेड ३२, मुदखेड १०२, मुगट ८५, बारड ९१, भोकर १०९, मोघाळी ९०, मातुळ ९६, किनी ८२, उमरी ११८, शिंदी १२७, गोलेगाव ११३, धर्माबाद ७१, जारिकोट ६६, करखेली ८८, बिलोली ८२.

परभणी जिल्हा ः परभणी शहर ५८, परभणी ग्रामीण ५४, पेडगाव ४४, झरी ५४, पिंगळी ६५,जांब ५२, सिंगणापूर ६२, दैठणा ५५, जिंतूर २८, सावंगी म्हाळसा ४६, बामणी ३९, बोरी ३२, आडगाव ४०, चारठाणा २५, सेलू ५३, देऊळगाव ८०, कुपटा २८, वालूर ३२, चिकलठाणा ३६, मानवत ४२, केकरजवळा ४६, कोल्हा ५२, पाथरी ७४, बाभळगांव ३२, हदगांव ७७, सोनपेठ ६१, आवलगाव ५७, गंगाखेड ६३, महातपुरी ४८, माखणी ३५, राणीसावरगाव ४०, पालम ६९, चाटोरी ५३, बनवस ४५, पूर्णा ७१, ताडकळस ८४, चुडावा ५९, लिमला ४८, कात्नेश्वर ५२.

हिंगोली जिल्हा ःहिंगोली ८१, नरसी ४८, सिरसम ७७, बासंबा ८२, डिग्रस ३७, माळहिवरा ७८, खंबाळा ६५, कळमनुरी ९०, नांदापूर ९५, आखाडा बाळापूर ७४, डोंगरकडा ५८,वारंगा फाटा ६१.


फोटो गॅलरी

इतर अॅग्रो विशेष
‘गोकूळ’चे दूध आता टेट्रापॅकमध्येही...कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाने (...
खाद्यतेल आयातशुल्क कपातीने सोयाबीन,...पुणे: केंद्र सरकारने खाद्यतेल आयातशुल्कात कपात...
कांदा लिलाव अखेर सुरूनाशिक: जिल्हा उपनिबंधकांनी तातडीने लिलाव सुरू...
केंद्र सरकार खाद्यतेल आयात शुल्क...नवी दिल्ली ः देशांतर्गत बाजारात खाद्यतेलाचे...
कांदा खरेदीनंतर अवधीच्या निर्णयात गोंधळ...नाशिक : बाजार समितीत कांदा खरेदी केल्यानंतर...
सांगली बाजार समितीत हळदीची उलाढाल २८०...सांगली ः कोरोना विषाणूमुळे बाजार समित्या बंद...
मोसंबी फळपिक विमा अर्जात गारपीटीचा कॉलम...पुणे ः आंबिया बहारातील मोसंबी, डाळिंब,...
पुरानं आमचं जगणंच खरवडून नेलंयसोलापूर ः नदीकाठी शेत असल्यानं दरवर्षी ऊस करतो,...
गुणवत्तापूर्ण सीताफळ उत्पादन हेच ध्येयबाजारपेठेचा अभ्यास आणि योग्य नियोजन केल्यास...
स्पॉन, अळिंबी उत्पादनाचा ‘कोल्हापूर...शिरटी (ता.शिरोळ,जि.कोल्हापूर) येथील उच्चशिक्षित...
धुके पडण्यास प्रारंभ...पुणे ः परतीचा मॉन्सून गेल्यानंतर राज्यातील...
मोह फुलांचा वाढेल गोडवाराज्यामध्ये ऐन नवरात्रीमध्ये मॉन्सून देवतेने...
देखो तो कहीं चुनाव है क्या?‘स रहद पर तनाव है क्या, देखो तो कहीं चुनाव है...
कांदा खरेदीनंतर व्यापाऱ्यांना मिळणार...नाशिक : बाजार समितीत कांदा खरेदी केल्यानंतर...
मराठवाड्यात साठ टक्के कपाशीवर गुलाबी...नांदेड : ‘‘मराठवाड्यात लवकर येणारे कापूस वाण...
कंपन्यांनी सर्वेक्षण न केल्यास विमा...पुणे: राज्यात विमा कंपन्यांनी पीक नुकसानीचे...
इथेनॉल दरात तीन रुपयांपर्यंत वाढकोल्हापूर : यंदाच्या हंगामात इथेनॉलनिर्मितीला गती...
एक लाख टन कांदा आयातीची शक्यतानवी दिल्ली ः देशातील कांदा दरवाढीवर नियंत्रण...
कापूस खरेदीसाठी तीस केंद्रे अंतिमनागपूर : गेल्या हंगामात नव्वद केंद्र आणि १५०...
फळ पीकविमा योजनेवर केळी उत्पादकांचा...जळगाव ः हवामानावर आधारित फळ पीकविमा योजनेत केळी...