नाशिक जिल्ह्यात पावसाची विश्रांती; धरणांतील विसर्गात घट

नाशिक जिल्ह्यात पावसाची विश्रांती; धरणांतील विसर्गात घट
नाशिक जिल्ह्यात पावसाची विश्रांती; धरणांतील विसर्गात घट

नाशिक : जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली होऊन जनजीवन विस्कळित झाले होते. शेतकऱ्यांसह शेतमजूर, विद्यार्थी, नोकरदार वर्ग आदींबरोबर जनावरांचेही हाल झाले. मंगळवारी (ता. ६) दुपारपासून पावसाने विश्रांती घेतली असून, धरणातील विसर्ग घटला आहे. दरम्यान, महापुरानंतर बुधवारी (ता. ७) जनजीवन सुरळीत झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. गेल्या शनिवारपासून तीन दिवस झालेल्या मुसळधार पावसाने जिल्ह्यातील धरणांमधून मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्यात आल्याने गोदावरी नदीने धोक्याची पातळी ओलांडली होती. त्याचा नाशिक शहर व गोदावरी काठच्या गावांना मोठा फटका बसला. त्यामुळे काही ठिकाणी जीवितहानी तर मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाली आहे. पावसाचा जोर कमी झाल्यामुळे धरणांमधील पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आल्याने पुराची तीव्रता कमी झाली आहे. दरम्यान, पावसाचे माहेरघर असलेल्या इगतपुरी आणि त्र्यंबकेश्‍वरमध्ये पावसाची तीव्रता कमी होत असताना कळवण आणि सुरगाण्यात मात्र जोरदार पाऊस सुरू आहे.  जिल्ह्यात त्र्यंबकेश्‍वर, इगतपुरी आणि नाशिकसह अन्य तालुक्यांमध्ये मुसळधार पाऊस झाल्यामुळे गंगापूर धरणात ९४ टक्के पाणी साठा झाल्याने २४ हजार क्युसेक इतके पाणी सोडण्यात आले होते. नांदूरमधमेश्‍वर धरणामधूनदेखील दीड लाख क्युसेकच्या जवळपास पाणी सोडावे लागले होते. त्यामुळे सायखेडा आणि चांदोरीला पुराचा चांगलाच फटका बसला. मात्र पावसाने विश्रांती घेतल्याने कामकाज सुरळीत झाले आहे. विशेष म्हणजे सूर्यदर्शन झाल्याने नागरिक सुखावले. 

चांदोरी, सायखेड्यात जनजीवन सुरळीत गोदावरी नदी पुराच्या वेढ्यात अडकलेल्या चांदोरी व सायखेडा गावातातील जनजीवन तब्बल ७२ तासांनंतर सुरळीत झाले आहे. मात्र नदीच्या पाण्याबरोबर पूरपाण्याने वाहून आलेला गाळ व घाण यामुळे दुर्गंधी पसरली असून स्वच्छता करण्याचे काम नागरिक करीत आहे.

धरणांतून सुरू असलेला विसर्ग (ता. ७ अखेर)

धरण पाणीसाठा (दलघफु) विसर्ग (क्युसेक) 
गंगापूर ४९९२ २४५०
कश्यपी १७९४ ८४४
गौतमी गोदावरी १७७२ ४१७
आळंदी ९७० १२६३
पालखेड ४५९ १०२६६
करंजवण ४९८५ ४०७०
वाघाड २३०२ २२८३ 
दारणा ६३२० ९३३२
भावली १४३४ ८८१ 
वालदेवी ११३३ १८६९
कडवा १४५२ ७६२
नांदूर मध्यमेश्‍वर ८४ ५६६७२ 
भोजापूर ३६१ १३१०
चणकापूर १५९४ ५५८६
हरणबारी ११६६ २५८८
केळझर ५७२ ८३९
पुनद ८९६ १३४२

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com