हिंगोली, परभणीकडे पावसाची पाठ

औरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यातील जवळपास २०८ मंडळांत शुक्रवारी (ता. ३१)सकाळपर्यंतच्या चोवीस तासांत तुरळक, हलका ते मध्यम पाऊस झाला.
Rainfall no coming at Hingoli, Parbhani
Rainfall no coming at Hingoli, Parbhani

औरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यातील जवळपास २०८ मंडळांत शुक्रवारी (ता. ३१)सकाळपर्यंतच्या चोवीस तासांत तुरळक, हलका ते मध्यम पाऊस झाला. औरंगाबाद जिल्ह्यातील काही मंडळांत पावसाचा जोर थोडा अधिक होता.

औरंगाबाद जिल्ह्यातील जवळपास ६१ मंडळांत तुरळक, हलका, मध्यम ते दमदार पाऊस झाला. जिल्ह्यातील १६ मंडळांत माध्यम, तर इतर मंडळांत तुरळक, हलका पावसाची हजेरी लागली. बीड जिल्ह्यातील ४४ मंडळांत हजेरी लावणारा पाऊस ६ मंडळांत मध्यम ते दमदार, तर इतर मंडळांत हलक्या स्वरूपात बरसला.

हिंगोली जिल्ह्याकडे पावसाने पाठ फिरविली. जालना जिल्ह्यातील २० मंडळांत बरसणारा पाऊस दोन मंडळांत मध्यम, तर इतर मंडळांत हलका पाऊस झाला. लातूर जिल्ह्यातील ३७ मंडळांत पाऊस झाला. त्याचा दोन मंडळांत मध्यम स्वरूपाचा जोर राहिला. इतर मंडळांत तुरळक हलका पाऊस झाला. नांदेड जिल्ह्यातील २५ मंडळांत तुरळक पाऊस झाला. उस्मानाबाद जिल्ह्यातील १७ मंडळांत हजेरी लावणारा पाऊस दोन मंडळांत मध्यम, तर इतर मंडळांत हलका झाला. परभणी जिल्ह्यातील केवळ ४ मंडळांत तुरळक पावसाची हजेरी लागली.

जिल्हानिहाय पावसाची  मंडळे (मि.मी)

औरंगाबाद २१.३, उस्मानपुरा २३.५, भाऊसिंगपुरा २२.५, कांचनवाडी ३२.३, चौका २१.८, पिंपळवाडी ३२.८, बालानगर २९.५, लोहगाव ४६, ढोरकिन ४३, बिडकीन २६.८, गंगापूर २३.२ , डोणगाव ४३.५, गारज ४३.८, चापानेर २१.८, देवगाव २९.५, फुलंब्री ३४. बीड जिल्हा ः पिंपळनेर ३०.३, चौसाळा २१, धामणगाव ३२.३, विडा ४१, धारूर ५३.८, तेलगाव २६.९.  जालना जिल्हा ः कुंभारझरी २२.३, दाभाडी २०.३. लातूर जिल्हा ः आष्टा ३२.८,नालेगाव २०. उस्मानाबाद जिल्हा ः बेंबळी २३.८, पारगाव २४.५.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com