परभणी, हिंगोली जिल्ह्यात पावसाचे थैमान

नांदेड : मराठवाड्यातील परभणी, हिंगोली जिल्ह्यात पावसाने थैमान घातले आहे. या पावसामुळे खरिपातील ज्वारी, सोयाबीन, कपाशी व तूर पिकांचे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त भागाची पाहणी करुन भरपाइ देण्याची मागणी होत आहे.
Rainfall in Parbhani, Hingoli district
Rainfall in Parbhani, Hingoli district

नांदेड : मराठवाड्यातील परभणी, हिंगोली जिल्ह्यात पावसाने थैमान घातले आहे. या पावसामुळे खरिपातील ज्वारी, सोयाबीन, कपाशी व तूर पिकांचे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त भागाची पाहणी करुन भरपाइ देण्याची मागणी होत आहे.

गेल्या दोन दिवसांपासून पाऊस होत आहे. शुक्रवारी (ता.१८) सकाळी संपलेल्या २४ तासांत जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात २४.७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

सर्वाधिक पाऊस पूर्णा तालुक्यात ४८.७ मिलिमीटर इतका नोंदविला. जिल्ह्यात गुरुवारी व शुक्रवारी या दोन दिवसांत ढगाळ वातावरण होते. सर्वच तालुक्यांत दिवसा व रात्री उशिरापर्यंत पाऊस सुरूच होता. सेलू तालुक्यातील शुक्रवारपर्यंत (ता.१८) लोअर दुधना प्रकल्प धरणात ८०.०३ टक्के इतका जलसाठा जमा झाला. प्रकल्पात एकूण ३०८.५४३ दलघमी एवढा जलसाठा आहे. यात २०५.९४२ दलघमी जिवंत पाणीसाठा झाला, जो ८५.०३ इतका टक्के आहे.

मानवत तालुक्यात पावसाने नदी, नाले भरभरून वाहत आहेत. काही भागांत कापसाचे व सोयाबीनचे नुकसान झाले. शहरासह ग्रामीण भागाचा विद्युत पुरवठा खंडित झाला. मानवत मंडळात सर्वाधिक ७७, तर कोल्हा मंडळात ३८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. जायकवाडी धरण व माजलगाव धरण पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे दोन्ही धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

करपरा नदीला पूर

सेलू तालुक्यात शुक्रवारी (ता.१८) रात्री दीड ते तीन वाजण्याच्या सुमारास मुसळधार पावसाने हाहाकार माजला आहे. करपरा, दुधना नदीला पूर आला. तर, ओढ्या-नाल्याजवळील शेतजमीन खरडून गेल्याने पिकांचे नुकसान झाले. पंचनामे करून शासनाने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. 

गोदावरी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

पैठण येथील जायकवाडी धरणाच्या उर्ध्व भागातील धरणामधून पाण्याची आवक सुरु आहे. जायकवाडीच्या पाणलोट क्षेत्रातही पाऊस सुरु आहे. धरणाच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. लघु व मध्यम प्रकल्प, तलाव हे शंभर टक्के भरले आहेत. त्यामुळे धरणातील मोठ्या प्रमाणातील पाण्याची आवक पाहता गोदावरी नदीकाठच्या परिसरातील नागरिकांनी सतर्क  रहावे, असे आवाहन जिल्हा आपत्ती प्राधिकरणाचे सचिवांनी केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com