कोल्हापूर जिल्ह्यातील धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम

कोल्हापूर जिल्ह्यातील धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम
कोल्हापूर जिल्ह्यातील धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम

कोल्हापूर : धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम असल्याने राधानगरी धरणाचे चार दरवाजे गुरुवारी (ता. १) दुपारपर्यंत खुले ठेवण्यात आले. थांबून थांबून पावसाच्या जोरदार सरी असल्याने नद्यांच्या पाणीपातळीत वाढच होत राहिली. गुरुवारी सकाळी नऊ वाजता संपलेल्या चोवीस तासांत गगनबावडा तालुक्‍यात सर्वाधिक १५४ मिमी पावसाची नोंद झाली. राधानगरी धरणांतून सात हजार क्युसेक पाणी भोगावती नदीपात्रात येत आहे. यामुळे पश्‍चिमेकडील सर्व नद्यांची पाणीपातळी वाढत आहे, अशी माहिती पूर नियंत्रण कक्षाचे समन्वय अधिकारी एस. एम. शिंदे यांनी दिली.

पंचंगंगेबरोबर वारणा, कृष्णा, दूधगंगा, वेदगंगा आदी नद्यांचे पाणीही अनेक मार्गांवर आल्याने वाहतूक विस्कळित झाली. कोल्हापूर रत्नागिरी, कोल्हापूर- गगबनावडा या मार्गावरील वाहतुकीला फटका बसला. दरम्यान, पंचगंगा नदीचे पाणी वाढू लागल्याने शहराशेजारील उपनगरांतील नागरिकांचे सुरक्षितरीत्या स्थलांतर करण्यास गुरुवारी दुपारी सुरवात करण्यात आली.

पंचगंगा नदीची राजाराम बंधाऱ्याजवळील पाणीपातळी सकाळी दहा वाजता ४१ फूट ८ इंच असून, ८० बंधारे पाण्याखाली गेले आहेत. कोदे लघुप्रकल्प व जांबरे मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला आहे.

नदीनिहाय पाण्याखालील बंधारे

नदी बंधारे
पंचगंगा शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ 
भोगावती  हळदी, राशिवडे, सरकारी कोगे, खडक कोगे, शिरगाव व तारळे
कासारी बाजारभोगाव, वालोली, ठाणे-आळवे, पुनाळ-तिरपन, यवलूज, कांटे, करंजफेन व पेंडाखळे
तुळशी बीड, आरे व बाचणी 
वारणा चिंचोली, माणगाव, कोडोली, चावरे, मांगलेसावर्डे, तांदुळवाडी, शिगाव, खोची व दानोळी 
कडवी सवतेसावर्डे, शिरगाव, पाटणे, सुतारवाडी, वालूर, भोसलेवाडी, येलूर व कोपार्डे 
दुधगंगा दत्तवाड, सिद्धनेर्ली, सुळकुड व बाचणी
कुंभी शेनवडे, कळे (खा), वेतवडे व मांडूकली 
वेदगंगा कुरणी, सुरुपली, बस्तवडे, गारगोटी, म्हसवे, निळपण, वाघापूर, शेणगाव, चिखली व शेळोली 
हिरण्यकेशी साळगाव, ऐणापूर, गिजवणे व जिलजी
घटप्रभा बिजूर भोगाली, पिळणी, हिंडगाव गवसे, कानडे सावर्डे, आडकूर, कानडेवाडी व तारेवाडी 
ताम्रपणी कुर्तनवाडी, चंदगड व हल्लारवाडी 
शाळी सुळे, आंबर्डे, पनोरे व गवसी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com