Agriculture news in Marathi, Rainfall persisted in the district | Agrowon

सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर कायम

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 11 ऑक्टोबर 2019

सातारा ः जिल्ह्याच्या बहुतांश भागात बुधवारी (ता. ९) पावसाचा जोर कायम राहिला आहे. विजेच्या कडकडाटासह अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला आहे. शेतात पाणी साचल्याने ऊस पीक कोलमडून पडू लागले आहे. जिल्ह्यात गुरुवारी सकाळी आठपर्यंत सरासरी ११.६९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. 

सातारा ः जिल्ह्याच्या बहुतांश भागात बुधवारी (ता. ९) पावसाचा जोर कायम राहिला आहे. विजेच्या कडकडाटासह अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला आहे. शेतात पाणी साचल्याने ऊस पीक कोलमडून पडू लागले आहे. जिल्ह्यात गुरुवारी सकाळी आठपर्यंत सरासरी ११.६९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. 

जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. बुधवारी जिल्ह्यातील बहुतांशी भागात पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. अनेक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला आहे. सततच्या पावसामुळे जमिनीत पाणी बाहेर पडत असल्याने रस्त्यावर पाणी येत आहे. गेल्या चार ते पाच दिवसांपासून पाऊस सुरू पिकांत पाणी साचून राहिले आहे. 

यामुळे उसासारखे पीक कोलमडून पडू लागले आहे. या पावसामुळे खरिपासह रब्बी हंगामातील कामे ठप्प झाली आहे. जितका काळ पाऊस सुरू राहिला तितका काळ ऊस हंगामाही लांबणार आहे. पिकांना कीड, रोगाचा प्रादुर्भाव वाढला असल्याचे शेतकरी सांगत आहेत. काढणीला आलेली पिके हातची जातील की काय अशी भीती निर्माण झाली आहे.

बुधवारी कोरेगाव, सातारा, खंडाळा, महाबळेश्‍वर, कराड तालुक्यांत पावसाचा जोर अधिक आहे.दुष्काळी खटाव तालुक्यात पावसाचे प्रमाण अधिक असून माण, फलटण या तालुक्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू आहे. गुरुवारी सकाळी आठपर्यंत सरासरी ११.६९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. हा पाऊस पश्‍चिम भागात नुकसानकारक असला तरी दुष्काळी पूर्व भागात फायदेशीर ठरणार आहे.

तालुकानिहाय सरासरी पाऊस मिलिमीटर
सातारा- १७.८८, जावळी- ९.७०, पाटण- १०.६४, कऱ्हाड- १०.०८, कोरेगाव- २३.३३, खटाव- ७.४९, माण- ६.५७, फलटण-९.३३, खंडाळा- १४.४०, वाई- ४.७१, महाबळेश्‍वर-११.३५.


इतर ताज्या घडामोडी
औरंगाबाद जिल्ह्यात शेतकऱ्यांना ८५००...औरंगाबाद :  जिल्ह्यातील ९६३ शेतकऱ्यांकडून...
मराठवाड्यात सुमारे ४७ लाख हेक्टरवर खरीपऔरंगाबाद : मराठवाड्यातील खरिपाचे सर्वसाधारण...
खानदेशात तीन दिवसांपासून भिज पाऊसजळगाव  ः खानदेशात मागील तीन दिवसांपासून भिज...
अमळनेरमध्ये रासायनिक खतांचा वापर वाढलावावडे, जि. जळगाव  : अमळनेर तालुक्यात जवळपास...
खडकवासलातून ११ हजार ७३५ क्युसेक विसर्गपुणे : खडकवासला धरणातून बुधवार (ता. १२) पासून...
सातपुड्यात मूगाच्या नुकसानीची शक्यताजळगाव  ः खानदेशात सातपुडा पर्वत भागात पाऊस...
गडचिरोलीत युरियाची कृत्रिम टंचाईगडचिरोली : जिल्ह्यात दोन महिन्यानंतर बरसलेल्या...
परभणीत बँकांचे उंबरठे झिजवून...परभणी : यंदा खरीप हंगामात जिल्ह्यातील बॅंका...
मुंगळा परिसरात रानडुकरांचा धुडगूसमुंगळा जि. वाशीम ः चांगल्या पावसामुळे यंदा या...
‘रासाका’ सुरू करा, अन्यथा उपोषण’नाशिक : यंदाचा ऊस गाळप हंगाम ऑक्टोबर महिन्यापासून...
एफआरपी थकविणाऱ्या कारखान्यांवर कारवाई...नांदेड ः प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालया...
वणी उपविभागातील शेतकऱ्यांना विमा...यवतमाळ : पीक विमा काढल्यानंतरही ही गेल्या तीन...
वाढीव वीज बिले कमी न केल्यास आंदोलन...सोलापूर  ः लॉकडाऊनच्या काळात जिल्ह्यातील...
बुलडाणा जिल्ह्यात शेततळ्यांचे अनुदान...बुलडाणा ः या वर्षात शेततळे खोदलेल्या शेतकऱ्यांना...
सोलापूर जिल्ह्यात उसावर ‘हुमणी’चा...सोलापूर  : जिल्ह्यात खरिपातील मूग, उडदावर...
राधानगरीतून २८०० क्युसेक विसर्गकोल्हापूर : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर...
सांगली जिल्ह्यात तुरीच्या पेरणी...सांगली : जिल्ह्यात गतवर्षी परतीचा झालेला पाऊस आणि...
मका बनले नाशिक जिल्ह्यातील प्रमुख पीकयेवला : कांद्याचा अन् द्राक्षाचा जिल्हा अशी...
रत्नागिरीत मत्स्य शेतीकडे छोट्या...रत्नागिरी : मत्स्य व्यवसाय विभागाला लाखोंचे...
रासायनिक खतांचा योग्य वापर महत्त्वाचापिकांना खताची मात्रा ठरविण्यापूर्वी जमिनीचे...