Agriculture news in marathi, Rainfall persisted in five districts of Marathwada | Agrowon

मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांत पावसाचा जोर कायम

टीम अॅग्रोवन
शनिवार, 26 ऑक्टोबर 2019

औरंगाबाद : मराठवाड्यात पावसाचा जोर गुरुवारी(ता. २४) सकाळपर्यंतच्या चोवीस तासापर्यंत कायम होता. औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद व लातूर या पाच जिल्ह्यांतील २७२ पैकी २३१ मंडळांत पावसाची कमी अधिक प्रमाणात हजेरी लागली. त्यापैकी औरंगाबाद, जालना व उस्मानाबाद जिल्ह्यांतील सहा मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली. या पावसामुळे काढणीला आलेल्या खरिपाच्या पिकाचे मोठे नुकसान होत असल्याचे चित्र आहे. 

औरंगाबाद : मराठवाड्यात पावसाचा जोर गुरुवारी(ता. २४) सकाळपर्यंतच्या चोवीस तासापर्यंत कायम होता. औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद व लातूर या पाच जिल्ह्यांतील २७२ पैकी २३१ मंडळांत पावसाची कमी अधिक प्रमाणात हजेरी लागली. त्यापैकी औरंगाबाद, जालना व उस्मानाबाद जिल्ह्यांतील सहा मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली. या पावसामुळे काढणीला आलेल्या खरिपाच्या पिकाचे मोठे नुकसान होत असल्याचे चित्र आहे. 

औरंगाबाद जिल्ह्यातील सावलदबारा मंडळात सर्वाधिक १५५, तर बोरगाव बाजारमध्ये १३० मिलिमिटर, लाडसावंगी मंडळात ६५ मिलिमिटर पाऊस झाल्याची नोंद घेतली गेली. जालना जिल्ह्यातील बदनापूर मंडळात ७१ मिलिमिटर, तर रोशनगाव मंडळात ८५ मिलिमिटर पावसाची नोंद घेतल्या गेली. उस्मानाबाद जिल्ह्यातील वालवड मंडळात ७५ मिलिमिटर पावसाची नोंद झाली.

औरंगाबाद जिल्ह्यातील औरंगाबाद, फूलंब्री, सोयगाव, सिल्लोड, सोयगाव व गंगापूर तालुक्यांत पावसाचा जोर होता. या सर्व तालुक्‍यांमध्ये सरासरी २४ ते ८४ मिलिमिटर दरम्यान पाऊस झाला. जिल्ह्यातील चित्तेपिंपळगाव मंडळात २५, करमाड ५४, वडोदबाजार ५२, पिरबावडा ४९, सिल्लोड ३५, अजिंठा ४६, अंबाई ४८, अमठाना ५८, भराडी ५०, गोळेगाव ३२, सोयगाव ३५, बनोटी ६२, गंगापूर ३९, सिद्धनाथवडगाव ६०, हर्सूल येथे ४१ मिलिमिटर पावसाची नोंद झाली. 

जालना जिल्ह्यातील दाभाडी ६२, सेलगाव ६२, बावणे पांगरी ६०, भोकरदन ६०, सिपोरा बाजार २९, हस्नाबाद ५६, राजूर ४४, केदारखेडा ४९, अन्वा येथे ४० मिलिमिटर पावसाची नोंद झाली. बीड जिल्ह्यातील ६३ पैकी ५८ मंडळांत पावसाची हजेरी लागली. बीड मंडळात ३६ मिलिमिटर, मांजसुंभा ३४, चौसाळा २५, नेकनुर २८, नाळवंडी ४१, दासखेड ६१, पिंपळा ३२, टाकळसिंग ४९, धानोरा २७, गेवराई ३०, शिरूर कासार ३५, वडवणी ३८, अंबाजोगाई ३५, घाटनांदूर ३१, माजलगाव ४८, धारूर ४०, मोहखेड ५०, तेलगावात ३६ मिलिमिटर पावसाची नोंद झाली. 

लातूर जिल्ह्यातील ५३ पैकी ४४ मंडळांत तुरळक, हलका, मध्यम पाऊस झाला. जिल्ह्यातील बाभळगाव मंडळांत २५ मिलिमिटर, हेर ५१ मिलिमिटर, मातोळा २९, किनीथोट ३०, झरी बु. ५५ मिलीमिटर पावसाची नोंद झाली. 

उस्मानाबाद जिल्ह्यातील ४२ पैकी ४० मंडळात तुरळक, हलका ते मध्यम पाऊस झाला. जिल्ह्यातील नळदूर्ग मंडळात ६१ मिलीमिटर, सालगरा ४३, मुरूम ३५,  नारगवाडी ३२, माकणी २६, जेवळी २७, अंबी ४०, जेवळा बु. ३०, अनाळा ३६ मिलीमिटर पावसाची नोंद झाली. अनेक ठिकाणी पिकाचे नुकसान झाले. शासनाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली.


इतर बातम्या
मधमाशीला हानिकारक कीटकनाशके टाळा : आर....‌अंबाजोगाई : ‘‘शेतकऱ्यांनी मधमाश्यांच्या जाती...
परभणी जिल्ह्यात साडेसहा हजारांवर...परभणी : जिल्ह्यात यंदाच्या रब्बी हंगामात...
सोलापूर : कांदा लिलाव बंद पाडण्याचा डाव...सोलापूर : सोलापूर बाजार समितीमध्ये गेल्या काही...
कोल्हापूर : शेती, घरांच्या नुकसानीसाठी...कोल्हापूर : जिल्ह्यातील अतिवृष्टी आणि...
विज्ञान, अध्यात्माच्या ताकदीने देश विश्...कुंडल, जि. सांगली :  ज्ञान, विज्ञान, संगणक व...
संत्र्याचे विपणनाचे जाळे विणण्याची गरज...अमरावती  ः सांघिक तत्त्वावर संत्रा...
फडणवीसांविरोधात पक्षांतर्गत नाराजांची...मुंबई ः भाजपवर विरोधी पक्षात बसण्याची नामुष्की...
कृषी पदवीधर तरूणांनी समाजासाठी काम...नगर : ‘‘देशात प्रामाणिकपणे काम केलेले अनेक शेतकरी...
फडणवीस सरकारची ३१० कोटींची हमी रद्द...मुंबई ः शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकत्र...
आचारसंहितेपूर्वीच्या निर्णयांची...मुंबई ः विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू...
पुणे जिल्ह्यात भातकाढणी अंतिम टप्प्यातपुणे ः पावसाने उघडीप दिल्यानंतर शेतकऱ्यांनी...
पश्‍चिम महाराष्ट्रात...पुणे ः पश्‍चिम महाराष्ट्रातील अतिवृष्टी आणि...
सातारा जिल्ह्यातील सर्व शेतकरी संघटना...कऱ्हाड, जि. सातारा ः राजकीय पक्षांचा आदर्श घेऊन...
नगर जिल्ह्यात रोजगार हमीच्या कामावर सात...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये आता रोजगार हमी योजनेच्या...
चंद्रशेखर भडसावळे यांना मार्टचा ‘फादर...खडकवासला, जि. पुणे : कृषी पर्यटन संकल्पनेचे...
देशी कापूस संशोधन केंद्राचा उद्या...परभणी: वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाच्या...
खासगी डेअरी उद्योगाला अनुदानाच्या...पुणे  : देशातील दुग्ध व्यवसायाला चालना...
तब्बल 'एवढे' पीकविमा अर्ज दाबून ठेवलेपुणे : पंतप्रधान पीकविमा योजनेत कंपन्या...
शेतकरी म्हणतात...तोपर्यंत बँकांच्या...मुंबई: राज्यातील शेतकऱ्यांचा सात बारा उतारा...
बदलत्या वातावरणामुळे आंबेमोहराला विलंबरत्नागिरी ः सोबा चक्रीवादळामुळे कोकणातील वातावरण...