Agriculture news in Marathi, Rainfall is present in 131 circles in five districts | Page 2 ||| Agrowon

मराठवाड्यात पाच जिल्ह्यांतील १३१ मंडळांत पावसाची हजेरी

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 8 ऑक्टोबर 2019

औरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद व लातूर या पाच जिल्ह्यांतील २७२ मंडळांपैकी १३१ मंडळात पावसाने सोमवारी (ता. ७) सकाळी ८ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांत हजेरी लावली. तुरळक, हलका, मध्यम तर काही ठिकाणी जोरदार असे पावसाचे स्वरूप राहिले.

औरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद व लातूर या पाच जिल्ह्यांतील २७२ मंडळांपैकी १३१ मंडळात पावसाने सोमवारी (ता. ७) सकाळी ८ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांत हजेरी लावली. तुरळक, हलका, मध्यम तर काही ठिकाणी जोरदार असे पावसाचे स्वरूप राहिले.

औरंगाबाद जिल्ह्यातील ६५ मंडळांपैकी २९ मंडळांत पावसाची लागलेली हजेरी हलकी मध्यम ते दमदार स्वरूपाची राहिली. जिल्ह्यातील भावसिंगपुरा मंडळात २० मिलिमीटर, करमाडा ४२, कांचनवाडी ४५, हर्सूल ५०, पिरबावडा ४९, पाचोड ६१, शिवूर २६, लोणी ३५, वाळूज २२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. उर्वरित मंडळात १ ते १९ मिलिमीटरदरम्यान पावसाची नोंद झाली. 

जालना जिल्ह्यातील ४९ मंडळांपैकी ३१ मंडळांत पावसाने हजेरी लावली. तुरळक, हलक्‍या ते मध्यम स्वरूपाचा हा पाऊस झाला. रोहीलागड मंडळात २२ मिलिमीटर, जामखेड २६, आंतरवली टेंभी २३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. उर्वरित मंडळात १ ते १८ मिलिमीटरदरम्यान पावसाची नोंद झाली. 

बीड जिल्ह्यातील ६३ पैकी ४६ मंडळांत पाऊस झाला. सर्वाधिक ७३ मिलिमीटर पाऊस अंबाजोगाई मंडळात नोंदल्या गेला. चौसाळा मंडळात २५, पिंपळनेर २५, बीड २३, थेरला २०, गेवराई २८, माजलगाव ४०, किं. आडगाव ४०, युसुफवडगाव २०, नांदूरघाट ४० मिलिमीटर पाऊस नोंदल्या गेला. धारूर, परळी तालुक्‍याकडे पाठ फिरविणारा हा पाऊस उर्वरीत मंडळात १ ते १९ मिलिमीटरदरम्यान नोंदल्या गेला. 

लातूर जिल्ह्यातील केवळ सात मंडळे वगळता सर्व मंडळांकडे जवळपास पावसाने पाठ फिरविली. या सात मंडळातही पावसाचा जोर फारसा राहिला नाही. उदगीर मंडळात ३१, झरी बु. २०, शेळगाव २९ वगळता उर्वरित मंडळात तुरळक पाऊस झाला. निलंगा, देवणी, शिरूर अनंतपाळ, अहमदपूर, औसा, लातूर तालुक्‍याकडे पावसाने पाठच फिरविली. उस्मानाबाद जिल्ह्यातील ४२ मंडळांपैकी केवळ १८ मंडळांत पाऊस झाला. सावरगाव मंडळात २४ मिलिमीटर, कळंब २०, मोहा ३१ मिलिमीटर झालेला पाऊस वगळता उर्वरीत मंडळात १ ते १५ मिलिमीटर दरम्यान झाला. परंडा, भूम, लोहारा, उस्मानाबाद, उमरगा आदी तालुक्‍यातील बहूतांश मंडळाकडे पावसाने पाठच फिरविली.


इतर बातम्या
मुख्यमंत्री अन्नप्रक्रिया योजना सुरूच...पुणे : गटशेती तसेच फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या...
अकोला जिल्हा परिषदेला जमीन...अकोला ः जिल्ह्यात दोन ठिकाणी परिषदेच्या मालकीची...
ताकारी योजनेचे पाणी चिखलगोठणला पोहोचलेसांगली ः ताकारी उपसा जलसिंचन योजनेच्या सुरू...
राज्यात आजपासून पूर्वमोसमी पावसाची...पुणे  : राज्यात पूर्वमोसमी पावसाला पोषक...
सांगलीत दोन हजार क्विंटल कापूस...सलगरे, जि. सांगली ः कापसाला शेजारच्या कर्नाटक...
अरबी समुद्रातून मॉन्सूनची पुढे चालपुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून)...
सात तालुक्‍यांतील अनुदान थकलेल्या...नगर ः पशुधन जगविण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या...
टोळधाडीच्या अस्तित्वाने विदर्भात पसरली...नागपूर   ः टोळधाड मध्यप्रदेशात...
मुंबई बाजार समितीतील २३ अधिकारी,...मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासनाने...
नाशिक बाजार समिती पुन्हा सुरु;...नाशिक  : नाशिक बाजार समितीत दोन कोरोनाबाधित...
वस्त्रोद्योग येतोय पूर्वपदावरजळगाव ः लॉकडाउनमुळे ठप्प असलेला देशातील...
दूध संघांना पेमेंट वाटप सुरुपुणे : राज्यातील दूध संघांनी शेतकऱ्यांना दिलेल्या...
'दोन वर्षांपर्यंतचे शेतकऱ्यांचे...नगर, : कोरोनामुळे सर्वच क्षेत्रांत गंभीर...
पिचकारी मारणाऱ्यांवर आता दंडात्मक...नगर : सार्वजनिक ठिकाणी पिचकारी मारणाऱ्यांवर...
नगर झेडपीची पहिल्यांदाच झाली लेखी...नगर : कोरोनामुळे लॉकडाउन असल्याने जिल्हा...
शेतकऱ्यांची अडवणूक झाली, तर...नगर : ‘‘शेतकऱ्यांसाठी काम करणे याला आपण सर्वांनी...
अतिवृष्टी आणि अतिक्रमणामुळेच पूरस्थिती...मुंबई : अतिवृष्टी आणि अतिक्रमणामुळेच...
शेतमालाचे ऑनलाइन तारण कर्ज होणार उपलब्ध...मुंबई : टाळेबंदी कालावधीत शेतकऱ्यांना राज्य वखार...
टोळधाड निर्मूलनासाठी कृषी विभागाचा...नगर : महाराष्ट्रात चार दिवसांपूर्वी टोळधाड...
मॉन्सून अरबी समुद्रात; सोमवारपर्यंत...पुणे  : नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून)...