Agriculture news in marathi, Rainfall is present in four revenue boards in the Nagar district | Page 2 ||| Agrowon

नगर जिल्ह्यात चार महसूल मंडळांत पावसाची हजेरी

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 23 ऑगस्ट 2019

नगर : जिल्ह्यामध्ये गेल्या आठ दिवसांपासून पावसाने उघडीप दिली. मात्र, बुधवारी (ता. २१) पुन्हा पावसाने जिल्ह्यामधील अनेक भागात हजेरी लावली. टाकळी मानुर (ता. पाथर्डी) या मंडळात सर्वाधिक ४६ मिलिमीटर पाऊस झाला. अकोले तालुक्यात मात्र तुरळक हजेरी लावली. धरणातील विसर्ग सध्या कमी झाला आहे. मुळा धरणातील विसर्ग थांबविण्यात आला आहे. आता परतीच्या पावसाकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. 

नगर : जिल्ह्यामध्ये गेल्या आठ दिवसांपासून पावसाने उघडीप दिली. मात्र, बुधवारी (ता. २१) पुन्हा पावसाने जिल्ह्यामधील अनेक भागात हजेरी लावली. टाकळी मानुर (ता. पाथर्डी) या मंडळात सर्वाधिक ४६ मिलिमीटर पाऊस झाला. अकोले तालुक्यात मात्र तुरळक हजेरी लावली. धरणातील विसर्ग सध्या कमी झाला आहे. मुळा धरणातील विसर्ग थांबविण्यात आला आहे. आता परतीच्या पावसाकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. 

पावसाळ्याचे सव्वा दोन महिने उलटले आहेत. मात्र, अजूनही पुरेसा पाऊस झालेला नाही. जिल्ह्यामध्ये यंदा पावसाला नेहमीच्या तुलनेत पंधरा दिवस उशिराने सुरवात झाली. मध्यंतरी झालेल्या पावसावर ५० टक्के पेरण्या झाल्या. परंतु, त्यानंतर पावसाने पुन्हा दडी मारली असल्याने राहिलेल्या पेरण्या रखडल्या होत्या. त्यानंतर झालेल्या अल्प प्रमाणातील पावसावरच पेरण्या उरकल्या. त्यामुळे कमी पावसावरच 
यंदा खरिपाच्या पेरणी क्षेत्राने सरासरी ओलांडली. 

मागील आठवड्यात पुणे, नाशिक भागांत झालेल्या पावसाने भीमा, गोदावरी नदीकाठच्या गावांना फटका बसला. मात्र, अजूनही जिल्ह्याच्या अन्य भागात पुरेसा पाऊस नाही. त्यामुळे पेरणी क्षेत्र सरासरीच्या पुढे गेले असले, तरी पाण्याची टंचाई कायम आहे. मध्यंतरी पावसाने दडी मारल्याने व जोरदार पाऊस झाला नसल्याने खरिपाची पिके अडचणीत येण्याची भीती निर्माण झाली आहे.

दरम्यान, बुधवारी पावसाने हजेरी लावल्याने खरिपाच्या पिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून जोरदार कोसळत असलेला अकोले तालुक्यातील पाऊस आता कमी झाला आहे.

गुरुवार (ता. २२) पर्यंतचा पाऊस

मांडवगण २५ 
जामखेड  ७ 
नायगाव ५ 
नालेगाव (नगर)  २७
रुईछत्तीशी ३२
भिंगार ३६
चिचोंडी पाटील
सावेडी  ८
टाकळी मानुर ४६
शेंडी

 


इतर ताज्या घडामोडी
रेशीम उद्योगासाठी शेतकऱ्यांनी पुढे यावे...औसा, जि. लातूर :  ‘‘रेशीम उद्योगाकडे...
सकाळी सौम्य थंडी तर दुपारी उष्ण हवामानमहाराष्ट्रावर आठवड्याच्या सुरुवातीला १०१४...
औरंगाबाद जिल्ह्यात विजेअभावी सिंचनाची...औरंगाबाद : पंधरवडा रात्री तर पंधरवडा दिवसा...
जीआय टॅगिंगयुक्त हापूसला दीड लाखापर्यंत...रत्नागिरी : ‘‘निर्यातीत हापूसचा टक्के घसरत असून...
कावपिंप्रीत चार वर्षांनंतर बहरली पिकेकावपिंप्री, जि. जळगाव : यंदा कावपिंप्रीसह...
नीरा-देवघरच्या पाणीवाटपावरुन पिलीवमध्ये...सोलापूर : राज्य सरकारने नीरा- देवघर धरणातील...
खानदेशात कांदा दरातील चढउतारामुळे...जळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये...
पूरक अन् प्रक्रिया उद्योगावर जर्मनीचा भरउत्तर जर्मनीतील सपाट भूप्रदेश आणि पूर्व...
जालन्यात कांदा २२०० ते २५०० रुपये...जालना : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
गुणकारी डाळिंबडाळिंब हे अत्यंत गुणकारी फळ असून भारतात सर्वत्र...
हुंडी चिठ्ठी, मायक्रो फायनान्स...अकोला  ः जिल्ह्यात हुंडी चिठ्ठी तसेच मायक्रो...
नाशिक येथे तीनदिवसीय पुष्पोत्सवाला...नाशिक  : प्रत्येकाच्या हक्काची तीन झाडं हवी...
न्हावी परिसरात मका पिकावर लष्करी अळीचा...न्हावी, जि. जळगाव ः न्हावीसह परिसरात मक्‍याची...
पोल्ट्री उद्योगाला हवा मदतीचा हातपुणे: बाजारभावातील नरमाईमुळे पोल्ट्री उद्योग...
हापूस निर्यातीसाठी निर्यातीसाठी पणन...रत्नागिरी ः निर्यातीत हापूसचा टक्का घसरत असून तो...
नीरा देवधर, गुंजवणीतून समन्यायी पाणीवाटपमुंबई ः नीरा देवघर व गुंजवणी धरणांचे कालवे...
तापमानवाढीचा धोका वेळीच ओळखावा लागेल:...औरंगाबाद: निसर्गाच्या दोलायमानतेत मानवी...
नगरमधील नऊ तालुक्यांत तेलबियांची पेरणीच...नगर ः तेलबियांची (गळीत धान्य) पेरणी वाढावी यासाठी...
सातारा जिल्ह्यात ५५ लाख क्विंटल...सातारा : जिल्ह्यात सध्या सुरू असलेल्या गाळपाची...
निर्यातबंदीमुळे कांदा फुगवटा;...पुणे: कांद्यावरील संपूर्ण निर्यातबंदी तातडीने...