पुणे जिल्ह्यात पावसाची उघडीप

पुणे जिल्ह्यात पावसाची उघडीप
पुणे जिल्ह्यात पावसाची उघडीप

पुणे ः गेल्या दोन ते तीन दिवसांपूर्वी जिल्ह्यातील अनेक भागांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. त्यानंतर पुन्हा पावसाने उघडीप दिली आहे. पुणे जिल्ह्याच्या पश्‍चिम पट्ट्यातील काही भागांत पावसाची रिमझिम सुरू असून, घाटमाथ्यावर हलक्या सरी बरसत आहे. यामुळे भात लागवडीचा वेग मंदावला आहे. 

पश्‍चिम पट्यातील मावळ, मुळशी, भोर, वेल्हा, जुन्नर, आंबेगाव या तालुक्यांत मधूनमधून पाऊस पडत आहे. मंगळवारी (ता. २३) दुपारनंतर या भागात पावसाच्या अधूनमधून सरी कोसळत होत्या. यामुळे दौंडमधील केडमध्ये २२ मिलिमीटर, मावळ तालुक्यातील कार्ला येथे १५ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. तर वेल्हा येथे नऊ मिलिमीटर पाऊस पडला. यामुळे मुळशीतील मुठा, माले, घोटावडे, पौड, भोरमधील भोलावडे, वेल्ह्यातील पानशेत, खेडमधील कुडे, इंदापूर तालुक्यातील लोणी, भिगवण, अथुर्णे, पुरंदरमधील भिवंडी येथे हलक्या सरी पडल्या. यामुळे खरीप पेरण्यांना दिलासा मिळत असला तरी जोरदार पावसाची प्रतीक्षा अजूनही लागून राहिली आहे. काही भागांत अजूनही पाऊस पडलेला नसल्याने पेरण्याही खोळंबल्याचे चित्र आहे.  

बुधवारीही या भागात पावसाच्या तुरळक ठिकाणी अधूनमधून सरी कोसळत होत्या. मात्र भात पट्ट्यात भात लागवडी सुरू असल्याने जोरदार पावसाची अपेक्षा लागून आहे. घाटमाध्यावर होत असलेल्या पावसामुळे काही प्रमाणात ओढे, नाले दुथडी भरून वाहू लागले असून, धरणाच्या पाणी पातळीत काही प्रमाणात वाढ होऊ लागली आहे.पडत असलेल्या पावसामुळे भात रोपांनाही चांगलाच दिलासा मिळत असून, रोपे वाढीच्या अवस्थेत आहे. काही ठिकाणी झालेल्या चांगल्या पावसामुळे भात लागवडी सुरू झाल्या आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com